मंडळी, आंतरराष्ट्रीय योग दिनी, म्हणजेच 21 जून 2022 रोजी तुम्ही काय करणार आहात? तुम्ही कुठे आणि कोणाबरोबर योग करणार आहात? तुमचा काय प्लॅन आहे? हे सर्व प्रश्न विचारले आहेत, कारण यावर्षी होणाऱ्या आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी फक्त भारतातच नव्हे तर जगभरात उत्साहाने तयारी सुरुही झाली आहे. ( International yoga day 2022 )
भारतात तर योगदिवसाचा उत्साह असणारच आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयाने ‘मानवतेसाठी योग’ ही आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 ची थीम जाहीर केली आहे. पण भारताबरोबच जागतिक महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेनंही योगदिनाच्या कार्यक्रमात आघाडी घेतली आहे. अमेरिकेच्या न्युयॉर्कमधील प्रतिष्ठित टाइम स्क्वेअरमध्ये एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात हरिद्वारच्या जुना आखाड्याचे स्वामी अवधेशानंद गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो नागरिक योग प्रात्यक्षिके करणार आहेत.( International yoga day 2022 )
येत्या 21 जून रोजी 8 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होईल. 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतराष्ट्रीय योग दिवसाची संकल्पना मांडली. डिसेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस घोषित केला. तेव्हापासून जगभरात 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. 21 जून हा दिवस खास आहे, कारण हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे आणि जगाच्या अनेक भागांमध्ये याला विशेष महत्त्व आहे. ( International yoga day 2022 )
21 जून 2015 रोजी जगभरात पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि 84 राष्ट्रांतील मान्यवरांसह 35,985 लोकांनी नवी दिल्लीतील राजपथ येथे योगाची आसने केली. तेव्हापासून भारतासह जगभरात योग दिवस, साजरा होतोय. यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमामध्ये योग दिवसाची ‘मानवतेसाठी योग’ ही थीम जाहीर केली आहे. त्यानुसार आयुष मंत्रालय 21 जूनच्या या आंतरराष्ट्रीय योग दिवसासाठी विशेष तयारी करीत आहे. पंतप्रधानांच्या उपस्थितीत या दिवशी मुख्य कार्यक्रम म्हैसूर, कर्नाटक येथे होणार आहे. ( International yoga day 2022 )
====
हे देखील वाचा – पाठ दुखीमुळे त्रस्त आहात? ‘या’ योगासनांमुळे मिळेल आराम
====
कोविड महामारीमुळे योगसाधनेचं महत्त्व वाढले आहे. सुदृढ आरोग्याची किल्ली म्हणून योगाला अनेकांनी पसंती दिली आहे. त्यातूनच योगाचं महत्त्व भारताबरोबच परदेशातही जपलं जात आहे. त्यात अमेरिका सर्वात पुढे आहे. अमेरिकेत 10 हजाराहून अधिक नोंदणीकृत योगशिक्षक आहेत. त्यांच्यामार्फत 3.6 करोड अमेरिकन नागरिक योगाचे शिक्षण घेत आहेत.
अमेरिकेतील भारतीय दुतावासाचे रणधीर जायसवाल यांच्या पुढाकाराने न्युयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरमध्ये भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात हरिद्वारच्या जुना आखाड्याचे स्वामी अवधेशानंद गिरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. स्वामी अवधेशानंद गिरी यांचे अमेरिकेत मोठ्या संख्येने अनुयायी आहेत. त्यांच्या मागणीनुसारच अमेरिकेतील भारतीय दुतावासाने त्यांना विनंती केली होती. अवधेशानंद गिरी यांनीही यासाठी अनुमती दिली असून टाईम्स स्क्वेअर येथे 21 जून 2022 रोजी लाखाहून अधिक योगप्रेमी जमा होतील, असा दावा करण्यात आला आहे.( International yoga day 2022 )
त्यामुळेच मंडळी आपल्याला प्रश्न विचारला….21 जून 2022 रोजी आपण काय करत आहात…कुठे योगा करणार…अजून तुमचा प्लॅन झाला नसेल तर नक्की करा…आणि तयारीला लागा…
– सई बने