Home » भारतात नाही तर, ‘या’ देशात ठरली ‘साक्षरता दिवसाची’ संकल्पना 

भारतात नाही तर, ‘या’ देशात ठरली ‘साक्षरता दिवसाची’ संकल्पना 

by Team Gajawaja
0 comment
International Literacy Day
Share

आज संपूर्ण जगभरात मोठ्या जोशात आणि उत्साहात ‘आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस’ (International Literacy Day) साजरा केला जाणार आहे. दरवर्षी ८ सप्टेंबरला हा दिवस साजरा केला जात असून याची सुरुवात १९६६ सालापासून झाली. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश हाच की, लोकांमध्ये साक्षरतेविषयी जागरूकता निर्माण झाली पाहिजे. जगभरातील लोकांचे लक्ष आणि मन शिक्षणाकडे वळलं पाहिजे, त्यांना शिक्षणाचं महत्त्व समजायला हवं. थोडक्यात एक साक्षर आणि सक्षम समाज घडविणं किती आवश्यक आहे, याचं महत्त्व पटवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने जगभरात साक्षरतेविषयक जनजागृती केली जाते.

साक्षरता म्हणजे नेमकं काय ?

‘साक्षरता’ म्हणजे काय हे तर सर्वानाच माहिती आहे. हा शब्द साक्षर या मूळ शब्दापासून तयार झाला आहे. साक्षर असणं म्हणजे लिहिण्या- वाचण्यास सक्षम असणं. भारतात वयोमानानुसार सात वर्षांवरील पुढील व्यक्ती ज्यांना लिहिता वाचता येते त्यांना साक्षर असे समजले जाते. जगातील सर्व देश आपल्या देशातील नागरिकांना शिक्षणाचे महत्त्व समजावे यासाठी हा दिवस साजरा करतात. थोडक्यात काय तर देशातील सर्व नागरिकांना अक्षर ओळख असणं महत्त्वाचं आहे. साक्षरता म्हणजे नुसतं शिक्षणाचं महत्त्व नाही, तर आपल्या कर्तव्याची आणि आपल्या हक्काची प्रत्येकाला जाणीव असणं होय.

=====

हे देखील वाचा – नशीब पालटण्यास भाग पाडणाऱ्या तुरुंग अधिकारी मिरा बाबर यांची प्रेरणादायी कथा

=====

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस (International Literacy Day) कधी पासून साजरा केला जातो ?

इराणची राजधानी तेहरान येथे १९६५ साली जगभरातील देशाच्या शिक्षण मंत्र्यांची बैठक पार पडली होती. ही बैठक ८ ते १९ सप्टेंबर दरम्यान झाली असून या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा सुरू झाली. यानंतर लगेचच युनेस्कोने साक्षरता दिवस साजरा करण्यासाठी ८ सप्टेंबर ही तारीख ही निश्चित केली व तशी अधिकृत घोषणाही करण्यात आली. या घोषणेपासून आपण दरवर्षी साक्षरता दिवस साजरा करतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर १९६६ पासून साक्षरता दिवस साजरा होताना दिसत आहे.

जागतिक आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवसाचा उद्देश

साक्षरता दिवस शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. साक्षरता हा मानवी हक्क आहे. हे केवळ वैयक्तिक सक्षमीकरणाचे साधन नाही, तर मानवी आणि सामाजिक विकासाचे एक प्रमुख साधन आहे. दारिद्र्य निर्मूलन, लोकसंख्या वाढ थांबवणे, बालमृत्यू कमी करणे, लैंगिक समानता प्राप्त करणे तसेच विकास, शांतता आणि लोकशाहीच्या रक्षण यामध्ये साक्षरता महत्त्वाची भूमिका बजावते.

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवसाची (International Literacy Day) संकल्पना काय ?

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवसाची संकल्पना आहे जगभरातील नागरिकांना शिक्षणासाठी प्रेरित करणे. दरवर्षी साक्षरता दिवसानिमित्त काही ना काही थीम असते. यावर्षी ‘ट्रांसफॉर्मिंग लिटरेसी लर्निंग स्पेस’ अशी थीम असेल.

ही थीम शिक्षणाच्या जागेशी निगडित आहे. अर्थात साक्षरता केवळ वर्गाच्या खोल्यांपुरती मर्यादित नाही, तर ग्रंथालयं, चित्रपटगृहं, विमानतळ, बस स्थानकं, प्रार्थनास्थळं, शासकीय व खाजगी कार्यालयं, घरं, हॉटेल्स आणि अगदी रस्त्यांशीही निगडित आहे. थोडक्यात साक्षरता म्हणजे केवळ पुस्तकी शिक्षण नाही, तर व्यवहारी जगात जगण्यासाठी आवश्यक असणारं सर्वप्रकारचं शिक्षण यामध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.