केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नुकत्याच स्वदेशी निर्मिती P15B स्टील्थ गाइडेड मिसाइल विध्वंसक युद्धपोत आयएनएस मोरमुगाओ (INS Mormugao) हे भारतीय नौसेनेत दाखल केले आहे. या स्वदेशी गाइडेड-मिसाइल डिस्ट्रॉयरचा समावेश झाल्यानंतर भारताची समुद्रातील युद्ध शक्ती आणखी वाढली जाणार आहे. भारतीय नौसेनेनुसार, हे युद्धपोत रिमोट सेंसिंग डिवाइस, आधुनिक रडार आणि पृ्ष्ठभागावरुन क्षेपणस्र आणि पृष्ठभागावरुन हवेत क्षेपणस्र सोडणाऱ्या शस्रास्र प्रणालींनी सुजज्ज आहे.
Mormugao असे नाव का ठेवले?
नौसेनेने म्हटले की, या युद्धपोताची लांबी १६३ मीटर, रुंगी १७ मीटर आणि वजन ७४०० टन आहे. ती भारतात बनवण्यात आली असून सर्वाधिक घातक युद्धपोतांपैकी एक असल्याचे बोलू शकतो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मुंबईत नौसेन डॉकयार्डमध्ये ती लॉन्च करणार हेत. मोरमुगाओ गोव्याच्या पश्चिम तटावरील असलेल्या ऐतिहासिक शहराचे नाव आहे. त्याच ऐतिसाहिक बंदराच्या शहाराच्या नावावरुन याचे नाव ठेवले गेले आहे. योगायोगाने ही पोत पहिल्यांदा १९ डिसेंबर २०२१ रोजी समुद्रात उतरवण्यात आली होती, ज्या दिवशी पोर्तुगाल शासनापासून गोव्याला मुक्त होऊन ६० वर्ष झाली होती.

चार विशाखापट्टणम क्लास डिस्ट्रॉयर्सपैकी दुसरा नौदलात औपचारिकपणे सामील होणार आहे.याचे डिझाइन भारतीय नौसेनेच्या स्वदेशी संघटनेने तयार केले आहे. त्याची निर्मिती माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिडेट यांनी केले आङे. या स्टेल्थ गाइडेड मिसाइल डिस्ट्रॉयरची ७५ टक्के उपकरण आणि हत्यारे ही भारतात बनवण्यात आली आहेत. जहाजाला चार शक्तीशाली गॅस टर्बाइन मधून उर्जा मिळणार आहे. जी त्याला ४८ किमी प्रति तास वेग देणार आहे.
समुद्रात हालचाली केल्यास मिळणार सडेतोड उत्तर
नौसेनेने म्हटले की, जहाजाची पाणबुडीविरोधी युद्ध क्षमता स्वदेशी विकसित करण्यात आली आहे. या युद्धपोतात रॉकेट लॉन्चर, तारपीडो लॉन्चर आणि एसएडब्लू हेलीकॉप्टरची व्यवस्था आहे. १५ व्या श्रेणीतील दुसऱ्या स्वदेशी स्टील्थ विध्वंसक मोरमुगाओ जहाज परमाणू, जैविक आणि रासायनिक युद्धावेळी सुद्धा बचाव करण्यास सक्षम आहे. भारत समुद्र क्षेत्रात चीनची वाढती उपस्थिती पाहता हिंद महासागरावर लक्ष देण्यासह आपली समुद्रातील ताकद ही वाढवत आहे.(INS Mormugao)
हे देखील वाचा- LoC आणि LAC मधील फरक काय?
५५ युद्धपोतांचे केली जाणार निर्मिती
नौसेने असे म्हटले की, आत्मर्निभर आणि स्वदेशीकरणाच्या उद्देशासह ४४ पोत (जहाज) आणि पाणबुड्यांपैकी ४२ ची निर्मिती भारतीय शिपयार्ड मध्ये केली जात आहे. अशा प्रकरे आत्मनिर्मभर भारत आमच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देत आहे. तसेच ५५ युद्धनौका आणि पाणबुड्यांच्या निर्मितीसाठी आदेश ही दिले गेले आहेत. याची निर्मिती ही भारतीय शिपयार्डात केली जाणार आहे.