Home » भारतातील पहिलं 5 स्टार हॉटेल !

भारतातील पहिलं 5 स्टार हॉटेल !

by Team Gajawaja
0 comment
Jamshedji Tata
Share

१९ व्या शतकाचा शेवट जवळ येत होता, भारतावर इंग्रजांचं राज्य होतं. तरीही काही भारतीय असे होते ज्यांनी उद्योगविश्वात स्वत:च नाव मोठं केलं होतं. त्यातलेच एक होते, जमशेदजी टाटा. तेव्हा टाटा ग्रुप हळूहळू उदयाला येतं होता. तेव्हा मुंबई बॉम्बे होतं. काळा घोडा परिसरात जमशेदजी टाटा आपल्या एका इंग्रज मित्राला भेटण्यासाठी गेले होते. जेव्हा जमशेदजी टाटा आणि त्यांचे मित्र एका हॉटेलमध्ये जेवणासाठी जात होते, तेव्हा हॉटेलच्या सेक्युर्टी गार्डने टाटांना अडवलं आणि हॉटेल बाहेर लावलेल्या एका पाटीकडे बोटं दाखवलं. त्यावर लिहिलं होतं “इंडियन्स आर नॉट अलाउड.” त्या हॉटेलमध्ये भारतीयांना प्रवेश बंदी होती. जमशेदजी टाटांसाठी हा अनुभव नवा नव्हता. त्यांनी अनेक ठिकाणी असा अनुभव घेतला होता. पण या वेळेस त्या पाटीचा परिणाम त्यांच्या मनावर खोलवर झाला. त्यामुळे त्यांनी भारतातील पहिलं आणि सर्वात आलीशान फाईव्ह स्टार हॉटेल बांधण्याचा निर्णय घेतला. काय आहे ही संपूर्ण गोष्ट, हे जाणून घेऊया. (Jamshedji Tata)

“इंडियन्स आर नॉट अलाउड.” या पाटीमुळे जमशेद टाटांचा अपमान झाला होता. बरेच दिवस हे त्यांच्या लक्षात राहिलं. त्या अपमानामुळे त्यांच्या मनात हॉटेल बांधण्याचा विचार सतत येत होता. एकदा त्यांनी त्यांच्या बहिणीला हॉटेल बांधण्याबद्दल बोलून दाखवले. त्यावेळी त्यांच्या बहिणीला हॉटेल बांधण्याची कल्पना आवडली नव्हती. पण जमशेदजी टाटांनी हॉटेल बांधण्याचा ठरलेला मनाशी पक्का केला होता. १८९८ साली मुंबईच्या समुद्र किनारी जमशेदजींनी हॉटेल बांधायला सुरुवात केली. सुरुवातीला हॉटेल बांधण्यासाठी २ कोटी रुपये खर्च येईल, असं वाटत होतं. हॉटेल बनता बनता हॉटेलच्या बांधकामावर 4-5 कोटी रुपये खर्च झाले. ही रक्कम १२० वर्षांपूर्वी खर्च करण्यात  आली होती. आता या पैशांची किंमत काय असेल, तुम्ही अंदाज लावूच शकता. (National News)

जेव्हा हॉटेलच बांधकाम सुरू होतं, तेव्हा जमशेदजी टाटा हॉटेलच्या बाहेरच्या एका चहाच्या टपरीवर बसून हॉटेलचे बांधकाम बघत असत. आता हॉटेल समुद्राच्या किनाऱ्यावर बांधलं जात होतं, म्हणून हॉटेलचा प्रवेश समुद्राच्या बाजूने असेल, असं सर्वांना वाटत होतं. पण जेव्हा बांधकाम पूर्ण होतं आलं, तेव्हा सर्वांना समजलं की हॉटेलचा प्रवेश मागील बाजूने आहे. एकदा असंच चहा पित असताना, जमशेदजींना चहावाल्याने सांगितले की “तुम्ही हॉटेल चुकीचं बांधताय, तेव्हा जमशेदजींंनी चहावाल्याला हसून उत्तर दिलं होतं की, “जर मी एंट्रेन्स समुद्राच्या बाजूने ठेवला असता. तर हॉटेलमध्ये थांबणाऱ्या पाहुण्यांना त्यांच्या रूम मधून समुद्राचा नजारा पाहता नसता आला.” (Jamshedji Tata)

मुंबईच्या समुद्र किनारी असलेलं भारतातील त्यावेळचं आणि आत्ताचंही सर्वात आलीशान हॉटेल ताज पॅलेस ५ वर्षांमध्ये बांधून पूर्ण तयार झालं. जमशेदजी टाटांचं एक स्वप्नं पूर्ण झालं होतं. ताज हॉटेल ही मुंबईतील पहिली इमारत होती जी विजेने उजळली होती. त्याच वेळी, हे देशातील पहिलं हॉटेल होते ज्यात अमेरिकन पंखा, जर्मन लिफ्ट, तुर्की बाथरूम होतं. 16 डिसेंबर 1903 साली ताज हॉटेल सर्वांसाठी सुरू करण्यात आलं. या हॉटेलमध्ये कोणालाच येण्यास मनाई नव्हती. ताज हॉटेलचं आर्किटेक्ट, जे अत्यंत सुंदर मानलं जातं, हे भारतीय आर्किटेक्ट रावसाहेब वैद्य आणि डी.एन. मिर्झा यांनी डिझाइन केलं होतं. (National News)

इतकं सुंदर हॉटेल राहण्याची सोय सुद्धा राजे महाराजांच्या महालासारखी असून सुद्धा, ताज हॉटेलच्या सुरुवातीच्या दिवसांत इथे राहण्यासाठी लोकं येत नव्हती. त्या काळी इंग्रज लोक इंग्रजांच्या बांधलेल्या हॉटेलमध्ये राहणं पसंत करत होते. पण जेव्हा बीकानेरच्या महाराजांनी पहिल्यांदा ताज हॉटेलमध्ये राहायला सुरुवात केली, त्यानंतर इतर राजे आणि महाराजांचा ताज हॉटेलवरील विश्वास वाढला. त्यानंतर परदेशी पर्यटकही या हॉटेलकडे आकर्षित होऊ लागले.जमशेदजी टाटांनी तीन महत्त्वपूर्ण प्रकल्पांची स्थापना केली – स्टील प्लांट, टाटा इन्स्टिट्यूट आणि ताज हॉटेल. या तीन प्रकल्पांमध्ये, त्यांना फक्त एकाच प्रकल्पाचे पूर्ण होणं पाहता आलं. १६ डिसेंबर १९०३ रोजी ताज हॉटेल तयार झाले, आणि त्याच्या एक वर्षानंतर, ६५ व्या वर्षी जमशेदजी टाटांचं निधन झालं. (Jamshedji Tata)

======

हे देखील वाचा : कृष्णवर्णीय कमला हॅरिस

====

या हॉटेलने सुरुवाती पासूनच अनेक गोष्टी पाहिल्या आहेत. पहिल्या महायुद्धाच्यावेळी या हॉटेलचं रुपांतर हॉस्पिटलमध्ये करण्यात आलं होतं. जवळपास ६०० बेडचं हे हॉस्पिटल होतं. त्यानंतर भारताचं स्वातंत्र्य आणि २००८ साली दहशदवादी हल्ला. २६ नोव्हेंबरच्या रात्री हॉटेलमध्ये जेवणं सुरू होती आणि बरेच लोक हॉटेलमध्ये जमले होते, अचानक दशतवादी आत घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. सरकारी आकडेवारीनुसार, हॉटेल ताजमध्ये एकूण 31 लोक मृत्यमुखी पडले. त्यानंतर दोन वर्ष हॉटेल बंद करण्यात आलं होतं. मग नंतर १५ ऑगस्ट २०१० रोजी पुन्हा उघडण्यात आलं. भारतीय नागरिकांच्या होणाऱ्या अपमानाचं उत्तर जमशेदजी टाटा यांनी हे हॉटेल बांधून दिलं होतं. आज १२० वर्षांनंतरही ताज हॉटेल दिमाखात मुंबईच्या समुद्र किनारी उभं आहे. (National News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.