Home » युद्धावेळी महागाई का वाढते? जाणून घ्या कशा पद्धतीने केले जाते नियंत्रण

युद्धावेळी महागाई का वाढते? जाणून घ्या कशा पद्धतीने केले जाते नियंत्रण

by Team Gajawaja
0 comment
Inflation during war
Share

कोरोना व्हायरस महारोग आणि रशिया-युक्रेन मधील युद्ध याचा जागतिक स्तरावर फटका बसतो. याच काळात महागाई सुद्धा होते. रशिया-युक्रेनमधील युद्धाचे पडसाद हे मोठ्या प्रमामात युरोपत मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. गहू ते खाण्यापिण्याच्या वस्तूंवरील किंमतीत भरघोस वाढ झाली आहे. महारोग असो किंवा एखादी आपत्कालीन स्थिती कोणत्याही देशात महागाई वाढण्याचे प्रमुख कारणं आहेत. तर जाणून घेऊयात युद्धामुळे महागाई का वाढते आणि ती नियंत्रित कररण्यासाठी अर्थशास्रात अशा कोणत्या पद्धती आहेत.(Inflation during war)

युद्धामुळे देशाच्या अर्थव्यवस्था बिघडते
जेव्हा एखाद्या देशाकडून युद्ध पुकारले जाते किंवा त्या देशाला युद्धाचा सामना करावा लागतो तेव्हा आपल्या संसाधनांमधील एक मोठा हिस्सा सुरक्षिततेसाठी लागणारी उपकरणे आणि युद्धा संबंधित काही गोष्टींवर पैसे खर्च करावे गातात. अशा स्थितीत सुरळीत सुरु असलेली अर्थव्यवस्था काही काहीशा प्रमाणात ढासळली जाते.

सध्याच्या काळात रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. दोन्ही देशांनी आपली संसाधनांचा फार मोठा हिस्सा हा युद्धात देत आहेत. जेव्हा एखादा देश युद्धा सारख्या परिस्थितीचा सामना करत असतो त्या दरम्यान मोठ्या स्तरावर चालवल्या जाणाऱ्या जनकल्याणकारी योजना जसे बेरोजगागी भत्ता हा स्थगित केला जातो. अशातच नागरिकांच्या खिशाला फटका बसणार असून वेतन ही कमी येते. त्यामुळे त्यांना खऱेदी करण्याच्या क्षमेतला फटका बसतो.

मागणी आणि पुरवठ्यावर परिणाम
दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धामुळे मागणी आणि पुरवठा यावर मोठा प्रभाव पडतो. युद्धादरम्यान, मोठ्या प्रमामात कामकाज आणि नियमित उपक्रप हे ठप्प होतात. सध्या युक्रेनमध्ये शहरातील मॉल, दुकाने आणि लहान कारखाने बंद आहेत. देशातील उत्पादनावर मोठा परिणाम होते. लोकांची नोकरी आणि रोजगारच्या संधी उपलब्ध मिळत नाहीत. पैशांमध्ये ही घट होते. अशा स्थितीत तुम्ही खरेदी करु शकत नाहीत. महागाई वाढल्याने तुमच्या खिशाला त्याचा अधिक फटका बसतो.

हे देखील वाचा- वाचा टायटॅनिक पेक्षा जास्त प्राणहानी सोसलेल्या महाराष्ट्रातील रामदास बोटीचा इतिहास..

Inflation during war
Inflation during war

युद्धामुळे उत्पादन आणि निर्यातीवर होतो परिणाम
युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाल्यास उत्पादनावर त्याचा फार मोठा प्रभाव पडतो. युक्रेनमधून युरोपात गव्हाचा पुरवठा केला जातो. परंतु त्यावर ही आता परिणाम झाला आहे. तचेस रशियाने गव्हाची निर्यातीचा रस्ता ही बंद केला आहे. त्यामुळे युरोपात गहू निर्यातीवर प्रभाव पडला आहे. याचा प्रभाव फक्त युक्रेनपर्यंतच मर्यादित नाही तर युरोपातील गव्हांच्या किंमतीत ही फार मोठी वाढ झाली आहे.

काही वेळा देश काही गरजेच्या गोष्टी आयात करतो. जसे की, अन्नधान्य किंवा पेट्रोल सारख्या गोष्टी. युद्धा सारख्या परिस्थितीत संकटग्रस्त देशांमध्ये आयात करणे मुश्किल होते. कधीकधी असे ही होते की, युद्धामुळे देशाची अर्थव्यवस्था ढासाळते. कारण त्यांच्याकडे परदेशी चलन राहत नाही. त्यामुळेच महागाई ही सहज वाढली जाते.(Inflation during war)

युद्धात महगाई नियंत्रणात ठेवण्यासाठी केले जाणारे उपाय
-जनकल्याणकारी योजनांवर खर्च करणे. या अंतर्गत लोकांना थेट पैसे दिले जातात, जेणेकरुन मागणी आणि पुरवठा हा सुधारला जाईल. थेट कॅशच्या मदतीने बेरोजगारी भत्ता, पेंन्शन आणि अशा काही योजनांचा आधार घेतला जातो.
-उत्पादन वाढवण्यावर जोर दिला जातो. काही देशांची प्राथिमकता असते की, ठप्प झालेले उत्पादन लवकरच सुरु व्हावे. तसेच देशातील उत्पादनाचा दर वाढवला जाईल. उत्पादन वाढवल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळते आणि रोजगार ही वाढीस लागतो.
-युद्धामुळे जेव्हा देशाची अर्थव्यवस्था अधिकच ढासळते तेव्हा देश हा मानवीय आधारावर दुसऱ्या संपन्न आणि शक्तिशाली देशाची मदत घेतो.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.