Home » भारतीय संस्कृती जोपासतोय ‘हा’ मुस्लिम देश! या देशात आहे जगातली सर्वात उंच हिंदू देवाची मूर्ती

भारतीय संस्कृती जोपासतोय ‘हा’ मुस्लिम देश! या देशात आहे जगातली सर्वात उंच हिंदू देवाची मूर्ती

by Correspondent
0 comment
Lord Vishnu | K Facts
Share

जशी भारताला खूप मोठ्या इतिहासाची आणि प्राचीन संस्कृतीची परंपरा लाभलेली आहे तशीच संस्कृती आणि परंपरा इतर देशांना सुद्धा लाभलेली आहे. पण दुसरा कोणता देश भारत देशाचा संस्कृतीक वारसा जोपासतो हे आपण कधी ऐकले आहे का?

किंवा भारतात प्रत्येक गावात मंदिरे आहेत. पण भारतीय देवतेची सर्वात उंच मूर्ती भारतात नाही तर एका इस्लामी देशात आहे, हे ऐकूण तुम्हाला कसे वाटेल? थोडे विचित्र वाटेल! पण हो, हे सत्य आहे.

भारतीय संस्कृती म्हटल्या नंतर प्रत्येकाला साहजिकच पहिले चित्र डोळ्यासमोर येते, ते म्हणजे देवी-देवतांचे. भारतातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात तुम्ही गेला तर तिथे देवी-देवतांवर अपार श्रद्धा ठेवणारे लोक भेटतील. पण अनेकांना जगाचा पालनहार म्हणून मानल्या जाणाऱ्या भगवान विष्णूंची सर्वात उंच मूर्ती कुठे आहे? हेच आजून माहीत नाही.

आग्नेय आशियातल्या इंडोनेशिया (Indonesia) या मुस्लीम बहुल देशात विष्णूची जगातली सर्वात उंच मूर्ती आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ही मूर्ती इंडोनेशिया मध्ये नक्की कुठे आहे? तर हो थोडं थांबा! कारण याचही उत्तर आम्हीच देणार आहोत.

Statue of Garuda Wisnu Kencana
Statue of Garuda Wisnu Kencana

रामायणात उल्लेख असलेल्या बाली बेटावर सध्या परिचित असणाऱ्या GWK सांस्कृतिक उद्यानात भगवान विष्णूंची (Lord Vishnu) ही सुरेख मूर्ती आहे. मूर्तीचा इतिहास पहायला तर आपल्याला समजते की, इंडोनेशियाचे रहिवाशी आणि सुप्रसिद्ध मूर्तिकार बाप्पा न्यूमन नुआती यांनी १९७९ मध्ये जगातली सर्वात विशाल मूर्ती की जी कुठेच नसेल अशी बनवण्याचे स्वप्न पाहिले.

तसे त्यांनी त्याबाबत पाऊले उचलली आणि ही मूर्ती तयार करण्याच्या दृष्टीने त्यांनी एक योजना तयार केली आणि पैसे जमवायला सुरवात केली. पुढे इंडोनेशियन सरकरानेसुद्धा या प्रकल्पाला मदत केली.

१९९४ मध्ये बाप्पा न्यूमन नुआती यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन मूर्ती घडवायला सुरवात केली. पण पुढे दुर्दैवाने अनेकदा या मूर्तीचे काम मध्येच थांबले. कधी स्थानिक लोकांनी विरोध केल्याने, तर कधी पैसे कमी पडल्याने मूर्तीचे काम थांबले. २००७ ते २०१३ या काळात पैसे नसल्याने मूर्तीचे काम पूर्णतः बंद होते. नंतर पुन्हा पैसे जमवून काम सुरू झाले. आणि अखेर २०१८ मध्ये ही मूर्ती बनवून पूर्ण झाली.

या मूर्तीला बनवायला तब्बल २८ वर्षे लागली. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती तब्बल १२२ मीटर म्हणजेच ४०० फूट उंच तर ६४ फुट रुंद आहे. या मूर्तीला घडवायला तब्बल १०० मिलियन डॉलर्स इतका खर्च आला आहे. २०१८ ला मूर्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर सर्वप्रथम इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी प्रथम दर्शन घेतले. त्यानंतर ही मूर्ती जगभरच्या भक्तांसाठी आणि पर्यटकांसाठी खुली करण्यात आली. साधारणतः हे अलौकिक प्रेक्षणीय स्थळ बघण्यासाठी दरवर्षी इंडोनेशियात ५० लाख पर्यटक येतात.

जगातली सर्वात उंच मूर्ती घडवणाऱ्या बाप्पा न्यूमन नुआती यांची दखल भारत सरकारने सुद्धा घेतली. आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेले.

– निवास उद्धव गायकवाड

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.