Indian Temples- भारतात विविध भाषा, जाती, परंपरा आहेत पण येथे ऐक्याची भावना सुद्धा आपल्याला दिसून येते. त्याचसोबत प्रत्येक धर्माची लोक येथे राहत असल्याने प्रत्येक धर्मातील मंदिरांना, परंपरांना सुद्धा खुप महत्व दिले जाते. भारतात काही किलोमीटर अंतरावर संस्कृतीत बदल झाल्याचे दिसून येते. येथील प्रत्येकाच्या आपल्या आपल्या मान्यता आहेत. खासकरुन मंदिरांसबंधित अधिक लोकांच्या भावना असून या ठिकाणांना पावित्र्य मानले जाते. त्यामुळे मंदिरांमध्ये नॉन-वेज तर सोडाच पण कांदा-लसूणचे सुद्धा सेवन करण्यास बहुतांश ठिकाणी मनाई असते.
मात्र भारतात प्रत्येक मंदिरात असे होत नाही. काही मंदिरांमध्ये लोक बलिदानाची परंपरा मानली जाते त्यामुळे आराध्यला प्रसन्न करण्यासाठी मांसाहार हा भोगच्या रुपात दिला जातो. तोच भोग भाविकांना सुद्धा दिला जातो. मंदिरात नॉन-वेज आहार हा प्रसादच्या रुपात देणे थोडे विचित्र आहे. पण सत्यात हे खरं आहे. तर जाणून घेऊयात भारतातील अशी कोणती मंदिर आहेत जेथे मांसाहार हा प्रसादाच्या रुपात दिला जातो.
विमला मंदिर, ओडिशा
विमला मंदिर ओडिशा येथील पुरी मध्ये असलेले प्रसिद्ध मंदिर आहे. तर जगन्नाथ मंदिर परिसराच्या आतमध्येच पवित्र तलाव रोहिणी कुंडच्या बाजूला हे मंदिर आहे. विमलाला जगन्नाथची तांत्रिक पत्नी आणि मंदिर परिसरातील संरक्षक मानले जाते. त्यामुळे याचे महत्व जगन्नाथ मंदिरापेक्षा ही अधिक आहे. तर विमला देवीला जो पर्यंत महाप्रसाद चढवला जात नाही तोवर भगवान जगन्नाथ सुद्धा चढवला जात नाही.या मंदिरात देवीला विशेष दिवसांमध्ये मांस आणि मच्छीचा भोग चढवला जात असल्याची परंपरा आहे.
मुनियांदी स्वामी मंदिर, तमिळनाडू
मुनियांदी स्वामी मंदिर तमिळनाडू मधील मदुरै मध्ये वडक्कमपट्टी नावाच्या एक लहान गावात स्थित आहे. हे मंदिर भगवान मुनियादी अर्थात मुनीस्वरार यांना समर्पित आहे. त्यांना भगवान शंकराचा अवतार मानले जाते. भगवान मुनियादी यांच्या सन्मार्थ या मंदिरात एक तीन दिवसीय वार्षिक उत्सवाचे आयोजन केले जाते. ज्यामध्ये चिकन आणि मटन बिर्याणी प्रसादाच्या रुपात दिली जाते. तर लोक नाश्तासाठी बिर्याणी खाण्यासाठी मंदिरात येतात.(Indian Temples)
तारकुल्हा देवी मंदिर, उत्तर प्रदेश
तारकुल्हा देवी मंदिर उत्तर प्रदेशातील गोरखपुर येथे आहे. या मंदिरात प्रत्येक वर्षी वार्षिक खिचडी मेळ्याचे आयोजन केले जाते. ज्यासाठी भाविकांनी खुप मोठी गर्दी होती. असे मानले जाते की, येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण होते. खासकरुन चैत्र नवरात्रिच्या वेळी देशभरातील लोक या मंदिरात दर्शनासाठी येतात. या खासवेळी अशी लोक देवीला एक बकरा देतात ज्यांची मनोकामनला पूर्ण होते. त्यानंतर हे मांस तेथील जेवण बनवणाऱ्यांच्या द्वारे मातीच्या भांड्यात शिजवले जाते आणि नंतर भक्तांना ते प्रसाद म्हणून दिले जाते.
हे देखील वाचा- कुतुब मिनार हिंदूंची मंदिरं तोडून उभारला होता?
कालीघाट मंदिर, पश्चिम बंगाल
कालीघाट मंदिर कोलाकातामधील पश्चिम बंगालमध्ये स्थित आहे. हे मंदिर देवी कालीला समर्पित आहे. हे एक महत्वपूर्ण हिंदू मंदिर असून ५१ शक्तिपीठांपैकी एक आहे. तर सतीच्या पायाचे बोटही येथेच पडले होते अशीच आख्यायिका आहे. हे एक प्राचीन मंदिर आहे आणि जवळजवळ २०० वर्ष जुने आहे. मंदिरात देवी काली भगवान शिव यांच्या छातीवर पाय ठेवून आहे आणि तिच्या गळ्यात नरमुंड्यांची माळ आहे. मंदिरात पशुंचा बळी दिला जातो. देवीला वर्षभरात जवळजवळ ४९९ बकऱ्या दिल्या जातात.