Home » चालत्या ट्रेनमध्ये तिकीट हरवल्यास अथवा फाटल्यास काय करावे?

चालत्या ट्रेनमध्ये तिकीट हरवल्यास अथवा फाटल्यास काय करावे?

जर तुम्ही ट्रेनच्या माध्यमातून ट्रॅव्हल करत असल्यास तर ही तुमच्या कामाची माहिती आहे. कधीकधी असे होते की, आपल्याला अचानक ट्रॅव्हल करावे लागत असताना विंडो तिकीट घ्यावे लागते. पण त्याचवेळी तिकीट हरवल्यास काय करावे? याबद्दलच जाणून घेऊया...

by Team Gajawaja
0 comment
Boarding Station Change
Share

Indian Railway : भारतात दररोज लाखोच्या संख्येने नागरिक प्रवास करतात. प्रत्येकजण वेगवेगळ्या कोचनुसार प्रवास करतात. तुम्ही कोणत्याही कोचमधून प्रवास केला तरी चालते. पण तुमच्याकडे तिकीट असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जनरल कोचमधूनही प्रवास करत असाल तरीही तुम्हाला तिकीट काढावी लागते. पण कधीकधी घाईघाईत तुमचे तिकीट हरवल्यास काय करावे? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर….

ही पद्धत वापरा
तुमचे तिकीट हरवल्यास तुम्ही तिकीट विंडोवरु त्याच प्रवासाचे डुप्लिकेट तिकीट घेऊ शकता. यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, डुप्लिकेट तिकीट दोन अटींवर दिले जाते. एकतर तिकीट कंम्फर्म असावे अथवा आरएसी म्हणजेच रिझर्व्हेशन अगेंस्ट कॅसिलेशन असावी. तिकीट हरवल्यास डुप्लिकेट तिकीटासाठी तुम्हाला स्लिपर कॅटेगरीसाठी 50 रुपये आणि त्यावरील कॅटेगरीसाठी 100 रुपये चार्ज द्यावा लागेल.

हरवलेले तिकीट मिळाल्यानंतर काय?
तुम्हाला तिकीट मिळत नसल्यास आणि टीटी चेकिंगसाठी आल्यास नियमानुसार दुसरे तिकीट तयार करून घ्या. यानंतर हरवलेले तिकीट मिळाल्यास घाबरू नका. तुम्ही जसे डुप्लिकेट तिकीटासाठी पैसे दिले होते ते रिफंड मिळवू शकता. यासाठी तिकीट काउंटवर जावे लागेल. यानंतर 20 रुपये अथवा 50 रुपये कापून तिकीटाचे उर्वरित सर्व पैसे तुम्हाला परत दिले जातील. (Indian Railway)

रेल्वे देते ही सुविधा
एखाद्या व्यक्तीकडे कंम्फर्ट तिकीट असल्यास आणि प्रवासावेळी ट्रेन अपघात झाल्यास त्या व्यक्तीला 7.5 लाख रुपयांचा बीमा कव्हर मिळतो. याशिवाय हॉस्पिटलच्या उपचारासाठी दोन लाख रुपयांपर्यत मदत केली जाते. अथवा प्रवाशाचा मृत्यू झाल्यास अथवा विकलांगता आल्यास त्या व्यक्तीच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांचा बीमा दिला जातो. सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट अशी की, तिकीट भरताना नॉमिनीचे डिटेल योग्य भरावे. जेणेकरुन तुम्ही क्लेम करू शकता.


आणखी वाचा :

कोट्यावधी Views मिळाल्यानंतरही युट्यूब करू शकतो तुमचा व्हिडीओ डिलीट, जाणून घ्या नियम

जन्मदर वाढवण्यासाठी जपानमध्ये चक्क डेटिंग ॲप


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.