भारतात वेगाने डिजिटाइजेशनच्या दिशेने पुढे जात आहे. अशातच लोकांकडून चलनाचा वापर कमी केला जातो. मात्र काही ठिकाणी जेथे केवळ तुम्हाला पैसे द्यावे लागतात तेथे गुगल पे, फोन पे असे डिजिटल प्लॅटफॉर्म ट्रांजेक्शनसाठी उपलब्ध नसतात. भारतीय चलानातील नोटा जरी कागदा सारख्या दिसत असल्या तरीही त्या त्यापासून तयार केल्या जात नाहीत. यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. (Indian Rupee)
सध्या चलनात १०,२०,५०,१००,२००,५०० च्या नोटा चलनात आहेत. या नोटा बनवण्यासाठी कागदाचा बिल्कुल वापर केला जात नाही. कारण त्या कागदी बनवल्या आणि भिजल्या तर घराब होण्याची शक्यता असते. आरबीआयकडून येणारे चलन हे कागदा ऐवजी कापसापासून तयार केली जाते. कागदापेक्षा कापसाच्या नोटांचे आयुष्य अधिक असते.
१०० टक्के कापसाचा वापर
आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर पाहिल्यास तर नोटा बनवण्यासाठी १०० टक्के कापसाचा वापर केला जातो. कापसापासून तयार करण्यात आलेली नोट ही कागदापेक्षा अधिक मजबूत आणि टिकावू असते. भारताव्यतिरिक्त काही अन्य देश ही नोटा बनवण्यासाठी कापसाचाच वापर करतात.काही लोकांना असे वाटते की, नोटा या कागदाच्या असतात. मात्र तसे नाही आहे.
लेनिनची मुख्य भुमिका
कापसामध्ये लेनिन नावाचे एक फायबर आढळते. याच्याच मदतीने नोट तयार केले जातात. कपासाच्या रेश्योमध्ये असलेल्या लेनिनसह गॅटलिन आणि Adhesive Solution चा एकत्रित केले जाते. त्यामुळे नोट अधिक काळ टिकून राहते. नोटा तयार करातना काही प्रकारच्या सिक्युरिटी फिचर्सचा ही वापर केला जातो. जेणेकरुन बनावट नोटा तयार करुन नागरिकांची फसवणूक होऊ नये. सिक्युरिटी फिचर्स व्यतिरिर्त खरी आणि बनावट नोटेतील अंतर सहज समजून येते. (Indian Rupee)
RBI ने सांगितले नोटांची ओळख कशी कराल?
नोट जर एखाद्या लाइटसमोर धरल्यास तुम्हाला तेथे ५०० लिहिलेले दिसेल. डोळ्यांच्या समोर ४५ डिग्री अँगलने जरी नोट पकडल्यास तरीही ५०० च लिहिलेले दिसेल. ते देवनागिरीत लिहिललेले असते. तसेच महात्मा गांधी यांचा फोटो अगदी मधोमध दाखवला गेला आहे. भारत आणि India असे लिहिलेले ही नोटेवर दिसते. नोटेत हलकी दुमडल्यास तर सिक्युरिटी थ्रीडच्या रंगाचा हिरवा हा निळा रंग होताना दिसेल. जुन्या नोटच्या तुलनेत गवर्नगर यांची स्वाक्षरी, गॅरेंटी क्लॉज, प्रॉमिस क्लॉज आणि आरबीआयचा लोगो डाव्या बाजूला सरकवण्यात आला आहे. महात्मा गांधीजींचा फोटो असून इलेक्ट्रोटाइप वॉटरमार्क ही दिसतो.
हे देखील वाचा- गुंतवणूकीशिवाय करता येईल ‘हा’ व्यवसाय, होईल उत्तम नफा
नोटेची इंक असते खास
नोट छापण्यासाठी आरबीआयकडून एका खास प्रकारच्या इंकचा वापर केला जातो. ही इंक केवळ नोटा छपाईसाठीच खासकरुन तयार केली जाते. ती स्विर्त्झलँन्डची कंपनी SICPA कडून येते.