Home » भारतातील ‘या’ मंदिरात नामकरणासाठी मुलं नव्हे तर पाळीव कुत्र्यांना आणले जाते

भारतातील ‘या’ मंदिरात नामकरणासाठी मुलं नव्हे तर पाळीव कुत्र्यांना आणले जाते

by Team Gajawaja
0 comment
Indian Weird Temple
Share

भारतातील अशी काही मंदिरे आहेत ज्यांच्याबद्दल आपण विचार करु लागतो की, अखेर अशा कोणत्या मान्यता आहेत ज्या खरंच वेगळ्याच असतात.प्रत्येक राज्यातील परपंरा, भाषा ही वेगवेगळ्या असतात. पण भारतातील दक्षिण प्रांतात जर पर्यटन केल्यास अशा काही मान्यता आणि परंपरा आहेत ज्याबद्दल कोणाला अधिक माहिती ही नसेल. अशातच केरळातील एक अनोखे मंदिर आहे. जेथे मंदिरात नवजात बाळांचे नव्हे तर चक्क कुत्र्यांचे नामकरण केले जाते. येथे लोक आपल्या पाळीव कुत्र्यांना घेऊन येतात. ही प्रथा थोडी विचित्रच आहे पण तितकीच खरी सुद्धा आहे.(Indian Weird Temple)

मुथप्पन मंदिर
कन्नूरच्या तालीपरम्बापासून जवळजवळ १० किमी दूर असलेल्या वलपत्तनम नदी आहे. ज्याच्या किनाऱ्यावर एक मंदिर आहे. येथील स्थानिक लोक सांगतात की, या मंदिराचे नाव मुथप्पन मंदिर असे आहे. असे म्हटले जाते की, येथील लोक दूरदूरवरुन आपल्या पाळीव कुत्र्यांना घेऊन येतात. येथे आल्यानंतर त्यांचे नामकरण ही करतात. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, येथे तिरुवप्पन वेल्लट्टम परंपरेदरम्यान, कुत्र्यांचे नामकरण केले जाते. या बद्दलची अधिक माहिती मंदिराच्या प्रशासनाकडून दिली गेली आहे. त्यांनी असे म्हटले की, येथे कुत्र्यांच्या नामकरणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. ऐवढेच नव्हे तर येथे कोणताही शुल्क किंवा रिसिप्ट ही फाडावी लागत नाही.

पाळीव कुत्र्यांचे नामकरण
तिरुवप्पन वेल्लट्टम परंपरेवेळी कोणीही या मंदिरात आपला पाळीव कुत्रा घेऊन येऊ शकतो. येथे त्यांचा आशीर्वाद घेऊ शकतो. स्थानिक लोक सांगतात की, येथे शनिवार आणि रविवारी खुप मोठ्या प्रमाणात गर्दी होते. येथील पुजारी मुथप्पन तेय्यम म्हणून ओळखले जातात आणि नामकरणाच्या दरम्यान कुत्र्यांच्या कानात काहीतरी बोलतात. अखेर त्याला प्रसाद दिला जातो. असे केल्यानंतर तेय्यम पाळीव कुत्र्याला त्याच्या मालकांकडे सोपवतात.(Indian Weird Temple)

हे देखील वाचा- उज्जैन मध्ये रात्रीच्या वेळी कोणताही मंत्री, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान का थांबत नाहीत?

भाविक ताडी आणि तळलेली मच्छी देतात
मुथप्पन गरिबांचे आणि मेहनत करणाऱ्या जनतेचे देव मानले जातात. भगवान मुथप्पन यांना ताडी आणि तळलेली मच्छी अर्पण केली जाते. लोक त्यांना याचाच नैवेद्य देतात. सर्वात खास गोष्ट अशी की, कुत्र्यांना मुथप्पन यांचा मित्र मानले जाते. यच कारणास्तव या मंदिरात कुत्र्यांची पुजा केली जाते. स्थानिक लोक भगवान मुथप्पनला धर्मनिरपेक्ष देवता मानतात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.