भारतीय रेल्वे जगातील सर्वाधिक चौथी मोठे रेल्वे नेटवर्क असून जो ६८ हजार किमी लांब असलेल्या रेल्वेमार्गावर प्रति दिन शेकडो ट्रेन चालवतात. लाखो लोकांचे आयुष्य या रेल्वेशी जोडले गेले आहे. त्यामुळे याच संबंधित एक-एक माहिती मिळवण्यासाठी प्रत्येकजण उत्साही असतो. अशातच आपण कधीतरी अनुभव केला असेल की, काही ट्रेन स्थानकात पोहचण्यापूर्वी थांबवल्या जातात. त्याला आउटर असे म्हटले जाते. (Indian Railway)
ट्रेनमधून प्रवास करताना हा शब्द कधी ना कधी कानावर पडला असेल. मात्र ट्रेन्स आउटरमध्ये का उभ्या केल्या जातात? स्थानकातच का उभी केली जात नाही. कधी-कधी तास् न तास ती थांबवली जाते. अशातच वैतागलेले प्रवासी लोको पायलट यांच्याशी वाद ही घालतात. पण या स्थितीत तो काहीच करु शकत नाही. कारण ट्रेन्स या आउटरच्या येथे थांबवण्याचा निर्णय त्यांचा नसतो. जो पर्यंत त्यांना ग्रीन सिग्नल मिळत नाही तोपर्यंत ते पुढे जाऊ शकत नाहीत.
का थांबते आउटवर ट्रेन?
असे एकत्रित अथवा २ किंवा त्याहून अधिक ट्रेन एकाच प्लॅटफॉर्म येणार असल्याच्या कारणास्तव होते. बहुतांश स्थानकांवर ट्रेनचे ठरवलेले प्लॅटफॉर्म असतात. जेणेकरुन लोकांना ते शोधावे लागणार नाहीत. पण कधी-कधी यामध्ये स्थितीनुसार बदल ही केला जातो.
कोण आणि कसा घेतला जातो निर्णय?
हा निर्णय स्थानक प्रबंधकांचा असतो. ते ठरवतात की, कोणत्या ट्रेन्सला बाहेर थांबवावे अथवा कोणत्या प्लॅटफॉर्मवर आणावे. त्यामुळेच लोको पायलट हे काहीच करु शकत नाहीत. स्थानक मॅनेजरचा हा निर्णय अशा आधारावर घेतो की, कोणती ट्रेन उशिराने धावत आहे. प्रयत्न केला जातो की, जी ट्रेन आधीपासून उशिराने धावत आहे तिला थांबवून जी योग्य वेळेनुसार धावत आहे तिला सोडावे. दरम्यान, राजधानी आणि शताब्दी जर कोणत्याही अन्य एक्सप्रेस अथवा सुपरफास्ट ट्रेनच्या वेळेत आली तर राजधानी-शताब्दीला पुढे पाठवले जाते.जसे की, एखादी एक्सप्रेस ही मुंबईतील ३ नंबर प्लॅटफॉर्मला आणायची असेल आणि त्याच वेळी दुसरी ट्रेन तेथे आली व तिचा ही प्लॅटफॉर्म ३ आहे. अशावेळी दोघांपैकी एका ट्रेनला आउटरवर उभे केले जाते. (Indian Railway)
हे देखील वाचा- देशातील हा एकमेव खासगी रेल्वे मार्ग तुम्हाला माहितेय का?
तर दररोज रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या काही गाड्यांचे डबे हे कमी जास्त असतात. अशातच त्यानुसार ही ट्रेनचे प्लॅटफॉर्म ही ठरवले जाते. हेच कारण असते की, सर्व प्लॅटफॉर्मची लांबी एकसमान नसते.