आधुनिक जगात जीवन जगत असताना आपल्या अनेकदा धकाधकीचे जीवन जगावे लागते. अनेकांना खूप पैसा कमवायचा मोह शांत बसू देत नसतो. तर अनेकांकडे बक्कळ पैसा असतो पण मनाची शांती नसते.
मग अशा परिस्थितीत प्रत्येकाला एकच उपाय दिसतो तो म्हणजे मन एकाग्र करायला लावणारा योगाभ्यास! कारण की योगा केल्याने आपल्या शरीराला जितका फायदा होतो तितकाच फायदा मनालाही होतो. मात्र अनेकांना योगा (Yoga) करण्याचे फायचेच माहीत नाहीत. आज आपण योग दिनानिमित्त (International Day of Yoga) हेच योगा करण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.
१) वजन कमी करण्यास मदत:- कोरोनामुळे अनेकांना वर्क फ्रॉम होम करून लठ्ठपणा आलेला असेल. तसेच माणसाच्या खाण्याच्या सवयी योग्य नसतील तरी सुद्धा लठ्ठपणा येऊ शकतो. पण यावर योगा करणे हा रामबाण उपाय असू शकतो. कारण की, योगामध्ये अशी अनेक आसने अशी आहेत की ज्यामुळे तुमची पचनक्रिया योग्य राहते. त्यामुळे परिणामी तुमच्या शरीरामध्ये चरबी साठू शकत नाही.
२) आरोग्याच्या कमी समस्या:- तुम्ही सुरुवातीपासूनच जर योगा करत असाल तर तुम्हाला म्हातारपणात आरोग्याच्या कमी समस्यांना सामोरे जावे लागते. कारण की, नियमित योगा केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी नियमित योगा केला पाहीजे.

३) ताणतणावपासून मुक्ती मिळते:- तुम्ही सकाळी उठून रोज प्राणायाम आणि मेडिटेशन करत असाल तर तुम्हाला पूर्ण दिवस एनर्जी मिळते आणि तुमच्यामध्ये उत्साह कायम राहतो. त्यामुळे नियमित योगा केल्याने ताणतणावपासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते.
४) शरीरातील साखरेवर नियंत्रण राहते:- हल्ली कोणाला काय होईल सांगता येत नाही. अशातच सर्वसाधारणपणे कोणाला पण उद्घभवणारा आजार म्हणजे डायबेटीस. शरीरामधील इन्सुलीनसचे प्रमाण घटले की, साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे जर तुम्ही रोज योगा करत असाल, तर त्यामुळे शरीरातील साखरेवर नियंत्रण राहते.
५) शरीरात रक्ताभिसरण चांगले होते:- योगा केल्याने शरीराच्या सर्व अवयवांचा व्यायाम होतो. परिणामी श्वासोच्छवास वाढण्यास मदत होते. व श्वासोच्छवास योग्य पद्धतीने घेतला जातो. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते.
६) योगाचे इतर फायदे:- योगा केल्याने शरीर लवचिक होते आणि शरीराची ठेवण सुधारते. महिलांच्या सौंदर्य वाढिसाठी योगा फायदेशीर आहे. तमावमुक्त, आनंदी समाधानी जीवनासाठी नियमित योगा करावा.

आता आपण योगामुळे होणारे फायदे पाहिले. मात्र आता आपण योगा करताना घ्यायची काळजी सुद्धा पाहणार आहोत.
१) योगा करताना सर्वात पहिले सोप्या आसनाने सुरुवात करा आणि मग कठीण आसने करा.
२) योगा केल्यावर लगेच आंघोळ करू नका. कारण योगा केल्याने अंगात उष्णता निर्माण झालेली असते. त्यामुळे त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
३) योगा नेहमी सपाट जमिनीवर, मोकळ्या आणि स्वच्छ हवेत करा. व योगा करत असताना शरीरावर कमीत कमी आणि सैल कपडे घाला.
४) योगा नेहमी सकाळी रिकाम्या पोटी किंवा पोट साफ झाल्यानंतर करा.
५) योगा करताना अनुभवी व्यक्तीची किंवा ट्रेनीची मदत घ्या. तसेच महिलांना मासिक पाळीदरम्यान रक्तस्राव होत असल्यास योगा करू नका.
तर हा होता आजचा आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त आपल्या आरोग्यविषयक फायदेशीर सल्ला. त्यामुळे आता वाट न बघताच आजच्याच दिवसापासून योगा करायला सुरुवात करा आणि निरोगी रहा.
आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या टीम क फॅक्टस तर्फे हार्दिक शुभेच्छा…!
– निवास उद्धव गायकवाड