Home » आयएनएस वागीर नौसेनेत दाखल होणार, जाणून घ्या खासियत

आयएनएस वागीर नौसेनेत दाखल होणार, जाणून घ्या खासियत

by Team Gajawaja
0 comment
INS Vagir
Share

कलव्हरी श्रेणीतील पाचवी पाणबुडी वागीर २३ जानेवारीला नौसेनेत दाखल होणार आहे. भारतात या पाणबुडीची निर्मिती माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मुंबई द्वारे मॅसर्स नेवल ग्रुपने फ्रांन्सचा मदतीने केली आहे. ही पाणबुडी दुश्मनांवर हल्ला करण्यासाठी अधिक सक्षम असल्याचे सांगण्यात आले आहे. सबमीरन हत्यारं लावणे ते याच्या ट्रायल पर्यंतचे सर्व काम पूर्ण झाले आहे. (INS Vagir)

आयएनएस वागीर स्कॉरपीयन यान हे एक डिजिटल इलेक्ट्रिक सबमरीन आहे. ती कोणत्याही प्रकारच्या मिशनला पूर्ण करु शकते. यासाठी आधुनिक नेविगेशन, ट्रॅकिंग प्रणालीसह ही पाणबुडी खासगी माहिती एकत्रित करण्यासह समुद्रात भुसूरंग सुद्धा टाकू शकते. त्याला अशा प्रकारे बनवण्यात आले आहे की, ती प्रत्येक स्थितीत काम करु शकते.

कलवरी क्लासच्या या पाणबुडीची उंची जवळजवळ ४० फूट आणि लांबी २२० फूट आहे. यामध्ये एक डिझेल इंजिन असून ऑप्शनच्या रुपात ३६० बॅटरी सेल्स सुद्धा लावण्यात आले आहेत. खास गोष्ट अशी की, पाण्याच्या पृष्ठतलावर ती २० किमी प्रतितासच्या वेगाने चालू शकते. मात्र पाण्यामध्ये त्याची गति ४० किमी प्रतितास असू शकते. ही सर्वाधिक कमी कालावधीत तयार करण्यात आलेली भारतीय पाणबुडी आहे.

आयएनएसची गति याच्या परफॉर्मेंन्सवर ठरवली जाते की, ती पाण्याच्या आतमध्ये सातत्याने ५० दिवसापर्यंत राहू शकते. तसेच ३५० फूट खोलपर्यंत जाऊ शकते. १५ किमी प्रतितास वेगाने ही एकावेळेस १०२० किमी प्रवास करु शकते. त्याचा वेग कमी-जास्त करण्यासाठी त्याचा पल्ला कमी जास्त होऊ शकते. वागीरमध्ये ८ सैन्य अधिकारी आणि ३५ जवान तैनात केले जाऊ शकते. याचे वजन जवळजवळ १५०० टन आहे.

आयएनएस वागीरमध्ये अँन्टी-टॉरपीड काउंटरमेजर सिस्टिम सुद्धा आहे. या व्यतिरिक्त अँन्टी शिप क्षेपणास्र सुद्धा लॉन्च केले जाऊ शकतात. ती पाण्याच्या आतमध्ये ३० समुद्र भुसूरुंग टाकू शकते. त्याचसोबत ही समुद्रात शत्रूंवर लक्ष सुद्धा ठेवण्यास सक्षम आहे.(INS Vagir)

हे देखील वाचा- जगभरातील सर्वच देशात महिला, सैन्यात महत्त्वाची भूमिका बजावणार

याआधी वगीर 01 नोव्हेंबर 1973 रोजी ‘कमिशन’ करण्यात आले होते आणि त्यांनी गस्तीसह अनेक ऑपरेशनल मिशन पार पाडले होते. जवळपास तीन दशके देशाची सेवा केल्यानंतर 07 जानेवारी 2001 रोजी पाणबुडी सेवेसाठी उपलब्ध करुन देण्यात आली होती.

गेल्या वर्षात २२ फेब्रुवारीला पहिला समुद्र प्रवास
आपल्या नव्या अवतारात १२ नोव्हेंबरला २०२२ मध्ये लॉन्च करण्यात आलेली वागीर पाणबुडी आतापर्यंत सर्व परदेशी निर्मित पाणबुड्यांमध्ये सर्वात कमी कालावधीत निर्माण केल्याचा गौरव प्राप्त झालाआ आहे. समुद्र चाचणीच्या सुरुवातीला तिने २२ फेब्रुवारीला आपला पहिला समुद्राचा प्रवास केला आणि कमीशनपूर्वी ती व्यापक स्विकृत तपासासह कठोर आणि आव्हानात्मक समुद्र चाचण्यांना सामोरी गेली होती. एमडीएलने २० डिसेंबर २०२२ रोजी ही पाणबुडी भारतीय नौसेला सुपुर्द केली.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.