आजच्या धकाधकीच्या काळात आपल्याला आपल्या शरीराची काळजी घेणे खूपच आवश्यक आहे. नवनवीन, वेगवेगळ्या गंभीर आजारांपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी आणि मनाला शांत करण्यासाठी योग अतिशय उत्तम उपाय आहे. आपल्या आयुर्वेदाने आपल्याला योगाच्या रूपात एक दैवी देणगी दिली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण योग केवळ आपल्या शरीराला निरोगी ठेवण्याचेच काम करतो असे नाही. योग मनाला देखील शांत करतो, शरीरात एक नवीन ऊर्जा निर्माण करतो, जीवनाकडे किंबहुना प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन प्रदान करतो, आत्मविश्वास देतो. असा हा योग म्हणजे भारताने जगाला दिलेली अमूल्य भेट आहे. (Yoga Day)
अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यांनी नेहमीच योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची आपल्यासाठी असलेली गरज समजावून सांगितली आहे. जगभरातील देशांनी योग स्वीकारला तर आहेच सोबतच या योगाचा ते प्रसार आणि प्रचार देखील करत आहे. योगा कोणत्याही एका दिवसासाठी नव्हे तर दररोज करणे आवश्यक आहे. योगा केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते आणि शारीरिक, मानसिक शांती मिळते. या दिवसाचा उद्देश आध्यात्मिक आणि शारीरिक साधनेच्या फायद्यांबद्दल जागरूकता पसरवणे आहे. भारताच्या पुढाकाराने योगाची ताकद ओळखून जगभरात योगाला महत्त्व दिले जाते. आजच्या काळात लोकांना योगाचे महत्व समजावे, यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला. (Marathi NEws)
२७ सप्टेंबर २०१४ रोजी पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र महासभेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. विशेष म्हणजे त्याचवर्षी ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने हा प्रस्ताव मंजूर केला. एवढेच नाही तर २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा देखील केली. भारताला सुमारे ५ हजार वर्षांची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधनेची परंपरा असून, ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते. भारतीय धर्म संस्कृतीमधील ‘योग’ संकल्पनेची मांडणी श्रीमद्भगवद्गीता ग्रंथात केलेली आहे. (Todays Marathi HEadline)
आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी २१ जून ही तारीख निवडण्यामागे देखील एक विचार होता. दरवर्षी २१ जून रोजी योग दिन साजरा केला जातो कारण तो वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. याला उन्हाळी संक्रांती असेही म्हणतात. उन्हाळी संक्रांती दक्षिणायनामध्ये संक्रमण दर्शवते. म्हणूनच, हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या विशेष मानला जातो. हा दिवस विशेषतः ध्यान, योग आणि अध्यात्मासाठी निवडला गेला होता. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात साजरा करण्यात आला. ज्याचे नेतृत्व भारताने केले. या दिवशी दिल्लीतील राजपथावर ३५,००० हून अधिक लोकांनी योगा केला, ज्यामध्ये ८४ देशांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला. या घटनेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. (Marathi Latest News)
यंदा आंतरराष्ट्रीय योग दिन हा २१ जून २०२५ शनिवार रोजी साजरा होणार आहे. यावर्षी योग दिनाची थीम ही, एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग (Yoga for One Earth, One Health). अशी आहे. या वर्षीच्या थीमचा उद्देश्य असा आहे की योगाला वैयक्तिक आरोग्यासोबतच पृथ्वीच्या आरोग्यासाठीही आवश्यक मानले जावे. ही थीम पर्यावरण आणि वैयक्तिक जीवनातील संतुलनाला प्रोत्साहन देते. मन की बात कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले की योगाद्वारे आमचे उद्दिष्ट जगभरातील लोकांना निरोगी बनवणे असे आहे. (Marathi Trending News)
=========
हे देखील वाचा : June : 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस का असतो?
Yoga Day : जागतिक योग दिन : दररोज केलीच पाहिजे अशी सोपी योगासने
=========
दरम्यान योगाचे आपल्या आयुष्यात अनेक फायदे आहेत, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग खूप महत्वाचा आहे. योगामुळे शरीराची लवचिकता वाढते, स्नायू बळकट होतात, तसेच तणाव आणि चिंता कमी होते. यासोबतच, योग रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास, झोप सुधारण्यास आणि एकूणच जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतो. (Social News)