अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या ज्या पद्धतीनं वागत आहेत, आणि बोलत आहेत, त्यात त्यांनी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांनाही मागे टाकलं आहे. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतल्यावर ट्रम्प यांची आत्मप्रौढी एवढी वाढली आहे की, त्यांनी फ्रान्स, ब्रिटन, चीन, कॅनडा या देशांच्या प्रमुखांची आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरुन खिल्ली उडवली आहे. एकीकडे ग्रीनलॅंड ताब्यात घेण्याची वल्गना करणारे ट्रम्प दुसरीकडे इराणमध्ये निदर्शकांना सरकारी इमारती ताब्यात घेण्याचे आवाहन करत आहेत. सोबतच कॅनडासह अवघ्या युरोपला आपल्या टेरिफ कार्डाची भीती दाखवत आहेत. ट्रम्प यांच्या या वर्तनामुळे त्यांना इंटरनॅशनल गुंडा ही उपाधी देण्यात आली आहे. अर्थात ट्रम्प यांनी स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक मंचमध्ये व्याख्यान देतांना स्वतःला हुकुमशहा म्हणवून घेतलं. या व्याख्यानासाठी ट्रम्प यांना ४५ मिनिटे देण्यात आली होती, पण ट्रम्प यांनी आपल्या भाषणासाठी ७० मिनिटे घेतली. या सत्तर मिनिटामध्ये त्यांनी आपण किती ग्रेट आहोत, आणि अन्य देशांच्या नेत्यांनी कसे वागले पाहिजे, यावरच अधिक भर दिला. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भविष्यात अमेरिकेमध्येच आर्थिक मंदिचे वादळ येणार असल्याची त्यामुळे चर्चा सुरु झाली आहे. ( Dictator Donald Trump )

Dictator Donald Trump
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या जागतिक राजकारणातील केंद्रबिदू ठरले आहे. एरवीही अमेरिकेचा अध्यक्ष हा काय बोलतो, काय निर्णय घेतो, याकडे अवघ्या जगाचे लक्ष असायचे. पण ट्रम्प यांनी आपल्या हुकुमशाही वृत्तीमुळे अवघं जग त्रासलं आहे. आता तर हद्दच झाली असून ट्रम्प यांनी स्वतःला हुकुमशहा बोलण्यास सुरुवात केली आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक मंचमध्ये ट्रम्पचे झालेले भाषण हे असेच जगाला अस्वस्थ करणारे ठरले आहे. ट्रम्प यांनी या भाषणात स्वतःची वारेमाप स्तुती केली, आणि युरोप, चीनसह अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांवर टीकेची झोड उडवली आहे. त्यांचे हे भाषण सुरु असतांना संपूर्ण सभागृहात अस्वस्थता होती.
दावोसमधील भाषणाची सुरुवातच ट्रम्प यांनी युरोपवर टीका करुन केली. युरोपीय नेत्यांना त्यांचा स्वतःचा देश सांभाळता येत नाही, असे सांगून ट्रम्प यांनी अवघा युरोप चुकीच्या दिशेनं जात असल्याचे सांगितले. युरोप चीनवर अवलंबून राहिला आहे, आणि या युरोपीयन नेत्यांना चीननं मूर्ख बनवलं असल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले. यासोबत ट्रम्प यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉनचीही खिल्ली उडवली. शिवाय फ्रान्स गेल्या 30 वर्षांपासून अमेरिकेचा फायदा घेत आहे, मात्र आता फ्रान्सला कुठलाही फायदा होऊ देणार नसल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. त्यानंतर ट्रम्पनी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांना अमेरिकेमुळे कॅनडा जिवंत असल्याचे सांगितले. ( Dictator Donald Trump )
यापुढे जात ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की या दोघांनाही मूर्ख म्हणून संबोधले. नाटोचे प्रमुख मार्क रुटे यंनाही ट्रम्पंनी सोडले नाही. तर डेन्मार्कचा उल्लेख त्यांनी कृतघ्न म्हणून केला. ट्रम्प यांनी या संपूर्ण भाषणात स्वतःचे जेवढे कौतुक केले, तेवढीच अन्य नेत्यांचे धोरण कसे चुकते आहे, यावर बोट ठेवलेच शिवाय अमेरिकेशिवाय या जगातील कुणाचेही पान हलू शकत नाही, असा दावाही ठोकला. मुख्यम्हणजे ट्रम्प हे भाषण देत होते तेव्हा उपस्थितांमध्ये अस्वस्थता होती. या भाषणानंतरही ट्रम्प यांचा हा अहंकार अमेरिका आणि जगाला एका नव्या युद्धाच्या दिशेनं घेऊन जाणार असल्याची चिंताच व्यक्त करण्यात आली.
सर्वात कहर म्हणजे, या भाषणात ट्रम्प यांनी ग्रीनलॅंड हा बर्फाचा तुकडा आहे, तो परत देण्याचा अमेरिकेचे निर्णय मूर्खपणाचा होता, त्यामुळेच आता अमेरिका ग्रीनलॅंडचा ताबा घेत असल्याचे भर भाषणात सांगितले. आंतरराष्ट्रीय मंचवरुन असा दावा ट्रम्प यांनी केल्यामुळे उपस्थितांमध्ये खळबळ उडाली. मात्र याकडे दुर्लक्ष करुन ट्रम्प यांनी मी एक हुकूमशहा आहे, कधीकधी तुम्हाला हुकूमशहाची गरज असते, असे सांगून स्वतःचीच पाठ थोपटून घेतली आहे. ( Dictator Donald Trump )
=======
हे देखील वाचा : Greenland VS USA : ग्रीनलॅंडचा वितळता बर्फ
=======
ट्रम्प यांचे भाषण झाल्यावर ब्रिटिश खासदार एड डेव्ही यांनी ट्रम्प यांचा आंतराराष्ट्रीय गुंड असा उल्लेख केला आहे. ब्रिटिश परराष्ट्र मंत्री यवेट कपूर यांनीही असाच ट्रम्प यांचा उल्लेख केला आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी तर ट्रम्प यांची विधाने ही जागतिक शांतीसाठी धोकादायक असल्याचे सांगितले आहे. अमेरिकन राष्ट्रपतींच्या इतिहासकार बारबरा पेरी यांनीही ट्रम्प यांच्या विधानांचा समाचार घेतला आहे.
ट्रम्प यांच्या या भाषणानंतर अनेकांना डॉ. बँडी ली यांचीही आठवण झाली. डॉ. बँडी ली यांचे द डेंजरस केस ऑफ डोनाल्ड ट्रम्प: हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. यात २७ मानसोपचारतज्ज्ञांनी ट्रम्प यांच्या धोकादायक वर्तनाचे वर्णन केले आहे. त्यामुळेच ट्रम्प हे तिस-या महायुद्धाची नांदी करुन देणारे नेता ठरार अशी चर्चा आता सुरु झाली आहे. ( Dictator Donald Trump )
सई बने
