Home » पॉकेटफ्रेंन्डली इंटरनॅशनल ट्रिप करण्यासाठी ‘हे’ हॅक्स येतील कामी

पॉकेटफ्रेंन्डली इंटरनॅशनल ट्रिप करण्यासाठी ‘हे’ हॅक्स येतील कामी

फिरण्याची आवड आपल्या सर्वांनाच असते. मात्र काही लोक त्यांची ही आवड वेळोवेळी पूर्ण करू शकत नाही. कारण त्यावेळी त्यांचे बजेट कोलमडले जाते.

by Team Gajawaja
0 comment
International trip
Share

फिरण्याची आवड आपल्या सर्वांनाच असते. मात्र काही लोक त्यांची ही आवड वेळोवेळी पूर्ण करू शकत नाही. कारण त्यावेळी त्यांचे बजेट कोलमडले जाते. आपल्या सर्वांनाच माहिती असते की, जेव्हा आपण बाहेर एखाद्या ठिकाणी फिरायला जातो तेव्हा एक्स्ट्रा रक्कम आपल्या हातात असली पाहिजे. जेणेकरुन काही आपत्कालीन स्थिती आल्यास किंवा काही गोष्टी एक्सप्लोर करायच्या झाल्यास तर आपण त्या करू शकतो. अशातच आज आम्ही तुम्हाला काही अशा ट्रिक्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही पॉकेटफ्रेंडली इंटरनॅशनल ट्रिप करण्याचा प्लॅन करू शकता. (International trip tips)

फिरण्यासाठीचा सीजन
तुम्ही पाहिले असेल की बहुतांश पर्यटक एखाद्या ठिकाणी तेथे सीजन असेल तेव्हा फार गर्दी करतात. अशातच त्या ठिकाणचे पैसे वाढले जातात. खाण्यापिण्यापासून ते राहण्यासाठी सुद्धा तुम्हाला अधिक पैसे द्यावे लागतात. त्यामुळे तुम्ही फिरण्याचा प्लॅनिंग करत असाल तर असा काळ निवडा ज्यामध्ये हॉटेल ते फ्लाइटच्या तिकिट्स या स्वस्त असतील. यासाठी तुम्ही ऑड सीजनची निवड करू शकता. असे केल्याने तुमचा फिरण्याचा खर्च कमी होईल आणि तुम्ही अधिक ठिकाणी एक्सप्लोर करू शकता.

अॅडवान्स तिकिट बुकिंग करा
जर तुम्ही फॅमिली सोबत फिरण्याचे प्लॅनिंग करत असाल तर काही दिवसांआधीच फ्लाइटची तिकिट बुकिंग करा. जेणेकरुन ज्या वेळी जायचे असेल त्यावेळी तिकिट बुक केल्यास तुम्हाला ती महागात पडेल. अशातच तुम्ही ट्रिपची तारीख ठरवली आहे त्याच्या चार ते सहा आठवड्यांपूर्वी तिकिट बुक केल्यास तुम्हालाच फायदा होईल.

हॉटेल्ससाठी अॅडवान्स बुकिंग
इंटरनॅशनल ट्रिप दरम्यान पीक सीजनमध्ये असे काही हॉटेल्स असतात जे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या हॉटेल्सच्या रुमची किंमत कमी करतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही कधी बाहेर फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर हॉटेलची बुकिंग आधीच करा. त्यासोबत पेमेंट हे ऑनलाईन केल्यास तुम्हाला डिस्कआउंट ही हॉटेलकडून दिला जाऊ शकतो.

भाषेसंबंधित अॅपचा वापर करा
इंटरनॅशनल ट्रिप दरम्यान तुम्ही फोनमध्ये भाषेसंदर्भातील अॅप जरुर डाउनलोड करा. कारण हे तुमच्या फार कामी येऊ शकते. गुगल ट्रांसलेट अॅप तुम्हाला एखाद्या ठिकाणी व्यवस्थिती फिरण्यासाठी मदत करू शकते.

लोकल फूड खा
काही लोकांना सवय असते की, इंटरनॅशनल ट्रिप दरम्यान प्रसिद्ध ठिकाणी फूड खायचे असते.मात्र त्याची किंमत फार अधिक असते. अशातच तुम्ही ज्या ठिकाणी जात असाल तेथील स्थानिक फूड खा. कारण ते खुप टेस्टी सुद्धा असते आणि त्याची किंमत ही खिशाला परवडणारी असते. (International trip tips)

हेही वाचा- हलाल हॉलिडेज म्हणजे काय?

हॉटेल ऐवजी हॉस्टेल निवडा
ट्रॅवलिंगच्या प्लॅनिंग दरम्यान ज्या गोष्टी महाग असतात त्या म्हणजे हॉटेल्सच्या किंमती. कारण जेव्हा आपण एखाद्या इंटरनॅशनल ट्रिपला जातो तेव्हा जवळजवळ एक आठवडा तरी तेथे थांबतो. अशातच हॉटेल्सच्या किंमती वाढल्या जातात आणि तुमचे बजेट बिघडले जाते. जेव्हा कधी तुम्ही इंटरनॅशनल ट्रिपचे प्लॅनिंग करता तेव्हा हॉटेल ऐवजी हॉस्टेलची निवड करू शकता. हॉस्टेल मध्ये सुद्धा हॉटेल प्रमाणेच काही अंशी सुविधा तुम्हाला दिल्या जातात. मात्र रिव्यूज पाहून तुम्ही हॉस्टेलची निवड करू शकता.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.