Home » Intermittent Fasting: इंटरमिटेंट फास्टिंगने खरंच वजन कमी होते का? जाणून घ्या या बद्दल अधिक 

Intermittent Fasting: इंटरमिटेंट फास्टिंगने खरंच वजन कमी होते का? जाणून घ्या या बद्दल अधिक 

0 comment
Intermittent Fasting
Share

आजच्या फिटनेस फ्रीक जगात स्लिम-ट्रिम आणि फिट दिसण्याची प्रत्येकाची इच्छा असते. वजन कमी करण्यासाठी तासनतास जिममध्ये व्यायाम करणे आणि बराच वेळ उपाशी राहणे यासारख्या गोष्टी केल्या जातात.आजकाल केवळ भारतातच नाही तर जगभरात मुले, स्त्रिया आणि पुरुष वाढते वजन किंवा जास्त चरबीच्या समस्येने त्रस्त आहेत. यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक विविध उपायांचा अवलंब करत आहेत, कारण या चरबीच्या समस्येमुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हल्ली खुप वेगवेगळ्या डाइट चे प्रकार समोर येऊ लागले आहेत. आणि त्यातलेच साध्य खुप चर्चेत असलेले नाव म्हणजे ‘इंटरमिटेंट फास्टिंग‘ . अधूनमधून ‘इंटरमिटेंट फास्टिंग’ ही एक पद्धत आहे जी खूप लक्ष देऊन केली पाहिजे. मात्र वजन कमी करण्याचा हा एक चांगला मार्ग मानला जात आहे. या इंटरमिटेंट फास्टिंग ची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वजन कमी करताना तुम्हाला अशक्तपणा जाणवत नाही. असे असले तरीही हे इंटरमिटेंट फास्टिंग सगळ्यांनाच जमेल अस नाही. पण हे इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे नेमक काय? त्यात काय आणि कस करायच असत हे आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.(Intermittent Fasting)

Intermittent Fasting
Intermittent Fasting


इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय?

अधूनमधून उपवास करणे ही वजन कमी करण्याची नवीन पद्धत आहे. हल्ली लोकांमध्ये ही खूप लोकप्रिय देखील आहे. अधूनमधून उपवास करणे हे इंटरमिटेंट फास्टिंग करण्यासारखेच आहे, परंतु यामध्ये आपल्याला संपूर्ण दिवसासाठी नव्हे तर काही तास उपवास करणे आवश्यक आहे. याच्या मदतीने तुम्ही कमी वेळात जास्तीत जास्त वजन कमी करू शकता. म्हणजे भूक न लागता तुम्ही पटकन स्वत:ला स्लिम करू शकता. या इंटरमिटेंट फास्टिंगची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपल्याला संपूर्ण दिवसासाठी नव्हे तर थोड्या काळासाठी उपवास करावा लागतो. यामुळे शरीर संतुलित राहते आणि चरबी कमी होते. यामध्ये तुम्ही संध्याकाळी काहीतरी खाऊ शकता, त्यानंतर दुसऱ्या दिवशी डिनर आणि ब्रेकफास्ट वगळावा लागेल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. याने तुम्ही स्वतःला 14-16 तास उपाशी ठेवता. आणि अस केल्याने तुमचे वजन झपाट्याने कमी होऊ लागते.

Intermittent Fasting
Intermittent Fasting

कधी आणि कसे कराल?

जर तुम्ही वजन कमी करण्याची योजना आखत असाल तर एकदा तरी हे  इंटरमिटेंट फास्टिंग नक्की करा आणि तुम्हाला ते जमाल तर अधुन मधून ते करत रहा.या इंटरमिटेंट फास्टिंग मध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे जास्तीत जास्त वेळ आपण काहीही खाऊ नये. कारण जेव्हा आपण बराच वेळ उपाशी असता तेव्हा आपले वजन लवकर कमी होते.वेळेच्या दृष्टीने पाहिलं तर अधूनमधून इंटरमिटेंट फास्टिंग करण्याची उत्तम वेळ रात्री ८ ते दुपारी १२ अशी आहे. कारण तुम्ही बराच वेळ झोपत असता आणि उर्वरित वेळेत आपण आपल्या आहाराचे नियोजन करू शकता.

इंटरमिटेंट फास्टिंग केल्याने खरच वजन कमी होते का?

होय, वजन कमी करण्यासाठी अधूनमधून इंटरमिटेंट फास्टिंग करणे खूप उपयुक्त ठरू शकते. अधूनमधून इंटरमिटेंट फास्टिंग केल्याने शरीराचे चयापचय वेगवान होते, त्यामुळे शरीरातील वजन कमी होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, अधूनमधून इंटरमिटेंट फास्टिंग केल्याने जेवणाच्या वेळी शरीरात तयार होणारे इन्सुलिन आणि घ्रेलिन सारख्या हार्मोन्ससाठी जबाबदार असतात आणि वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात. तसेच अधूनमधून इंटरमिटेंट फास्टिंग केल्याने या हार्मोन्सचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. परंतु हे लक्षात ठेवा की अधूनमधून इंटरमिटेंट फास्टिंग करणे ही केवळ वजन कमी करण्याची पद्धत नाही, हे आपले आरोग्य सुधारण्यास देखील मदत करते. असे केल्याने तुमचा रक्तदाब आणि इन्सुलिन संतुलित राहते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो. याव्यतिरिक्त, बराच वेळ खाणे आपल्या अन्नाचे प्रमाण नियंत्रित करते ज्यामुळे कदाचित आपल्या खाण्याच्या सवयी सुधारतात.(Intermittent Fasting)

============================================

हे देखील वाचा: Home Remedies for Pigmentation: चेहऱ्यावरील वांग आणि सुरकुत्या घालवण्यासाठी फॉलो करा ‘हे’ घरगुती उपाय 

============================================

एक लक्षात घ्या एखादी गोष्ट इतरांना जमली म्हणजे ती तुम्हाला ही सहज शक्य होईल असे नाही त्यामुळे तुम्हाला इंटरमिटेंट फास्टिंग करणे जमत नसेल तर सुरुवातीला कमी तास इंटरमिटेंट फास्टिंग करण्याचा प्रयत्न करा आणि ननतर हळूहळू त्याची वेळ वाढवा.

(डिस्क्लेमर: वरील लेख केवल माहितीच्या आधारावर ;लिहिण्यात आलेला आहे. यातील गोष्टी करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)   


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.