बहुतांश पालक आपल्या मुलांना उत्तम शिक्षण मिळावे म्हणून चाइल्ड इंन्शुरन्स किंवा चाइल्ड इन्वेस्टमेंट प्लॅनमध्ये गुंतवणूक करतात. परंतु काही चुकांमुळे त्यांना कमी रिटर्न्स मिळतात. सध्याच्या काळात शाळा ते उच्च शिक्षणासाठी अधिक पैशांची गरज भासते अशातच जर तुम्ही १०-१५ वर्षांपासूनच योग्य प्लॅनिग केल्यास तुम्ही पुरेसा फंड एकत्रित करु शकता. परंतु पॉलिसी धारकांनी लक्षात ठेवावे की, ते किती जोखीम स्विकारण्यास तयार आहेत. जेवढी अधिक रिस्क तेवढेच अधिक रिटर्न्स ही गोष्ट जरी योग्य असली तरीही प्लॅन समजून घेतल्याशिवाय तुमच्या मेहनीताचा पैसा लावणे हे तुम्हाला काही वेळेस धोक्यात आणू शकते. त्यामुळे विशेतज्ञ असे सांगतात की, लॉन्ग-टर्म इन्वेस्टमेंटसाठीच गुंतवणूक करावी आमि मध्यम स्तरातील जोखिमेसह पुढे जावे.(Insurance plan for children)
–इंफ्लेशन रेटवर सुद्ध लक्ष ठेवा
तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी आज पासून ते पुढील ५-१० वर्षानंतर जो खर्च होईल त्यामध्ये महागाई दर जोडल्यास उत्तम. असे समजा, आजच्या काळाच एखाद्या कोर्सची फी १० लाख रुपये आहे परंतु येणाऱ्या १०-१५ वर्षात १० लाखांच्या किंमतीत वर्षानुवर्षे ५ टक्के दराने वाढ झाल्याने मुलाच्या शिक्षणासाठी २१.०७ लाख रुपये मोजावे लागतील. त्यासाठी पालकांनी इंफ्लेशन रेटवर गुंतवणू करताना लक्षात घ्यावे.
–प्रथम स्वत:चा इंन्शुरन्स काढा
चाइल्ड इंन्शुरन्स प्लॅन घेण्यापूर्वी पालकांना स्वत:चा इंन्शूरन्स काढावा. म्हणजेच जर तुमचा मृत्यू झाल्यास इंन्शुरन्समुळे मिळाऱ्या सुविधांचा फायदा संपूर्ण परिवाराला आर्थिक रुपात मदत करेल. परंतु लक्षात ठेवा आपल्यासाठी इंन्शुरन्स घेताना संपूर्ण परिवाराचा सुद्धा त्यात समावेश होईल याची काळजी घ्या आणि नंतरच चाइल्ड इंन्शुरन्स प्लॅनमध्ये गुंतवणूक करा.
हे देखील वाचा- स्मॉल कॅप फंडमध्ये गुंतवणूक करताना कधीच करु नका ‘या’ चुका
-वेळेबद्दल लक्षात ठेवा
तुमच्या मुलाच्या भविष्यातील गरजा आणि पॉलिसी टर्म हा मिळताजुळता असणे फार महत्वाचे आहे. जर १५ वर्षानंतर उच्च शिक्षणासाठी फंड जमा करायचे असतील तर १५ वर्षांहून कमी किंवा अधिक पॉलिसी टर्म निवडण्याने फायदा होणार नाही.(Insurance plan for children)
-गुंतवणूकीसाठी वेळ दवडू नका
गुंतवणूक करण्यासाठी वेळ लावणे हे सर्वसामान्य चूक आहे. परंतु तुम्ही गुंतवणूक ही जेवढ्या उशिरा कराल तेवढेच तुम्हाला कमी रिटर्न्स मिळतील. मुलं जन्माला आल्यानंतर गुंतवणूक करण्यास सुरुवात करावी. असे समजा तुम्ही तुमच्या मुलाच्या जन्मापासूनच प्रत्येक महिन्याला १० हजार रुपये गुंतवणूक केल्यास तुम्हाला १५ टक्के दराने रिटर्न्स मिळत असतील तर तुमचे मुलं २० वर्षांचा होईल तेव्हा त्याला १.३३ कोटी रुपयांचा फंड अगदी सहज मिळेल.