जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये लंडन मधील ओव्हल मैदानावर सात ते अकरा जून दरम्यान खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी निवड समितीने भारतीय संघाची (Indian team) घोषणा केली. आयपीएल अन घरेलू क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे अजिंक्य रहाणेला संघामध्ये स्थान देण्यात आले आहे. मागच्या वर्षीच्या आफ्रिका दौऱ्यानंतर रहाणेला टीममधून वगळण्यात आलं होतं. सुर्यकुमार यादवला कसोटी संघातून वगळण्यात आलेलं आहे.
अजिंक्य रहाणे भारताकडून शेवटची कसोटी ११ जानेवारी २०२२ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. त्या सामन्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. त्याने भारतासाठी 82 कसोटी सामन्यांमध्ये 38.52 च्या सरासरीने 4932 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 12 शतके आणि 25 अर्धशतके झळकली आहेत. भारताचे अनेक सामन्यांमध्ये कर्णधार राहिलेल्या रहाणेचे 15 महिन्यानंतर टीम इंडियात पुनरागमन झाले आहे. (Indian team)
रहाणेने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जसाठी त्याने पाच डावात 52.25 च्या सरासरीने 209 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 199.04 आहे. याचा फायदा रहाणेला मिळाला आणि त्याची संघात निवड झाली.
रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघात (Indian team) शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली यांसारख्या तगड्या फलंदाजांचा समावेश करण्यात आलेला आहे. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव हे जलद गोलंदाजीची धुरा सांभाळतील तर रवीचंद्रन अश्विन, अक्सर पटेल, रवींद्र जडेजा हे फिरकी गोलंदाजी विभाग बघतील. भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. पहिल्या अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंड कडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
========
हे देखील वाचा : भारतीय संघातील खेळाडू फ्लूएंट इंग्रजी कसे बोलतात? हे आहे सिक्रेट
========
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा ( कर्णधार ), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (यष्टिरक्षक), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्सर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट