सामान्यपणे आपण सर्वच जणं आपल्या रोजच्या दैनंदिन कामासाठी उजव्या हाताचा वापर करत असतो. उजवा हाताचा वापर हा आपल्या सर्वच लोकांच्या व्यक्तिमत्वाचा आणि आयुष्याचा भागच आहे. आपण कोणतेही काम करताना आधी उजव्या हाताचा वापर करतो. मग ते जेवणापासून ते लिखाणापर्यंत आदी सर्वच काम आपण उजव्या हाताने करतो. किंबहुना आपल्याला ती लहानपणापासून सवयच लावली जाते. मात्र असे असले तरी प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात तसे या गोष्टीला देखील आहेत. (Top Trending News)
सर्वच लोकं जरी उजव्या हाताने काम करणारे असले तरी डाव्या हाताने काम करणारे लोकं देखील आपल्या आजूबाजूला असतात. असे लोकं खूपच कमी प्रमाणात असतात. त्यामुळे जेव्हा आपण कोणाला डाव्या हाताने लिहिताना बघतो, काम करताना बघतो तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. या जगात सुमारे १२% लोकं आपली सर्व कामे डाव्या हाताने करतात. अजून एक गंमत म्हणजे, केवळ १% लोक अशा दुर्मिळ श्रेणीत आहे, जे दोन्ही हातांनी समान कौशल्याने काम करू शकतात. डावखुऱ्या लोकांसाठी दरवर्षी १३ ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय डावखुरा दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र हा दिन साजरा करण्यामागे नक्की कारण काय? या दिवसाचे उद्दिष्ट काय? आणि डावखुऱ्या लोकांबद्दल कोणत्या खास गोष्टी असतात? आदी अर्वच गोष्टींबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. (Todays Marathi Headline)
डावखुरा दिन साजरा करण्यामागे जागरूकता हा मोठा हेतू आहे. कारण आजही अनेक ठिकाणी जर लहान मुलं डाव्या हाताने खेळत असेल, लिहीत असेल, वस्तू पकडत असेल तर त्याला जबरदस्तीने उजव्या हाताने काम करण्याची सवय लावली जाते. असे करण्यामागे प्रत्येकाचे कारण वेगळे असते. मात्र हा दिवस डावखुऱ्यांमध्ये असणारे विशेष गुण ओळखून त्यांचे कौतुक करण्याचा दिवस आहे. डावखुऱ्या लोकांना भेडसावणाऱ्या आव्हानांना सामोरे जाणे आणि त्यांच्या गरजांना समर्थन देण्याचा हा दिवस आहे. भारतासारख्या देशांमध्ये किंवा मध्यपूर्वेत, डाव्या हाताने शुभ काम करणे अयोग्य मानले जाते. इंग्लडमध्येही, डावखुऱ्या मुलांना एकेकाळी त्यांचे उजवे हात वापरण्याची सक्ती केली जात होती. (Latest Marathi News)

हा दिवस १९७६ मध्ये डीन आर. कॅम्पबेल यांनी ‘लेफ्ट हँडर्स इंटरनॅशनल’ या संस्थेद्वारे सुरू केला होता. पण जर आपण पाहिले तर डावखुरा लोकांचा इतिहास खूपच वेगळा आणि प्रतिकूल आहे. १६०० च्या दशकात डावखुरेपणाला राक्षसी वृत्तीशी जोडले जात असे. मुलांना जबरदस्तीने उजव्या हाताने कामं करायला सांगितले जायचे. एवढेच नाही तर समाजात त्यांच्या या गोष्टीमुळे कायम त्यांच्या क्षमतांकडे दुर्लक्ष केले जाई. मात्र आज ही परिस्थिती बदलली आहे आणि डावखुरा लोकांचा विशेषपणे गौरव केला जातो. आज कोणी डावखुरे असल्याचे समजल्यास लोकं पटकन बोलतात, ‘अरे वा छान! हुशार असतात बरं का डावखुरे लोकं. डावखुऱ्या लोकांच्या नशिबात राजयोग असतो’. (Marathi Top Headline)
डावखुऱ्यांची तथ्ये
* जगातील सरासरी १२ टक्के लोक डावखुरे तर हाताने, ८७ टक्के उजव्या हाताने काम करतात तर १ टक्के लोक दोन्ही हाताने काम करु शकतात अर्थात ते सव्यसाची आहेत.
* डावखुऱ्या लोकांना ऍलर्जी होण्याची शक्यता जास्त असते तसंच त्यांना दुर्मीळ स्वयं-प्रतिकार आजार होण्याचा अडीचपट जास्त धोका असतो.
* एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, उजव्या लोकांपेक्षा डावखुऱ्यांना मायग्रेनचा त्रास जास्त होतो.
बहुतेक डावखुऱ्यांच्या झोपेची गुणवत्ता इतरांपेक्षा वाईट असते.
* डावखुरे मेंदूच्या उजव्या बाजूचा अधिक वापर करतात.
* डावखुरे इतरांपेक्षा लवकर स्ट्रोकमधून बरे होण्याची शक्यता असते.
* डावखुरे अधिक वेगानं इंग्रजी टायपिंग करु शकतात. कारण ते QWERTY कीबोर्डवर, फक्त डाव्या हाताचा वापर करून 3,000 हून अधिक इंग्रजी शब्द टाइप करू शकतात. केवळ उजव्या हाताने सुमारे 300 शब्द टाइप करता येतात.
* डावखुरा व्यक्ती मेंदूच्या उजव्या बाजूचा अधिक वापर करतो, ज्यामुळे त्यांच्यात सर्जनशीलता, कलात्मकता आणि विचारांची वेगळी दिशा दिसून येते. चित्रकार, संगीतकार, वास्तुविशारद अशा अनेक कलाक्षेत्रात डावखुरांचा मोठा वाटा आहे.
* डावखुऱ्या लोकांमध्ये तोतरेपणा आणि डिस्लेक्सियाचे प्रमाण जास्त आहे.
* उजव्या व्यक्तींच्या तुलनेत डावखुऱ्या लोकांना दुखापतीचा जास्त धोका असतो.
========
Panar Leopard : ४०० मनुष्यबळी भारतातल्या सर्वात डेंजर बिबट्याचा दरारा!
========
जगातील सुप्रसिद्ध डावखुऱ्या व्यक्ती
अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, रतन टाटा, करण जोहर, कपिल शर्मा, प्रिन्स विल्यम, केनू रीव्हस, बझ ऑल्ड्रिन, ओप्रा विन्फ्रे, ज्युलिया रॉबर्ट्स, लेब्रॉन जेम्स, नेड फ्लँडर्स, लेडी गागा, बराक ओबामा, निकोल किडमन, जॉन स्टीवर्ट, बेबे रुथ, स्कार्लेट जॉन्सन, ह्यू जॅकमन, कार्डी बी, बिल गेट्स, अँजेलिना जोली, ज्युडी गारलँड, विल फेरेल, मॉर्गन फ्रीमन, डेव्हिड बोवी, सेठ रोजेन, सँडी कौफॅक्स, मार्क झुकरबर्ग, टीना फेस, गॉर्डन रामसे, एम्मा थॉम्पसन, मायकेल विक, जस्टिन बीबर, एमिनेम, बिली रे सायरस आणि रँडी जॉन्सन (Social News)
