जगातील प्रत्येकजण आपण एके दिवशी श्रीमंत होऊ, भरपूर पैसा कमवू, आलिशान घरात राहू असे स्वप्न पाहत असतो. त्यासाठी तो एखादी नोकरी किंवा व्यवसाय ही करतो आणि त्यामधून मिळणाऱ्या पैशाने आपण कसे मोठे होऊ याचा विचार करतो. अशातच जर तुम्हाला प्रश्न विचारला की, तुम्ही वर्षभरात किती पैसे कमवता आणि किती खर्च करता? याचे उत्तर प्रथम तुम्ही कोणत्या ठिकाणी राहता यानंतर मिळेल. या व्यतिरिक्त तुमची जीवनशैली कशी आहे हा सुद्धा आयुष्यातील महत्वाचा भागच म्हणावा लागेल. मात्र तुम्हाला माहितीयेत का सध्याचे भिकारी (Beggar) सुद्धा महिन्याभराला हजारो रुपयांची कमाई करतात. ऐकून थोडे विचित्र वाटेल पण खरं आहे. कारण भारतातील असे काही भिकारी आहेत ज्यांची कमाई ऐकून तुमच्या भुवया नक्कीच उंचावल्या जातील. तर पहा असे कोण भिकारी आहेत जे लाखो रुपये कमवतात पण त्यांनी जमा केलेल्या पैशातून लाखो रुपयांची घरं सुद्धा घेतली आहेत.
-भरत जैन
५१ वर्षीय भरत जैन हा आझाद मैदान किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे असतो. तो असे म्हणतो की, देशातील सर्वाधिक श्रीमंत भिकारी आहे. त्याची महिन्याभराची कमाई जवळजवळ ७० हजार रुपये असून त्याची ७० लाखांचीच दोन घरं सुद्धा त्याने खरेदी केली आहेत.
-सरवतीया देवी
पटना येथील अशोक सिनेमामागील सरवतीया देवी या सर्वाधिक जुन्या भिकारी (Beggar) आहेत. त्या महिन्याभरात ५० हजार रुपयांची कमाई करतातच. पण वार्षिक इंन्शुरन्स प्रीमियम त्या ३६ हजारांचा भरत असल्याचे सांगितले जाते.
हे देखील वाचा- बॉलिवूड स्टारचे करोडपती बॉडीगार्ड्स, ज्यांचा पगार ऐकूण व्हाल थक्क
-संभाजी काळे
मुंबईतील खार येथे संभाजी काळे हा भीक मागतो. भीक मागण्याव्यतिरिक्त काळे याने सोलापुरात काही रिअल इस्टेटमध्ये ही गुंतवणूक केली आहे. त्याचा अन्य काही गुंतवणूकीसह बँक खात्यात लाखो रुपये सुद्धा जमा आहेत.
-कृष्ण कुमार गीते
चर्नी रोड येथे गीते हा भीक मागताना दिसून येतो. त्याने ५ लाखांचे घर ही खरेदी केले आहे. प्रतिदिवसाला तो १,५०० रुपयांची कमाई करतो.
-लक्ष्मी दास
लक्ष्मी दास यांनी वयाच्या १६ व्या वर्षापासून भीक मागण्यास सुरुवात केली होती. त्या कोलकाता येथे भीक मागताना दिसून येतात आणि त्यांची महिन्याभराची कमाई ही ३० हजार रुपये आहे.(Beggar)
-मासू
मासू हा मुंबईतील अधिक वर्दळ असणारे ठिकाण अंधेरी येथे भीक मागताना दिसून येतो. रात्री ८ वाजता आणि सकाळी गर्दीच्या वेळेस तो दिसतो. तो दिवसाला जवळजवळ १ हजार ते दीड हजारांची कमाई करतो. या व्यतिरिक्त अंधेरी पश्चिमेतील आंबोली येथे त्याचा १ बीएचके फ्लॅट सुद्धा आहे. तसेच अंधेरी पूर्वेला ही त्याने एक घर खरेदी केले आहे.
-पप्पु कुमार
पटना येथील पप्पु कुमार याच्या संपत्तीकडे लक्ष दिले असता त्याच्याकडे १.२५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. अपघातात पाय फ्रॅक्चर झाल्यानंतर पप्पुने पटना रेल्वे स्थानकात भीक मागण्यास सुरुवात केली. पटनाच्या रेल्वे स्थानकात तो बऱ्याच वेळा भीक मागताना दिसतो. रेल्वे स्थानकाता भीक मागताना वेळोवेळी पोलिसांनी हटवले तरीही तेथे तो दिसतोच.
-बुर्जू चंद्र आझाद
बुर्जू चंद्र आझाज याची तब्बल ८.७७ लाखांची मुदत ठेव आणि १.५ लाखांची रोकड त्याच्या गोवंडीतील घरातून आढळली. या सर्व मालमत्तेची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली. कारण बुर्जू याचा मध्ये रेल्वे स्थानकात रुळ ओलांडताना २०१९ मध्ये मृत्यू झाला आहे.