इंस्टाग्रामचा वापर गेल्या काही काळापासून अधिकाधिक केला जात आहे. २०१० च्या लॉन्चिंगनंतर या फोटो शेअरिंग अॅपने काही फिचर्स सुद्धा युजर्ससाठी रोलआउट केले. त्यामुळे लोक त्याचा अधिकाधिक आता वापर करु लागले आहेत. स्टोरी फिचर नंतर रिल्समुळे हे अॅप आता तरुणांमध्ये लोकप्रिय झाले आहे. इंस्टाग्रामवर स्टोरीत फोटो किंवा क्लिप अपलोड केल्यानंतर ते आपोआप २४ तासात निघून जातात. या व्यतिरिक्त इंस्टाग्रांवर काही वेळेस आपली फिड मीडियामध्ये सेव करण्यासह दुसऱ्यांचे व्हिडिओ किंवा फोटो सुद्धा सेव करण्याचा ऑप्शन आपल्याला दिला जातो. (Instagram Video Downloads)
मात्र युजर्स आपले व्हिडिओ इंस्टाग्रामवरील स्टोरीतून सेव करु शकतात. मात्र दुसऱ्यांच्या फोटोसोबत असे करता येत नाही. काही वेळेस कामासाठी आपल्याला दुसऱ्यांच्या मीडिया फाइल्स सेव कराव्या लागतात. तर जाणून घेऊयात इंस्टाग्रामवरुन व्हिडिओ कशा पद्धतीने डाऊनलोड करण्यासह सेव करता येऊ शकतात त्याबद्दल अधिक.

हे काम करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन टूलची मदत घेऊ शकतात. मात्र लक्षा असू द्या की, हे टूल वापरताना खुप जाहिराती तु्म्हाला दाखवल्या जातात.
-सर्वात प्रथम तुमचे इंस्टाग्रामचे अकाउंट लॉग इन करा. व्हिडिओच्या वरील बाजूस डाव्या बाजूला तीन डॉट दिसतील त्यावर क्लिक करा. आता त्याची लिंक कॉपी करा.
-आता TinyWow वेबसाइटला भेट द्या आणि व्हिडिओ टॅबवर क्लिक करा
-खाली स्क्रोल केल्यानंतर इंस्टाग्राम डाउनलोड बटण शोधा
-आता लिंक येथे URL बॉक्समध्ये टाका आणि Find वर क्लिक करा (Instagram Video Downloads)
-एकदा प्रोसेस झाल्यानंतर डाउनलोडसाठी निळ्या रंगाच्या बटणावर क्लिक करा. जेथे तुम्हाला व्हिडिओ सेव करायचा आहे ते निवडा
हे देखील वाचा- WhatsApp वर लवकरच मिळणार ‘हे’ धमाकेदार फिचर्स
या व्यतिरिक्त गुगल प्ले स्टोरवर काही प्रकारचे स्क्रिन रेकॉर्डर आहेत. ज्याच्या सहाय्याने तुम्ही फोनच्या माध्यमातून कोणताही व्हिडिओ रेकॉर्ड करु शकता. याचसोबत इंस्टाग्रामवर Parental Supervision नावाचे सुद्धा एक भन्नाट फिचर उपलब्ध आहे. या फिचरच्या मदतीने तुम्ही १३-१७ वयोगटातील मुलांचे इंस्टाग्राम अकाउंट कंट्रोल करु शकता. याचा वापर करण्याची परवानगी मुल आणि पालकांना द्यावी लागते. हे फिचर रिमूव केल्यानंतर लगेच दुसऱ्या व्यक्तिला या संदर्भातील नोटिफिकेशन पाठवले जाते. जर तुमचे मुलं इंस्टाग्रामचा अधिकाधिक वापर करत असेल आणि तुम्हाला त्याच्या अॅक्टिव्हिटीवर नजर ठेवायची असेल तर हे फिचर बेस्ट आहे.