Home » Indians in Fiji : कालिया नाग सध्या फिजी देशात आहे…

Indians in Fiji : कालिया नाग सध्या फिजी देशात आहे…

by Team Gajawaja
0 comment
Indians in Fiji
Share

श्री कृष्णाने कालिया नागाचं मर्दन केल्यानंतर तो ज्या रमणक द्वीपावर गेला होता, तेच आजचं फिजी आहे, असं म्हटलं जातं. आता हे फिजी एक्जॅक्ट आहे कुठे? तर भारतापासून जवळपास ११,२३० किमी लांब, साऊथ पॅसिफिक ओशन मध्ये वसलेला हा एक बेटांचा समूह… बेट कसले आपण देशच म्हणू शकतो. पण तुम्ही कधी फिजीला गेलात आणि तिथे कोणी तुम्हाला भोजपुरी आणि अवधी भाषेत बोलताना भेटलं, तर शॉक होऊ नका! कारण तिथे सर्रास या भाषा बोलल्या जातात. त्याचं एक कारण म्हणजे फिजीच्या एकूण लोकसंख्येपैकी ३७% लोक भारतीय वंशाचे आहेत. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल, हे भारतीय तिथे कसे पोहचले? तर त्याला इतिहास आहे आणि हे आपण जाणून घेऊ. (Indians in Fiji)

तर, हे भारतीय हिंदू वंशाचे लोक इथे कसे आले? याचं कारण म्हणजे १८७९ मध्ये ब्रिटिशांनी भारतातून लोकांना मजुरी करण्यासाठी फिजीला आणलं. त्यांना हे लोक ‘गिरमिटिया’ म्हणायचे, कारण त्यांनी ब्रिटिशांशी “गिरमिट” केला होता. गिरमिटचा अर्थ अॅग्रीमेंट. हे लोक इथे ऊसाच्या मळ्यांवर काम करण्यासाठी आले. १८७९ ते १९१६ या काळात जवळपास सुमारे ६०,००० भारतीय त्यातले विशेषकरून उत्तर प्रदेश, बिहार आणि दक्षिण भारतातून फिजीला गेले. या मागचं कारण काय? कारण १८३३ मध्ये ब्रिटनने गुलामगिरी निर्मूलन कायदा(Slavery Abolition Act १८३३) पारित केला, ज्यामुळे गुलामगिरीची प्रथा नष्ट झाली आणि त्यातच त्यांना स्वस्तात काम करणारे मजूर हवे होते. तेव्हा त्यांनी भारतीयांना चांगल्या आयुष्याचं स्वप्न दाखवलं, जसं अलीकडच्या काळात भारतातल्या मजुरांना दुबईची स्वप्न दाखवून त्यांच्याकडून मजूरी करून घ्यायचे, अगदी तसंच. पण फिजीत पोहोचल्यावर त्यांची फसवणूक झाली. उज्ज्वल भविष्याच्या स्वप्नाच्या बदल्यात त्यांना काय मिळालं तर, त्यांना जीव तोड मेहनत, खूपच कमी पगार आणि वाईट वागणूक मिळाली. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी त्या फॉरेन कंट्रीला आपलंसं केलं. (Top Stories)

Indians in Fiji

आज फिजीची लोकसंख्या दोन मुख्य गटांत विभागली आहे, एक आयटाकी म्हणजे मूळ फिजियन, ज्यांची पॉप्युलेशन 56.8% आहे आणि इंडो-फिजियन, जे भारतीय वंशाचे आहेत. त्यांची पॉप्युलेशन 37.5%आहे. इंडो-फिजियनपैकी बहुतेक हिंदू आहेत, तर मूळ फिजियन ख्रिश्चन आहेत. फिजीत फिजी हिंदी ही भाषा बोलली जाते, जी त्या भारतीयांनी इथे आणली आणि हळूहळू ती इंडो-फिजियनची ओळख बनली. सोबतच तिथे भोजपुरी आणि अवधी भाषाही तिथे ऐकायला मिळतात.(Indians in Fiji)

फिजीमध्ये आज जी शेती आहे तिचं पाया इंडो-फिजियन्सनी लोकांनीचं रचला. त्यांनी साखर, कॉपरा आणि इतर शेतीत आपलं टॅलेंट दाखवलं. गेल्या शतकात फिजीचं आर्थिक आणि सामाजिक वैभव वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. रामायण हे फिजीच्या हिंदू मुलांच्या शिक्षणाचा अविभाज्य भाग आहे. त्यांचं फूड कल्चर काही वेगळं नाहीये. भारतात जशी रोटी, भात आणि कढी रोजचं जेवण आहे, तशीच ती इंडो-फिजियनांच्या जेवणातही आढळतं. तिथल्या हिंदूंनी आपली संस्कृती, सण, आणि परंपरा इथे जपल्या. फिजीत दिवाळी, होळी, रामनवमी, कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरे होतात. रामलीला आणि रामायण पठण यांचं आयोजनही होतं.(Top Stories)

हिंदू धर्मात फिजीचं एक खास स्थान आहे आणि ते कालिया नागच्या कथेमुळे आहे. भागवत पुराणच्या दहावा स्कंधात, अध्याय 16 मध्ये सांगितलं आहे की, श्रीकृष्णाने यमुनेत राहणाऱ्या विषारी कालिया नागाचा मर्दन केलं आणि त्याला रामणक बेटावर जायला सांगितलं. फिजीतील हिंदू, विशेषत: ISKCON चे फॉलोवर्स, मानतात की हा रामणक बेट म्हणजे फिजीच आहे. त्यांचा विश्वास आहे की, कालिया नाग फिजीच्या नकौवद्रा पर्वतरांगेच्या गुहांमध्ये किंवा तलावात राहतो. यावर आपण आधी व्हिडिओ केला आहे तो तुम्हाला वर आय बटनवर मिळेल.(Indians in Fiji)

फिजीतल्या स्थानिक फिजियन लोकांचा देगेई नावाचा सर्पदेव आहे, जो त्यांचा निर्मितीचा देव मानला जातो. हिंदूंनी देगेई आणि कालिया यांना एकच मानलं आणि यातून सांस्कृतिक मेळ घडला. फिजीत श्रीकृष्ण-कालिया मंदिर आणि नागिगी नाग मंदिर याच विश्वासाचं प्रतीक आहे. रकीराकी शहरात काही लोकांचा विश्वास आहे की कालिया आजही तिथे आहे आणि कधी कधी दिसतो, पण याला ठोस पुरावा नाही, फक्त श्रद्धा आहे. काहींचं असंही म्हणणं आहे की फिजी हा पाताळ लोकातला नागलोक आहे. रावण, मेघनाथ आणि अहिरावण यांचा नागलोकाशी संबंध आहे, आणि मेघनाथने सुलोचना नावाच्या नागकन्येशी लग्न केलं होतं. यामुळे काही जण फिजीला नागलोक मानतात, पण यालाही कोणताच पुरावा नाही.(Top Stories)

==============

हे देखील वाचा : Death Penalty : फाशीची शिक्षा सर्वात आधी कोठे सुरू झाली? घ्या जाणून

==============

पण आज फिजीत हिंदू मोठ्या संख्येने असले, तरी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मूळ आयटाकी फिजियन आणि इंडो-फिजियन यांच्यात वांशिक तणाव आहे. हिंदूंना भेदभाव आणि असमान वागणूक मिळते. जमीन मालकीच्या कायद्यांमुळे इंडो-फिजियन शेतकऱ्यांना जमीन खरेदी करणं कठीण आहे, कारण बहुतेक जमीन आयटाकी लोकांच्या मालकीची आहे. जमीन मालकीच्या कायद्यात समान हक्क मिळावेत, ही इंडो-फिजियनांची जुनी मागणी आहे, पण आजही ती परिस्थिती बदललेली नाही. (Indians in Fiji)

१९९९ मध्ये महेंद्र चौधरी फिजीचे पहिले आणि एकमेव भारतीय वंशाचे पंतप्रधान झाले. पण एका वर्षातच, २००० मध्ये, जॉर्ज स्पीट नावाच्या व्यापाऱ्याने मूळ फिजियनांना भडकवून बंड केलं. चौधरी आणि त्यांचं मंत्रिमंडळ ५६ दिवस ओलीस ठेवलं गेलं आणि नंतर लष्करी बंडाने त्यांना सत्तेतून काढलं. याआधी १९८७ मध्येही असंच बंड झालं होतं, ज्याने बहु-वांशिक सरकार पाडलं. १९६० च्या दशकात फिजीतील हिंदूंची लोकसंख्या ५०% होती, पण राजकीय अस्थिरता आणि भेदभावामुळे १९८७ च्या बंडानंतर ३०,००० ते ४०,००० इंडो-फिजियनांनी देश सोडला.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.