१ मे आपल्या सर्वच मराठी बांधवांसाठी महत्वाचा आणि ऐतिहासिक दिवस आहे. याच दिवशी महाराष्ट्राला स्वतंत्र राज्य म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यामुळे १ मे हा दिवस महाराष्ट्र्र दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र यासोबतच १ मे ही तारीख अजून एका गोष्टीसाठी खूपच खास आणि महत्वपूर्ण आहे. याचे कारण म्हणजे १ मे लाच जगभरात कामगिरी दिन देखील साजरा होतो. मे महिन्यातला पहिला दिवस हा संपूर्ण जगभरातील कामगारांना समर्पित केलेला आहे. याला कामगार दिन किंवा लेबर डे असेही म्हणतात. मात्र अनेक देशांमध्ये हा कामगिरी दिन वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. (Labour Day)
१ मे हा दिवस जगभरातील कामगारांना, मजुरांना समर्पित केला जातो. हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय श्रमिक दिवस’ म्हणून सुद्धा ओळखला जातो. १ मेला कामगिरी दिन साजरा करण्यामागे एक मोठे कारण आहे. या दिवसाला एक विशेष इतिहास देखील आहे. कामगिरी दिनाचा इतिहास हा अमेरिकेशी संबंधित आहे. १८८९ मध्ये पहिल्यांदा कामगार दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा दिवस साजरा करण्याची योजना शिकागो, अमेरिकेत सुरू झाली. (Marathi Top News)
हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश मजूर लोकांना त्यांच्या समस्यांची जाणीव करून देणे हा आहे. शिवाय कामगारांचा सन्मान करण्यासोबतच कामगारांच्या हक्कांसाठी आवाज उठवता यावा, कामगारांचे समाजात स्थान अधिक मजबूत व्हावे, या उद्देशानेही हा दिवस साजरा केला जातो. कामगारांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी म्हणून देखील हा दिवस साजरा केला जातो. कोणत्याही देशाच्या विकासात मजुरांची भूमिका महत्त्वाची असते. प्रत्येक कामाचे क्षेत्र कामगारांच्या मेहनतीवर अवलंबून असते. कामगार कोणत्याही विशिष्ट क्षेत्राला चालना देण्यासाठी कठोर परिश्रम करतात आणि त्या देशाच्या विकासात आपले मोठे योगदान देतात. (MArathi Latest News)
कामगार दिन का साजरा करतो?
१३५ वर्षांपूर्वी १८८६ पूर्वी अमेरिकेत एक मोठी चळवळ सुरू झाली. या आंदोलनात हजारो अमेरिकन कामगार रस्त्यावर उतरले. कामगार आपल्या हक्कासाठी संपावर गेले. या आंदोलनाचे मुख्य कारण होते कामगारांच्या कामाचे तास. त्या काळात कामगार २४ तासांपैकी तब्बल १५ – १५ तास काम करायचे. तेथील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी कामाचे तास आठ करण्याची दीर्घ मागणी केल्यानंतर काम बंद केले होते. (Marathi Top Stories)
संप सुरू होऊन चार दिवस उलटले नव्हते, तेव्हा अमेरिकेतील शिकागो येथील हे मार्केटमध्ये स्फोट झाला. यानंतर या स्फोटाला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी आंदोलक कामगारांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात अनेक कामगारांना आपला जीव गमवावा लागला होता. शिवाय या गोळीबारात शेकडो कामगार जखमी देखील झाले. (Social News)
कामगार दिन साजरा करण्याचा प्रस्ताव
या घटनेनंतर तीन वर्षांनी १८८९ मध्ये आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषद भरली. या बैठकीत प्रत्येक मजुराने दिवसाला केवळ ८ तास काम करावे, असा अभूतपूर्व निर्णय घेण्यात आला. या परिषदेनंतर १ मे रोजी कामगार दिन साजरा करण्याचे ठरले. शिवाय दरवर्षी या दिवशी कामगारांना सुटी देण्याचा निर्णयही घेण्यात आला. प्रशासनाला नमते घेत कामगारांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. मात्र अमेरिकेत राष्ट्रीय कामगार दिन सप्टेंबरच्या पहिल्या सोमवारी साजरा केला जातो. नंतर अमेरिकेतील कामगारांप्रमाणेच इतर अनेक देशांतही मजुरांना ८ तास काम करण्याचा नियम लागू करण्यात आला. (Marathi Trending News)
भारतातील कामगार दिवस
अमेरिकेत कामगार दिन साजरा करण्याचा प्रस्ताव १ मे १८८९ रोजी अंमलात आला होता. मात्र भारतात हा दिवस तब्बल ३४ वर्षांनंतर साजरा करण्यास सुरुवात झाली. भारतातही कामगार अत्याचार आणि शोषणाविरुद्ध आवाज उठवत होते. त्यांच्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर १ मे १९२३ रोजी चेन्नईत प्रथमच कामगार दिन साजरा करण्यात आला. श्रमिक किसान पार्टी ऑफ हिंदुस्थानच्या अध्यक्षतेखाली कामगार दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती. अनेक संघटना आणि सामाजिक पक्षांनी या निर्णयाला पाठिंबा दिला.
कामगार दिनाची घोषणा
१८८९ मध्ये पॅरिसमधील आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेसमध्ये कामगार आंदोलनात वीर मरण आलेल्या शहीदांचा सन्मान करण्यासाठी १ मे हा अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय कामगार दिन घोषित करण्यात आला. तेव्हापासून मे दिवस हा कामगार चळवळीतील यश साजरे करण्याचा आणि कामगारांच्या हक्कांचं समर्थन करणारा दिवस म्हणून जगभरात ओळखला जातो.