Home » भारतीय योग शिक्षकांसाठी चीनच्या पायघड्या

भारतीय योग शिक्षकांसाठी चीनच्या पायघड्या

by Team Gajawaja
0 comment
Indian Yoga Trainers
Share

जगभर आपल्या देशातील उत्पादनांची बाजारपेठ निर्माण करणार चीन हा एका गोष्टीमध्ये भारतावर अवलंबून आहे. ही गोष्ट म्हणजे, भारतीय योग. जगभर भारतीय योगाचा अवलंब केला जातो, तसेच योग शिक्षकांना मोठी मागणी आहे, तशीच मागणी चीनमध्येही आहे. चीनमध्ये गेल्या काही वर्षात आरोग्याच्या मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. कोरोना नावाची महामारी चीनमधूनच जगभर पसरल्याचे स्पष्ट झाले आहे. पण यासोबत चीनमध्ये मानसिक रोगानं त्रस्त असलेल्यांची संख्याही झपाट्यानं वाढत आहे. (Indian Yoga Trainers)

चीनच्या शहरी भागात रहाणा-या नोकरदारांमध्ये मानसिक रोगानं घर केल्याचं आता उघडकीस येत आहे. यासाठी चीनची राजधानी बिजींगपासून अन्य शहरातही योगाचा आधार घेतला जात आहे. त्यामुळे चीनच्या अनेक शहरांमध्ये योग सेंटर्स चालू झाले आहेत. शिवाय योगाचे कॉलेजही चीनमध्ये चालू झाले आहे. या योग सेंटर्समध्ये भारतीय योग शिक्षकांना मोठी मागणी आहे. भारताच्या हरिद्वारला योगाची भूमी म्हटले जाते. या हरिद्वारमधील अनेक योग शिक्षक सध्या चीनमध्ये लाखो रुपये कमवत आहेत. चीनमध्ये दरदिवसाला एका योग सेंटरची सुरुवात होत असून यात योग शिक्षक म्हणून भारतीय योग शिक्षकांना मोठ्या पगारावर नोकरी मिळत आहे. चीन सरकारनं भारताच्या दुतावासाकडेही योग शिक्षक देण्यासंदर्भात विशेष मागणी केली आहे.

२१ जून २०१५ रोजी जगभरात पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूएनजीएमध्ये आपल्या भाषणादरम्यान योग दिवसाची घोषणा केली होती. भारताच्या प्राचीन परंपरेतून योगाची अमूल्य देणगी मिळाली आहे. यातून शरीर आणि मनाचेही संतूलन साधले जाते. त्यामुळे आता जगभर योगाचा प्रचार आणि प्रसार होत आहे. विशेष म्हणजे, सीमेवर भारताच्यावर कुरघोडी करण्यात व्यस्त असलेल्या चीनमध्येही योगाचा प्रचार होत आहे. फक्त प्रचारच नाही तर चीनमध्ये भारतीय योग शिक्षकांना मोठी मागणी आली आहे. आधुनिक, प्रगत देश असे सांगणा-या चीनमधील समाजव्यवस्था पार विस्कटलेली आहे. येथील तरुण वर्गावर नोकरी टिकवण्याचे सतत दडपण असते. यातून त्यापैकी अनेकांना मानसिक तणावाला सामारे जावे लागत आहे. या सर्व तरुणवर्गानं हा मानसिक ताण दूर करण्यासाठी योग करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे चीनमधील जीमची संख्या कमी होऊन योग सेंटर्स सुरु झाले आहेत. जिथे जीम होते, तेथेही योग सेंटर्स सुरु झाले आहेत. या सर्वात भारतीय योग शिक्षकांसाठी पायघड्या घालण्यात आल्या आहेत. (Indian Yoga Trainers)

बीजिंग-शांघायसारख्या चीनमधील सर्व मोठ्या शहरांमध्ये मोठ्या संख्येने योग सेंटर्स सुरु झाले आहेत. विशेष म्हणजे, चीनमधील शाळांमध्येही मोठ्या प्रमाणात योगाचे वर्ग घेण्यास सुरुवात झाली आहे. येथील काही सामाजिक संस्थांनी तरुणांमधील मानसिक तणावाचे अहवाल प्रसिद्ध केल्यावर चीनमधील शाळांनी आपल्या अभ्यासक्रमात योगाचा वापर सुरु केला आहे. या सर्वांसाठी त्यांनी भारतातकडे प्रशिक्षित योग शिक्षकांची मागणी केली आहे.

काही शाळा तर फक्त योगाचे धडे देण्यासाठी सुर झाल्या आहेत. तसेच योग कॉलेजही चीननं सुरु केले आहे. त्यावरुन भविष्यात चीन योगमय झाल्याचे दिसणार आहे. मध्यंतरी चीनमध्ये करण्यात आलेल्या आरोग्य सर्वेक्षणात असे समोर आले आहे की, येथील ४० टक्के महिला लठ्ठपणाच्या बळी आहेत. याचे पहिले कारण हे मानसिक ताण असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर चीनमध्ये योग प्रशिक्षण मोहीम सुरु करण्यात आळी. त्यात महिलांचा सहभाग वाढला. सुरुवातील ३००० महिला या योग प्रशिक्षणात सहभागी झाल्या. नंतर त्यांची संख्या वाढली. तसेच अन्य शहरातही अशा सेंटरची मागणी वाढू लागली. तेव्हापासून चीनमध्ये योगाभ्यास झपाट्याने वाढत आहे. (Indian Yoga Trainers)

==================

हे देखील वाचा: जपानमध्ये 3-डी होलोग्राम नोटा….

==================

गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार, चीनमधील शांघाय, बीजिंग, शेन्झेन, नानजिंग या शहरांमध्ये योग सेंटर्स मोठ्या प्रमाणात चालू झाले आहे. योगावर विश्वास चिनी लोकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. आता काही चीनी तरुणही योग शिक्षक होत आहेत, आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद बघता, चीनी तरुण योगाचे प्रशिक्षण घेण्यासाठी भारतात येत आहेत. चीनची राजधानी बीजिंगमध्ये १ हजाराहून अधिक योग केंद्रे आहेत. त्यात दररोज ३ लाखांहून अधिक विद्यार्थी योग शिकतात. चीनमध्ये ३ हजारांहून अधिक भारतीय योगगुरू आहेत. त्यापैकी ८० टक्के शिक्षक ऋषिकेश आणि हरिद्वारमधील आहेत. चीनच्या दक्षिण-पश्चिम युनान प्रांतातील युन्नान मिनात्सू विद्यापीठात पहिले योग महाविद्यालय सुरू झाले आहे. ज्याला ‘चीन-इंडिया योग कॉलेज’ म्हणतात. या सर्वांमुळे चीनमध्ये भारतीय योग शिक्षकांची मागणी झपाट्यानं वाढली आहे.

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.