Home » पोटाची चरबी कमी करण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंगमुळे कॅन्सरचा धोका

पोटाची चरबी कमी करण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंगमुळे कॅन्सरचा धोका

by Team Gajawaja
0 comment
Intermittent Fasting
Share

पोटाची चरबी कमी करण्यासाठी वेगाने वजन कमी करण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंगसह काही ट्रेंन्डिंग पद्धती वापरल्या जातात. वजन वाढल्यानंतर त्रस्त झालेली लोक वर्कआउट ट्रिक्स आणि महागडे डाएट प्लॅन फॉलो करतात. ही पद्धत रिजल्ट ही देते. पण प्रत्येक गोष्टीच्या फायद्यासह नुकसान ही असते. तर इंटरमिटेंट फास्टिंग करत असलेल्या लोकांबद्दल एक नुकताच रिपोर्ट छापून आला. उंदरांवर रिसर्च करण्यात आला की, इंटरमिटेंट फास्टिंगच्या कारणास्तव ९० टक्के नुकसान वाइट ब्लड सेल्सला झाले. हे सेल्स सूज आणि आजारांच्या विरोधात लढण्यासाठी कामी येते. (Intermittent Fasting)

रिपोर्ट असा सांगतो की, फास्टिंगच्या कारणास्तव हृदयासंबंधित आजार आणि कॅन्सर सारखे आजार होण्याचा धोका वाढतो. न्यू यॉर्क सिटीच्या एका रुग्णालयातील डॉ. फिलिप स्वीर्स्की एक इम्युनोलॉजिस्ट आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की, इम्युन सेल्स आजारांच्या विरोधात लढण्यासाठी महत्वाची भुमिका निभावतात. त्यामुळेच त्यांना नुकसान पोहचवण्यापासून बचाव केला पाहिजे. त्याचसोबत त्याची काम करण्याची पद्धत ही समजून घेतली पाहिजे.

इंटरमिटेंट फास्टिंगमध्ये लोक खुप तास उपाशी राहतात आणि काही दिवसांपर्यंत ब्रेकफास्ट न करण्याचा सुद्धा समावेश असतो. डॉक्टरांचे असे मानणे आहे की, नाश्ता न करण्याची सवय मधुमेहाचे कारण ठरु शकते. हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर एंटिसन सुद्धा इंटरमिटेंट फास्टिंगचे रुटीन फॉलो करते.

डॉ. फिलिप असे सांगतात की, फास्टिंगची ही पद्धत फार ट्रेंन्डिंग आहे. पण यामुळे काही नुकसान ही होते. रिसर्चमध्ये उंदरांना दोन हिस्स्यात विभागले गेले. ज्यामध्ये एका ग्रुपला नॉर्मल फूड तर दुसऱ्या ग्रुपमध्ये फास्टिंगवर ठेवण्यात आले. वैज्ञानिकांना रिसर्चमध्ये असे दिसून आले की, बोर्न मॅरोमध्ये असलेले वाइड ब्लड सेल्सला इंफ्केशन झाले होते. ज्यामुळे हृदय आणि कॅन्सर सारख्या आजारांचा धोका वाढतो. रिसर्चचा असे म्हणणे आहे की, वजन कमी करण्यासाठी फास्टिंग फॉलो करणे उत्तम आहे. पण याचे अति वापर जीवघेणा ठरु शकतो. या रुटीनला फॉलो करण्यापू्र्वी सल्ला घेणे गरजेचे आहे. (Intermittent Fasting)

हे देखील वाचा- उन्हाळ्यात पोट फुगलेले दिसते आणि भुक ही लागत नाही? ‘या’ गोष्टींचे करा सेवन

इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय?
तज्ञांच्या मते, इंटरमिटेंट फास्टिंग हा एक खाण्याच्या पद्धतीवर नियंत्रण ठेवण्याचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये व्यक्ती संपूर्ण दिवसभरात एक निश्चित वेळेवर खाणं खावे लागते. अन्य तासांमध्ये उपवास केला जातो. इंटरमिटेंट फास्टिंग खाण्याची एक पद्धत तयार करतो, त्यामधील सर्वाधिक फॉलो केली जाणारी पद्धत ही 16:8 पॅटर्न आहे. यामध्ये व्यक्ती केवळ ८ तासांदरम्यान खाणं आणि अन्य पोषक पदार्थ खाल्ले जाऊ शकतात. तर अन्य १६ तास केवळ पाणी पिऊन उपवास करावा लागतो. या व्यतिरिक्त काही लोक अल्टरनेट डे वेळी उपवास करत वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.