जर तुम्ही परदेशात फिरायला जायचा प्लॅन करत असाल आणि नक्की कोणत्या ठिकाणी जायचे? कुठे रहायचे, तेथे गेल्यावर काय करायचे असे विविध प्रश्न तुम्हाला पडतात. त्याचसोबत परदेशात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांसाठी काही नियम आहेत का हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यावे लागते. त्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टींबद्दल चिंता करत असाल तर थांबा. कारण तुम्हाला आम्ही परदेशात फिरायला जाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दल सविस्तर सांगणार आहोत. जेणेकरुन तुमची परदेशवारीचा मनमोकळेपणाने आनंद घेता येईल.(International Travel Tips)
-रिसर्च करा
ज्या ठिकाणी तुम्हाला जायचे आहे त्या ठिकाणाची प्रथम पूर्ण माहिती मिळवा. कारण रिसर्च करुन माहिती मिळवल्यास ज्यावेळी तुम्ही प्रत्येक्षात तेथे असल्यास कोणतीही समस्या येणार नाही. तसेच ज्या ठिकाणी जायचे आहे त्याच्या आजूबाजूच्या ठिकाणांनाबद्दल ही तुम्हाला कळेल. जर तुम्ही भारतातून प्रवास करत असाल तर अशा देशाची निवड करा जे तेथे गेल्यावर व्हिजा देतात. या व्यतिरिक्त तुम्ही ठरवलेल्या ठिकाणी जायचा उत्तम कालावधी, साइट-सीइंग ते खानपानच्या गोष्टींबद्दल ही माहिती करुन घ्या. सर्वाधिक महत्वाचे म्हणजे तुमचे बजेट. त्यानुसारच तुम्ही परदेशातील कोणत्या ठिकाणी भेट देऊ शकता ते पहा.
हे देखील वाचा- सावधान! या गोष्टी तुम्ही गुगलवर शोधत नाही ना? नाहीतर जावे लागेल तुरुंगात

-प्रवासासंदर्भात पुढील काही कागदपत्र तपासून पहा
पासपोर्ट, व्हिजा, आंतरराष्ट्रीय वाहन परवाना, प्रवासासाठी त्या ठिकाणचा नकाशा, विमानाचे तिकिट, ट्रॅव्हल वाउचर, हॉटेल बुकिंग रिसिप्ट, ट्रॅव्हल इंन्शुरन्स, सर्व प्रकारच्या पेमेंट रिसिप्ट्स, मेडिकल प्रिस्क्रिप्शन आणि अत्यंत गरजेचे म्हणजे तुमची सर्व कागदपत्र सुरक्षितरित्या ठेवा.
-भारतीय दूतवासात रजिस्ट्रेशन करा
ही अशी एक प्रोसेस आहे ज्याकडे बहुतांश प्रवासी दुर्लक्ष करतात. दरम्यान, भारतीय दूतवासाच्या सुचनांवर लक्ष ठेवण्यासह आपल्या प्रवासाच्या प्लॅनिंगबद्दल त्यांना सांगावे. जेणेकरुन पुढे जाऊन एखादी समस्या उद्भवल्यास ते तुम्हाला ट्रॅक करु शकतात. यामुळे तुमची सुरक्षितता अधिक वाढते. त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी जात आहात तेथील भारतीय दूतवासासोबत रजिस्ट्रेशन करा.(International Travel Tips)
-परदेशी चलन (फॉरेन कॅश एक्सचेंज)
परदेशात ज्या ठिकाणी तुम्ही जात आहात तेथील चलन तुम्हाला घ्यावे लागते. त्यालाच आपण फॉरेशन कॅश एक्सचेंज असे म्हणतो. या व्यतिरिक्त तुमच्या बँकेसोबत तुम्ही देशाबाहेर प्रवास करत असून होणाऱ्या ट्रांजेक्शनबद्दल सांगा. कारण परदेशात जाऊन तुम्हाला कोणतीही समस्या येऊ नये. हे सुद्धा लक्षात ठेवा की, विमानतळावर किंवा अनधिकृत डीलरकडून पैशांचे एक्सचेंज करुन घेऊ नका.

हे देखील वाचा- अमेरिकेत भाजीसारखी खरेदी करता येते बंदूक…
-गॅजेट्स पॅक करा
मोबाईल चार्जर, पॉवर बँक, कॅमेरा आणि चार्जिंग कॉड, USB केबल, एक्स्ट्रा SD कार्ड्स, हेडफोन्स आणि इअरफोन्स, आय-पॅड, पोर्टेबल स्पीकर्स, पॉवर कंवर्टर्स, दिशादर्शक यंत्र.
-महत्वाचे ट्रॅव्हल अॅप डाऊनलोड करा
तुमच्या मोबाईलध्ये तुम्ही प्रवासादरम्यान महत्वाचे ट्रॅव्हल अॅप डाऊनलोड करा. पण तुमच्या मोबाईलमध्ये आंतरराष्ट्रीय रोमिंगसह एक अॅक्टिव्ह इंटरनेट प्लॅन सुद्धा असू द्या. त्याचसोबत गुगल मॅप ही जरुर अपडेट करुन डाऊनलोड करा.