Home » इंस्टाग्राम पोस्ट करताना लिहिलेल्या माहितीचा फॉर्मेट ‘या’ सोप्प्या पद्धतीने बदला

इंस्टाग्राम पोस्ट करताना लिहिलेल्या माहितीचा फॉर्मेट ‘या’ सोप्प्या पद्धतीने बदला

by Team Gajawaja
0 comment
Insta Post Format
Share

इंस्टाग्राम सध्या एक असे सोशल मीडिया अॅप बनले आहे, जेथे लोक तास् न तास रिल्स पाहतात. त्याचसोबत बहुतांश लोक स्वत:लाच एका इंफ्लूएंसरच्या रुपात सादर करतात. व्हिडिओ बनवतात आणि ते काही वेळेस व्हायरल ही होतात. या दरम्यान, इंस्टाग्रामवर पोस्ट करताना डिस्क्रिप्शनचा फॉर्मेट बदलण्याची सुविधा सुद्धा असते. काही युजर्सला त्या बद्दल माहिती नसते. याच बद्दल आम्ही तुम्हाला अधिक सांगणार आहोत.(Insta Post Format)

-सर्वात प्रथम तुम्ही जसे इंस्टाग्रामवर पोस्ट करता. त्याच पद्धतीने तुमचा फोटो पोस्ट करा. पुन्हा एकदा जेव्हा पोस्ट शेअर होईल तेव्हा आपल्या प्रोफाइलवर जा आणि शेअर करण्यात आलेली पोस्ट सुरु करा.
-आपल्या फोटो किंवा व्हिडिओ समोर असलेल्या तीन डॉट मेन्यू बटणावर टॅप करा
-एडिट नावाने दिसत असलेल्या ऑप्शनवर क्लिक करा
-तुमच्या फोटोखाली उजव्या बाजूला Edit Alt Text च्या ऑप्शनवर टॅप करा

इंस्टा कॅप्शन का गरजेचे असते?
काही वेळेस युजर विचार करतात की, आपण कॅप्शन शिवाय पोस्ट केल्यास तर काय नुकसान होईल? खरंतर इंस्टावर महिन्याला १ बिलियनहून अधिक युजर्स आहेत. ज्यामध्ये ५०० मिलियनहून अधिक लोक प्रतिदिन प्लॅटफॉर्मचा वापर करतात. त्यामध्ये कमीत कमी ५३ मिनिट वेळ घालवतात. आता लोक ऐवढे लोक अॅक्टिव्ह असतात तर आपली गोष्ट समोरच्या व्यक्ती पर्यंत पोहचवणे गरजेचे असते. जेव्हा कॅप्शनसह हॅशटॅग वापरतो तेव्हा तो व्हायरल होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे नेहमीच सोशल मीडिया तज्ञांकडून याचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो.(Insta Post Format)

हे देखील वाचा- सोशल मीडिया फ्रेंडली Hashtags साठी ‘या’ वेबसाइट्स येतील कामी

कशा प्रकारे स्मार्ट कॅप्शन लिहिले जाते?
कॅप्शन लिहिण्यासाठी काही नियमांकडे लक्ष द्यावे लागते. काहीही लिहिल्यानंतर पोस्ट अधिक लोकांपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे पोस्ट करतेवेळी लक्षात ठेवा की, तुमची पोस्ट नक्की कशा संदर्भात आहे. कोणती व्यक्ती त्यामध्ये सहभागी आहे. तुमच्या फॉलोअर्सला काय आवडते. जर तुम्ही त्या पद्धतीने लिहत असाल तर पोस्ट अधिक व्हायल होऊ शकते.

तर नुकत्याच इंस्टाग्रामने युजर्ससाठी फोकस आणि टाइम मॅनेजमेंटला वाढवण्यासाठी एक नवे फिचर Quiet Mode ची घोषणा केली आहे. या फिचरच्या माध्यमातून युजर्सचे लक्ष केंद्रित करण्यासह आपल्या मित्रपरिवार आणि फॉलोअर्स सोबत मर्यादा आणण्यासाठी प्रोत्साहन करण्यास मदत मिळणार आहे. या व्यतिरिक्त इंस्टाग्रामने आपल्या प्लॅटफॉर्मवर कंटेट शेड्युलिंग टूलसह काही फिचर्स ही रोलआउट केले.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.