दक्षिणेकडील मंदिरांत कठोर नियमांमुळे काही वेळेस वादाची स्थिती निर्माण होते. असेच एक प्रकरण समोर आले आहे. साउथची प्रसिद्ध अभिनेत्री अमाला पॉल ही केरळातील एर्नाकुलम मधील थिरुवैरनिकुलम हिंदू मंदिरात महादेवाचे दर्शन घेण्यासाठी गेली होती. मात्र तिला दर्शनाची परवानगी देण्यात आली नाही. या प्रकरणाने आता जोर पडकला आहे. अमालाने यावर नाराजी व्यक्त करत मंदिरातील विजिटर रजिस्टरमध्ये आपल्यासोबत झालेल्या या घटनेचा उल्लेख केला आहे. तर जाणून घेऊयात भारतातील अशी कोणती मंदिर आहेत जेथे गैर-हिंदूना परवानगी दिली जात नाही. (Indian Temples)
-गुरुवायुर मंदिर, केरळ
केरळातील त्रिशूरमध्ये असलेले हे मंदिर पाच हजार वर्ष जुने आहे. येथे फक्त हिंदूनाच प्रवेश दिला जातो. गैर-हिंदूंना येथे दर्शनासाठी परवानगी दिली जात नाही. भगवान गुरुवायुरप्पन मंदिराचे इष्टदेव आहेत. त्यांना कृष्णाचे बाळ रुप असल्याचे म्हटले जाते. या ठिकाणाला भगवान कृष्ण आणि भगवान विष्णूचे निवास मानले जाते. याच कारणामुळे याला दक्षिणेकडील वैकुंठ नावाने ही ओळखले जाते.
-जगन्नाथ मंदिर, पुरी
ओडिशातील हे मंदिर भगवान विष्णू यांच्या ८व्या अवताराला समर्पित आहे. येथे भगवान जगन्नाथ यांचा मोठा भाऊ बलभद्र आणि बहिण सुभद्रा हे विराजमान आहेत. मंदिरात पोहचतातच येथे विविध ठिकाणी काही सुचना फलक लिहिण्यात आले आहेत. त्यावर स्पष्टणपणे लिहिले गेले आहे की, येथे केवळ हिंदूंनाच आतमध्ये जाण्याची परवानगी आहे. ज्या हिंदूंचा संबंधित गैर हिंदूंसोबत आहे त्यांना सुद्धा येथे प्रवेश दिला जात नाही. १९८४ मध्ये जेव्हा येथे देशाच्या माजी पंतप्रधान मंत्री इंदिरा गांधी दर्शनासाठी आल्या होत्या तेव्हा त्यांनासुद्धा येथे दर्शनासाठी परवानगी दिली गेली नव्हती.
-कपालेश्वर मंदिर, चेन्नई
सातव्या शतकात उभारण्यात आलेले हे मंदिर द्रविद्र सभ्यतेशी संबंधित आहे. तमिळनाडु मधील मलायपुर मध्ये उभारण्यात आलेले हे मंदिर शंकराला सपर्मित आहे. येथे अशी मान्यता आहे की, याचे नाव शंकराच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. येथे सुद्धा गैर-हिंदूंना दर्शनासाठी परवानगी दिली जात नाही. या व्यतिरिक्त परदेशी पर्यटकांना ही येथे एन्ट्रीन नाही. येथे नियमांचे कठोरपणे पालन केले जाते.
-दिलवाडा मंदिर, माउंट आबू
दिलवाडा मंदिर जैन धर्माला समर्पित आहे. राजस्थान मधील सिरोली जिल्ह्यातील दिलवाडा मंदिर जैन धर्मातील प्रमुख तीर्थस्थळांपैकी एक आहे. ११ व्या आणि १३ व्या शकताच्या मध्यात बनवण्यात आलेले हे मंदिर त्या पाच जैन धर्मातील मंदिरांमध्ये गणले जाते जे आपल्या वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. हे ठिकाणी पर्यटन स्थळ असल्याच्या कारणास्तव एक प्रसिद्ध तीर्थस्थान सुद्धा आहे. परंतु येथे फोटोग्राफीसाठी परवानगी नाही. तसेच गैर-हिंदूंना ही परवानगी नाही.
-विश्वनाथ मंदिर, काशी
हे मंदिर भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. प्राचीन काशी विश्वनाथ मंदिरात सुद्धा गैर-हिंदूंना परवानगी नाही. दरम्यान, काही वेळा परदेशी गैर-हिंदूंना दर्शनाची परवानगी दिली गेली होती. परंतु येथील उत्तर दिशेला असलेल्या ज्ञान कुपोर विहीरीजवळ गैर-हिंदूंना जाण्यास परवानगी नाही. या स्थानाला विशेष पवित्र क्षेत्र मानले जाते. येथे केवळ हिंदूंना येण्याची परवानगी आहे.(Indian Temples)
हे देखील वाचा- जोशीमठाबाबतच्या भविष्यवाणीची चर्चा सुरु
-लिंगराज मंदिर, भुवनेश्वर
उडीसाची राजधानीत असलेल्या या मंदिरात दररोज ६ हजारांहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. येथे सुद्धा केवळ हिंदूंना आतमध्ये जाण्याची परवानगी आहे. येथे यापूर्वी पश्चिमात्य देशातील लोक सुद्धा दर्शनासाठी यायचे. परंतु २०१२ मध्ये एका परदेशी पर्यटकाने मंदिराच्या कर्म-कांडमध्ये समस्या निर्माण केल्या होत्या. त्यानंतर मंदिराच्या ट्रस्ट बोर्डाने गैर-हिंदूंना मंदिराच्या प्रवेशासाठी बंदी घातली.