Home » Budget : भारतीय अर्थसंकल्पाशी संबंधित रंजक गोष्टी

Budget : भारतीय अर्थसंकल्पाशी संबंधित रंजक गोष्टी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Budget
Share

उद्या १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन भारताचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. संपूर्ण देशाचे या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग 9 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन रविवारी सकाळी ११ वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. संसदीय इतिहासात यंदा प्रथमच 1 फेब्रुवारी रोजी म्हणजेच रविवारी सुट्टीच्या दिवशी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. भारताच्या अर्थसंकल्पाला मोठा इतिहास आहे. अगदी ब्रिटिशांच्या काळापासून हा अर्थसंकल्प सादर केला जातो. (Budget)

ब्रिटीश राजवटीत सादर करण्यात आला आणि ७ एप्रिल १८६० रोजी ब्रिटिश सरकारचे अर्थमंत्री जेम्स विल्सन यांनी त्याचे वाचन केले. स्वातंत्र्यानंतर, भारताचा पहिला अर्थसंकल्प २६ नोव्हेंबर १९४७ रोजी भारताचे पहिले अर्थमंत्री आरके षण्मुखम चेट्टी यांनी सादर केला होता. तर प्रजासत्ताक भारताचा पहिला अर्थसंकल्प जॉन मथाई यांनी २८ फेब्रुवारी १९५० रोजी सादर केला होता. भारताच्या अर्थसंकल्पाशी संबंधित काही रंजक गोष्टी आज आपण या लेखातून जाणून घेऊया. (Nirmala Sitaraman)

स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष भारताचा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळी ५:०० वाजता सादर केला जात असे. ब्रिटीशकाळात सायंकाळी ५ वाजता बजेट सादर केले जायचे. कारण भारतात सायंकाळी ५ वाजले असताना लंडनमध्ये सकाळचे ११.३० वाजलेले असतात. ही परंपरा स्वातंत्र्यानंतरही १९९९ पर्यंत चालली होती. मात्र, १९९९ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी ही परंपरा मोडीत काढून अर्थसंकल्प मांडण्याची वेळ सकाळी ११:०० वाजता केली. त्यानंतर २०१७ मध्ये अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवसाऐवजी १ फेब्रुवारी रोजी सादर करण्यास सुरुवात केली. (Marathi)

बजेट सादर होण्याच्या साधारण १० दिवस आधी अर्थमंत्रालयात हलवा सेरेमनी आयोजित केली जाते. ही भारतीय परंपरेतील शुभ कार्याची सुरुवात गोड पदार्थाने करण्याची रित आहे. अर्थमंत्री स्वतः हा हलवा हलवतात आणि अधिकाऱ्यांना वाढतात. हा समारंभ म्हणजे बजेटच्या छपाई प्रक्रियेची सुरुवात मानली जाते. एकदा का हा सोहळा झाला की, अर्थमंत्रालयातील संबंधित अधिकारी आणि कर्मचारी बाह्यजगाशी संपर्क तोडून नॉर्थ ब्लॉकच्या कार्यालयात ‘लॉक-इन’ होतात. बजेटची माहिती फुटू नये म्हणून ही कडक गुप्तता पाळली जाते. (Todays Marathi Headline)

Budget

१९५० च्या आधी भारताचे संसदेत सादर होणारे बजेट हे राष्ट्रपती भवनात छापले जायचे. एक वर्षी बजेट लिक झाले. तेव्हापासून बजेटची प्रिटींग नॉर्थ ब्लॉकच्या एका बेसमेंटमध्ये एका गुप्त बंकरमध्ये होते. बजेटमध्ये सामील सुमारे १०० लोकांना ८ ते १० दिवस आधीच येथे लॉक इन केले जाते. त्यांच्याकडे मोबाईल, इंटरनेट किंवा बाहेरील कोणताही संपर्क नसतो. बजेट गुप्त ठेवण्यासाठी आजही हा पायंडा आहे. संसदेत बजेट सादर होईपर्यंत ते एकाच ठिकाणी राहतात. (Marathi News)

दशकानुदशके अर्थमंत्री लाल रंगाची चामड्याची ब्रीफकेस घेऊन संसदेत येत असत, जी ब्रिटीश ‘बजेट बॉक्स’ची नक्कल होती. पण २०१९ मध्ये निर्मला सीतारामन यांनी ही प्रथा बदलली आणि लाल कापडात गुंडाळलेला पारंपारिक ‘बही-खाता’ आणला. पुढे २०२१ मध्ये कोरोना महामारीमुळे अर्थसंकल्प पूर्णपणे पेपरलेस झाला. आता अर्थमंत्री टॅब्लेटद्वारे भाषण वाचतात, जो त्याच लाल रंगाच्या ‘बही-खाता’ स्टाईलच्या कव्हरमध्ये असतो. २०२१ सालाचे हे बजेट देशातील पहिले ‘पेपरलेस बजेट’ होते. त्याच्या सर्व प्रती डिजिटल पद्धतीने साठवल्या गेल्या. त्यानंतर २०२२ चा अर्थसंकल्पही पेपरलेस होता. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात आणखी एक बदल केला. त्यांनी बजेटशी संबंधित कागदपत्रे वाहून नेण्यासाठी ब्रीफकेस वापरणे बंद केले. (Latest Marathi HEadline)

सर्वात लांब बजेट भाषण करण्याचा विक्रम निर्मला सीतारामन यांच्या नावावर आहे. २०२० मध्ये त्यांनी २ तास ४२ मिनिटे भाषण केले होते. या भाषणादरम्यान त्यांची प्रकृती थोडी बिघडली होती, त्यामुळे भाषणाची शेवटची दोन पाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी वाचली होती. शब्दांच्या बाबतीत विचार केला तर, १९९१ मध्ये मनमोहन सिंग यांचे भाषण १८,६५० शब्दांचे होते. साल १९७७ मध्ये अंतरिम अर्थमंत्री हीरूभाई एम. पटेल यांनी केवळ ८०० शब्दात बजेट जारी केले होते. ते केवळ अंदाजित खर्च वाचून खाली बसले होते. (Top Marathi News)

संसदेत दोन अर्थसंकल्प सादर केले जात होते, एक ‘रेल्वे अर्थसंकल्प’ आणि दुसरा ‘सामान्य अर्थसंकल्प’. २१ सप्टेंबर २०१६ रोजी भारत सरकारने रेल्वे अर्थसंकल्पाचे सर्वसाधारण अर्थसंकल्पात विलीनीकरण करण्यास मान्यता दिली. १ फेब्रुवारी २०१७ रोजी देशाचा पहिला संयुक्त अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात आला. रेल्वेसाठी स्वतंत्र अर्थसंकल्पाची प्रथा १९२४ मध्ये सुरू झाली. अ‍ॅक्वर्थ समितीच्या शिफारशींच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला. (Latest Marathi News)

१९७३-७४ सालातल्या अर्थसंकल्पाला देशाचे ‘काळे अर्थसंकल्प’ म्हटले जाते. तत्कालीन अर्थमंत्री यशवंतराव बी. चव्हाण यांनी ते सादर केले होते. या अर्थसंकल्पात ५५० कोटी रुपयांची तूट होती. त्यावेळेपर्यंतची ही सर्वात मोठी अर्थसंकल्पीय तूट होती. १९७१ मध्ये पाकिस्तानशी झालेल्या युद्धामुळे आणि खराब पावसाळ्यामुळे या बजेटवर परिणाम झाला. (Top Trending Headline)

=======

Budget : सर्वाधिक वेळा बजेट सादर करणारे अर्थमंत्री

UK Poverty Crisis : राजाचा देश गरीब होतोय

=======

भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री म्हणून इंदिरा गांधी यांनी १९७० मध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी त्या देशाच्या पंतप्रधान होत्या. भारताच्या इतिहासात अशा तीन घटना घडल्या ज्यावेळी अर्थमंत्र्यांच्या ऐवजी पंतप्रधानांनी बजेट सादर केले. आधी १९५८ मध्ये देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरु यांनी बजेट सादर केले.यानंतर साल १९७० मध्ये मोरारजी देसाई यांच्या राजीनाम्यानंतर इंदिरा गांधी आणि नंतर राजीव गांधी यांनी पंतप्रधानांनी बजेट सादर केले. (Top Stories)

सोबत अर्थमंत्रालयाचा कार्यभारही त्यांच्याकडे होता. तर स्वातंत्र्याआधी भारताचे बजेट लियाकत अली खान यांनी ‘गरीब आदमी का बजेट’ नावाने सादर केले होते. ज्यात श्रीमंतांवर कर लावण्यात आले होते. स्वांतत्र्यावेळी फाळणी होऊन लियाकत अली खान पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.