Home » जगातील ‘या’ देशांमध्ये राहतात सर्वाधिक भारतीय

जगातील ‘या’ देशांमध्ये राहतात सर्वाधिक भारतीय

by Team Gajawaja
0 comment
Indians in World
Share

भारतीय जगभरातील जवळजवळ प्रत्येक ठिकाणी राहत आहेत. भारतीयांचे परदेशी जाणे-येणे हे २०० वर्षांआधीच सुरु झाले होते. इंडोनेशियातील बाली बेटांवर साउथ इंडियातून येणे-जाणे ५व्या शतकात सुरु झाले होते.१८ व्या शतकाच्या अखेरपासून भारतीयांनी व्यापार ते कामकाजाच्या शोधात मोठ्या प्रमाणात परदेशात राहण्यास सुरुवात केली. मात्र तुम्हाला माहिती आहेत का जगातील नक्की असे कोणते देश आहेत जेथे भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे? (Indians in World)

खरंतर भारतीय जगातील प्रत्येक ठिकाणी पसरले गेले आहेत. जवळजवळ १५० वर्षांपूर्वी एखाद्या संधीच्या शोधात परदेशात जाणे पसंद केले असावे. आता एकट्या अमेरिकेत ४४ लाखांहून अधिक भारतीय राहतात. येथे अन्य देशातील नागरिकांपेक्षा भारतीयांचीच संख्या सर्वाधिक आहे. मात्र जगातील दुसऱ्या ठिकाणी सुद्धा त्यांची संख्या वाढत आहे. तर अमेरिकत डिसेंबर २०१८ पर्यंत त्यांची संख्या ४४.६ लाख होती. मात्र त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर संयुक्त अरब अमीरातचे नाव येते. येथे ३१ लाखांहून अधिक भारतीय राहतात.

तसेच जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात तिसऱ्या क्रमांकावर मलेशियाचे नाव येते. येथए २९.९ लाख भारतीय आहेत. तर चौथ्या क्रमांकावर सौदी अरब आहे. तेथे २८.०२ लाख भारतीय आहेत. पाचव्या स्थानकावर म्यांमार असून तेथे २०.८ लाख भारतीय आहेत. सहाव्या स्थानकावर युनाइडेट किंगडम मध्ये १८.३० लाख भारतीय
आहेत.

सातव्या क्रमांकावर भारतीय अधिक लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये श्रीलंकेचे नाव येते. येथे एकूण १६.१ लाख भारतीयांची संख्या आहे. आठव्या स्थानकावर दक्षिण अफ्रिका असून १५.६ लाख भारतीय आहेत.नवव्या स्थानावर कॅनडा असून १०.१६ लाख तर दहाव्या स्तरावर कुवैत असून तेथे ९.३० लाख भारतीय आहेत. (Indians in World)

हे देखील वाचा- परदेशातील तुरुंगात कोणत्या गुन्ह्याची शिक्षा भोगतायत ११ हजारांहून अधिक भारतीय नागरिक?

दरम्यान, गेल्या ३ वर्षात ३.९२ लाख लोक भारतीय नागरिकत्व सोडून १२० देशांमध्ये स्थलांतरित झाले आहेत. लोकसभा सेशनमध्ये ही माहिती देत भारत सरकारने सांगितले की, हे लोक खासगी कारणास्तव देश सोडून गेले आहेत.१,७०,७९५ लोकांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्विकारले. ६४,०७१ लोकांनी कॅनडा, ५८,३९१ लोकांनी ऑस्ट्रेलिया, ३५,४३५ लोकांनी युके, १२१३१ लोकांनी इटली आणि ८,८८२ लोकांनी न्युझीलंडचे नागरिकत्व स्विकारले. तर ७,०४६ लोक सिंगापुर, ६६९० लोकांनी जर्मनी, ३७५४ लोक स्विडन आणि ४८ लोक पाकिस्तानचे नागरिक बनले आहेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.