Home » कधी आणि कसा सुरू झाला आंतरराष्ट्रीय योग दिवस? जाणून घ्या याचा इतिहास आणि यावर्षीची थीम

कधी आणि कसा सुरू झाला आंतरराष्ट्रीय योग दिवस? जाणून घ्या याचा इतिहास आणि यावर्षीची थीम

0 comment
Share

आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी २१ जून रोजी साजरा केला जातो. योगाचे महत्त्व ओळखून जगातील सर्व देश योग दिन साजरा करतात. योगाभ्यास शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. योगामुळे शरीर रोगमुक्त राहते आणि मनाला शांतीही मिळते. (International Yoga Day 2022)

भारतात योग ऋषीमुनींच्या काळापासून होत आला आहे. योगाचा संबंध भारतीय संस्कृतीशी आहे, जो आता परदेशातही पसरला आहे. परदेशात योगाचा प्रसार करण्याचे श्रेय आपल्या योगगुरूंना जाते, ज्यांनी परदेशी भूमीवर योगाची उपयुक्तता आणि महत्त्व पटवून दिले. पण योग दिवस कधी आणि का साजरा करायला सुरुवात केली, हे तुम्हाला माहीत आहे का? आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जाणून घेऊया, की योगाचा इतिहास काय आहे आणि योग जगप्रसिद्ध कसा झाला?

योग दिनाची सुरुवात 

आज जगभरातील लोक निरोगी राहण्यासाठी योगाभ्यास करतात. कोरोनाच्या काळात योगाचे महत्त्व आणखी वाढले आहे. जेव्हा लॉकडाऊन दरम्यान लोक घराबाहेर पडू शकत नव्हते, जिम बंद होते, तेव्हा मन शांत राहण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी लोक घरी योगासने करायची. मात्र हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्याची सुरुवात २०१५ साली झाली. जेव्हा पहिल्यांदाच जगभरात योग दिवस एकाच वेळी साजरा करण्यात आला.(International Yoga Day 2022)

योग दिन पाहिल्यांदा केव्हा साजरा केला गेला?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त महासभेत योग दिवस साजरा करण्याचे आवाहन केले. संयुक्त राष्ट्र महासभेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रस्ताव स्वीकारला. अवघ्या तीन महिन्यांत आंतरराष्ट्रीय योग दिनाची संघटना जाहीर झाली. पुढच्याच वर्षी २०१५ मध्ये, जगभरात प्रथमच जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.

२१ जून रोजी का साजरा केला जातो योग दिन?

साल २०१५ मध्ये २१ जून हा योग दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. २१ जून रोजी योग दिवस का साजरा केला जातो, असाही प्रश्न निर्माण होतो. यामागे एक खास कारण आहे. २१ जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे, ज्याला उन्हाळी संक्रांती देखील म्हणतात. भारतीय परंपरेनुसार, उन्हाळ्याच्या संक्रांतीनंतर सूर्य दक्षिणायन असतो. असे मानले जाते की, सूर्य दक्षिणायनाचा काळ आध्यात्मिक सिद्धी प्राप्त करण्यासाठी फायदेशीर आहे. या कारणास्तव २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाऊ लागला. (International Yoga Day 2022)

हे देखील वाचा: न्युयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरमध्येही साजरा होणार ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस 2022’…

योग दिनी भारताचा विक्रम 

२१ जून २०१५ रोजी, संयुक्त राष्ट्र महासभेत पंतप्रधान मोदींच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. या वर्षी दिल्लीतील राजपथवर ३५ हजारांहून अधिक लोकांनी योगा केला. विशेष म्हणजे यामध्ये ८४ देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले असून, २१ योगासनांचा सराव करण्यात आला होता. हा स्वतः मध्येच एक विक्रम होता. भारतात योग दिनानिमित्त एवढ्या मोठ्या कार्यक्रमाची गिनीज बुकमध्ये दोन विक्रमांची नोंद झाली. ज्यामध्ये पहिला विक्रम ३५,९८५ लोकांनी एकत्र योगासने केली आणि दुसरा विक्रम म्हणजे, या सोहळ्यात ८४ देशांच्या प्रतिनिधींचा एकत्र सहभाग होता. (International Yoga Day 2022)

आंतरराष्ट्रीय योग दिन २०२२ ची थीम 

२०२२ सालची आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम ‘Yoga for Humanity’ म्हणजेच, मानवतेसाठी योग आहे. ही थीम घेऊन २१ जून रोजी जगभरात योग दिवस साजरा केला जाणार आहे. (International Yoga Day 2022)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.