Home » भारतातील ‘हे’ आहेत सर्वाधिक धोकादायक विमानतळं

भारतातील ‘हे’ आहेत सर्वाधिक धोकादायक विमानतळं

by Team Gajawaja
0 comment
India's Most Dangerous Airport
Share

नेपाळ मधील विमान अपघातानंतर लँन्डिंग संदर्भात काही प्रश्न उपस्थितीत होत आहेत. नेपाळच्या विमान अपघताता जवळजवळ ६८ जणांचा बळी गेला. परंतु तुम्हाला माहिती आहे का, भारतातील अशी काही विमानतळ आहेत जेथे लँन्डिंग करतेवेळी सर्वांचा श्वास रोखला जातो. तर नेपाळ प्रमाणे जगभरात ही सर्वाधिक धोकादायक असलेली विमानतळं आहेत. काही ठिकाणी तर लहान रवने तर कुठे बर्फवृष्टीमुळे प्रवास करणे सोप्पे नव्हे. अशातच आम्ही तुम्हाला भारतातील अशा काही विमानतळांबद्दल सांगणार आहोत जे अत्यंत धोकादायक असल्याचे मानले जाते. (India’s Most Dangerous Airport)

शिमला विमानतळ
पर्वतरांगांमध्ये असलेला लहान रनवे असणारे हे विमानतळला टेबलटॉप विमातळ मानले जाते. याचा रनवे खुप लहान असून तेथे लँन्डिंग करणे अतिशय धोकादायक मानले जाते. याच्या रनवेची लांबी केवळ १२३० मीटर आहे.

कुल्लू-मनाली विमानतळ
देशातील सर्वाधिक मोठा टुरिस्ट स्पॉट मनालीचा विमानप्रवास हा कुल्लूत पूर्ण होते. कुल्लूला सुद्धा भारतातील सर्वाधिक धोकादायक विमानतळ मानले जाते. पर्वतरांगांधून तो खुप सुंदर दिसतो. पण येथे लँन्डिंग करणे जीव धोक्यात घालण्याऐवढेच आहे.

Indias Most Dangerous Airport
Indias Most Dangerous Airport

मँगलोर विमानतळ
धोकादायक विमानळांना टेबलटॉप असे म्हटले जाते. या लिस्टमध्ये कर्नाटकातील मँगलोर विमानतळ सुद्धा आहे. वर्ष २०१० मध्ये येथे एक विमान रनवे पेक्षा पुढे निघून गेले होते. त्यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. विमान अपघतासाठी पायलटला जबाबदार ठरवण्यात आले होते.

कोझिकोड विमानतळ
हे टेबलटॉप विमानतळ केवळ २७०० मीटर पसरलेले आहे. परंतु आजूबाजूला असलेले हिरवळ मनाला मोहून टाकते. येथे सुद्धा एकेकाळी मोठा अपघात झाला होता. (India’s Most Dangerous Airport)

गग्गल विमानतळ
देशातील सर्वाधिक धोकादायक विमानतळांपैकी गग्गल रनवेचा सुद्धा समावेश आहे. हे विमानतळ हिमाचल प्रदेशातील कांगडा येथे आहे. विमानतळ १२०० एकर जमिनीवर बनवलेले आहे. याचा रनवे २४९२ फूट उंचीवर आहे. या रवनेवर विमानाच्या लँन्डिंगवेळी पायलटला खुप सावधगिरी बाळगावी लागते.

हे देखील वाचा- प्रत्येक विमान अपघातानंतर ‘ब्लॅक बॉक्स’ का असतो महत्वाचा?

लेह विमानतळ
जम्मू-कश्मीर मधील कुशोला बाकुला रिमपोची विमानळ आहे. हे एक टेबलटॉप रनवे आहे. या विमानतळाचा रनवे ३२५९ मीटर उंचीवर आहे. याच विमानतळावर उतरणे आव्हानात्मक असते. या विमानतळाच्या चारही बाजूंना पर्वत आणि बर्फ दिसून येते. कुशोल बाकुला रिमपोची विमानतळ सर्वाधिक उंचीवर असल्याने तो नेहमीच चर्चेत असतो.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.