१९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाला पण धर्माच्या आधारावर एक वेगळा देश झाला तो म्हणजे पाकिस्तान. जगाच्या नकाशात भारताच्या एका बाजूला पूर्व पाकिस्तान (आजचा बांग्लादेश) दुसऱ्या बाजूला पश्चिम पाकिस्तान (आजचा पाकिस्तान). वेळ निघून जात होती. १९७० च्या वर्षाचा अखेर सुरु होता. पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणूका झाल्या. माजी पाकिस्तान आवामी लीगचे नेते शेख मुजीबु्र्हमान यांनी निवडणूक जिंकली आणि सरकार बनवण्याचा दावा केला. पीपीपी म्हणजेच पाकिस्तान पीपुल्स पार्टीचे नेते जुल्फिकार अली भुट्टो यांना हे नको होते. (Indo-Pak War 1971)
पश्चिम पाकिस्तानवर आपली मर्जी लावणाऱ्या लोकांना पूर्व पाकिस्तानाचा विजय सहन झाला नाही. याचसोबत पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान मध्ये तणाव वाढू लागला. आवामी लीगने पीपीपीचा विरोध करण्यास सुरुवात केली. शेख मुजीबुर्रहमान यांना अटक करण्यात आली होती. ज्यामुळे पूर्व पाकिस्तानातील लोक संतप्त झाले आणि त्यांनी आंदोलन सुरु केले.
पूर्व पाकिस्तानवर पाकच्या फौजचा अत्याचार
पू्र्व पाकिस्तानात जनांदोलन रोखण्यासाठी पश्चिम पाकिस्तानातील सैन्याला पाठवण्यात आले. पाकच्या फौजने पूर्व पाकिस्तानवर खुप अत्याचार केले. महिलांची अस्मिता लूटली, काही नरसंहरा ही झाले. लोकांचे पलायन होण्यास सुरुवात झाली. मोठ्या संख्येने लोक भारतात येऊन लागले. यांची संख्या जवळजवळ १० लाख होती. तेव्हा इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान होत्या. पाकिस्तान ऐवढा पुढे जात होता की, त्याने भारतावर ही हल्ला करण्यासंदर्भातील विधाने देऊ लागला.
…जेव्हा पाकिस्तानने केला हल्ला
३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने भारतातील काही शहरांवर हल्ले केले. इंदिरा गांधी यांनी मध्य रात्री देशाला संबोधित केले. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु झाले. पाकिस्तानने भारतावर हल्ला करुन त्यांना मरणाच्या दारात उभे केले होते. भारतीय वायुसेनेने पश्चिम पाकिस्तानच्या सैन्याच्या तळांवर बॉम्ब हल्ले सुरु केले. ४ डिसेंबरला बंगालच्या खाडीत दोन्ही देशांच्या नौसेनांमध्ये ही युद्ध सुरु झाले. ५ डिसेंबरला भारतीय नौसेनेने कराची बंदराच्या येथे बॉम्ब हल्ले करत पाकिस्तानच्या नौसैन्याच्या मुख्यालयाला निशाणा बनवले. पाकिस्तानचा यामध्ये फार मोठे नुकसान झाले होते.
पाकिस्तानच्या सैन्याने अखेर पराभव स्विकारला
अवघ्या १३ दिवस चाललेल्या या युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्ताला अखेर पराभव स्विकारण्यास भाग पाडले. तारीख होती १६ डिसेंबर १९७१. सकाळी-सकाळीच जनरल जॅकब यांन सेन्याध्यक्ष सॅम मानेकशॉ यांचा मेसेज मिळाल की, आत्मसमर्पण करण्यासाठी तातडीने ढाका येथे यावे. नियाजी कडे तेव्हा ढाका येथे २६,४०० सैनिक होती. लेफ्टिनेंट जनरल जॅकब आपल्या सैनिकांसह पुढे जात नियाची यांच्या खोलीत पोहचले असता शांतता परसली.(Indo-Pak War 1971)
खोलीतील एका टेबलावर आत्मसमर्पणाची कागदपत्र ठेवण्यात आली होती. संध्याकाळी साडे चार वाजता लेफ्टिनेंट जनरल जगदीश सिंह अरोडा ढाका विमानतळावर उतरले. तेथए अरोडा आणि नियाजी यांनी आत्मसमर्पणाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. नियाजी यांनी आपला बॅच काढून टेबलावर ठेवला. त्यानंतर जनरल अरोडा यांना आपली रिलॉल्वर दिली. नियाजी यांच्या नंतर पाकिस्तानच्या सैनिकांनी सुद्धा आपली हत्यारे जमिनीवर ठेवली.
हे देखील वाचा- LoC आणि LAC मधील फरक काय?
…आणि बांग्लादेशचा उदय झाला
या युद्धात ९३ हजार सैनिकांनी भारतीय सैन्यासमोर आत्मसमर्पण केले होते. पाकिस्तानने भारतासमोर हार मानली होती. याचसोबत भारताने पाकिस्तानला दोन भागात विभागले. भारताने पूर्व पाकिस्तानला मुक्स घोषित केले आणि जगाचा नकाशा बदलला. अशा प्रकारच्या बांग्लादेशाच्या रुपात एका नव्या राष्ट्राचा उदय झाला.