इंडोनेशिया हा एक मुस्लिम देश आहे. मात्र पूर्णपणे हिंदूच्या रंगात रंगला आहे. ठिकठिकाणी हिंदू देवदेवतांचे फोटे आणि मंदिरे यांच्यासह लोकांची नावे सुद्धा हिंदूंसारखी आहेत. हिंदू परंपरांचे पालन केले जाते आणि तेथील चलानवर भगवान गणपतीचा फोटो सुद्धा आहे. ही गोष्ट ऐकून तुम्ही हैराण झालात ना? मात्र जगात सर्वाधिक बड्या मुस्लिम देशातील नोटवर गपतीचा फोटो असल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटते. इंडोनेशियात जवळजवळ ८७.५ टक्के लोकसंख्या इस्लाम धर्माला मानतात. तर फक्त ३ टक्के हिंदू लोकसंख्या आहे. जाणून घेऊयात अखेर त्यांच्या चलनावर गणपतीचा फोटो का असतो. (Indonesia Currency)
नोटेवर छापण्यात आलायं गणपतीचा फोटो
इंडोनेशियातील चलनाला रुपयाच म्हटले जाते. तेथे २० हजारांच्या नोटवर गणपतीचा फोटो आहे. खरंतर गणपतीला इंडोनेशियात शिक्षण, कला आणि विज्ञानाचा देवता मानले जाते. गणपतीचा पुढील बाजूस फोटो असून नोटेवर मागच्या बाजूला क्लासरुमचा फोटो आहे. ज्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक दिसून येतात. त्याचसोबत नोटवर इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री हजर देवांत्रा यांचा सुद्धा फोटो आहे. देवांत्रा इंडोनेशिाच्या स्वातंत्र्याचे नायक राहिले आहेत.

असे सांगितले जाते की, काही वर्षांपूर्वी इंडोनेशियाची अर्थव्यवस्था वाईट पद्धतीने ढासळली होती. तेथील राष्ट्रीय आर्थिक चिंतकांनी अत्यंत विचार करुन एक हजाराची एक नवी नोट जारी केली. ज्यावर गणपतीचा फोटो छापला. मात्र लोकांचे असे मानणे आहे की, या कारणास्तव आता तेथील अर्थव्यवस्था मजबूत आहे. तुम्हाला हे ऐकून हैराण व्हायला होईल की, देशात फक्त गणपतीच नव्हे तर इंडोशियन आर्माचा मॅस्कॉट हनुमानाचा आहे. त्याचसोबत एक प्रसिद्ध टुरिस्ट जागेवर अर्जुन आणि श्री कृष्णाची मुर्ती सुद्धा आहे.
दरम्यान, इंडोनेशियातील भाषा, स्थापत्य, राजेशाही आणि मिथकांवर ही हिंदूसह बुद्ध धर्माचा सुद्धा प्रभाव आहे. उदाहरणासाठी इंडोनेशियातील जुन्या साम्राज्यांचे नाव श्रीविजया आणि गजाह मधा असे आहे. ऐवढेच नव्हे तर त्यांच्या भाषेच्या प्रकरणी ही काही समानता आहेत. त्यांच्या भाषेला बहासा इंदोनेसिया असे म्हटले जाते. (Indonesia Currency)
हे देखील वाचा- मनुस्मृती म्हणजे काय? ज्याचा दलितसंबंधित मुद्द्यांशी काय संबंध
समानता सुद्धा आणि भिन्नता सुद्धा
काही वर्षांपूर्वी हिंदू धर्म येथे पोहचला नव्हता. पण बुद्ध धर्मसुद्दा त्याच्यासोबत किंवा त्याआधीच इंडोनेशियात पोहचला होता. याच कारणामुळे जावा द्वीपवर तुम्हाला प्रांबाननमध्ये हिंदू मंदिर मिळते आणि बोरोबोदूरमध्ये जगातील सर्वाधिक मोठा बुद्ध स्तूप दिसतो. ऑस्ट्रेलियाच्या बाजूला पडणारा इंडोनेशियाचा बाली द्वीप तर हिंदु बहुल आहे. तरीही येथे हिंदू धर्म हा भारतातील हिंदू धर्मापेक्षा खुप वेगळा आहे. बालीतील हिंदू धर्माचा आजच्या हिंदुत्ववादी धर्माशी कोणतेही देणेघेण नाही. असे म्हटले जाऊ शकत नाही की, येथे भारतातील सनातन धर्म किंवा भक्ती परंपरा आहे. जसे की, प्रसिद्ध इतिहासकार लोकेश चंद्र यांनी असे सांगितले की, एशियात रामायणातील असंख्य आवृत्या मिळतात. अशा प्रकारे ते भिन्न आहे. मात्र हिंदू धर्माची छाप ही इंडोनेशियाच नव्हे तर कंबोडिया आणि थायलंड मध्ये सुद्धा दिसते.