Indian Railway : भारतीय रेल्वेमधून दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी यात्रा करतात. एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी दररोज मोठ्या प्रमाणात तिकीट बुकिंगही केले जाते. खरंतर, ट्रेनच्या माध्यमातून प्रवास करणे स्वस्त आणि सुरक्षित मानले जाते. यामुळेच भारतीय रेल्वेला देशाची लाइफलाइन मानले जाते. देशात दररोज हजारोंच्या संख्येने ट्रेन चालवल्या जातात. त्यापैकी काही स्पेशल ट्रेनही असतात. दिवाळी, होळी, गणोशोत्सव अशा महत्त्वाच्या सणांवेळी स्पेशल ट्रेन सोडल्या जातात. याच ट्रेनमध्ये कंन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी काय करावे याबद्दल जाणून घेऊया सविस्तर…
तिकीट काउंटर सुरु झाल्यानंतर बुकिंग करा
तिकीट काउंटर सुरु झाल्यानंतर लगेच तिकीट बुकिंग केल्यास तुमचे अधिक पैसे खर्च होणार नाहीत. खरंतर, स्पेशल ट्रेनच्या तिकीच फ्लेक्सिबल असतात. म्हणजेच जसा दिवस सुरु होतो तेव्हा तिकीटांचे शुल्क कमी आणि दिवस पुढे जातो आणि अधिक तिकीट विक्रीसाठी रांग लागते तेव्हा तिकीटांचे पैसे वाढले जातात.
थर्ट पाटी अॅपच्या माध्यमातून तिकीट बुक करू नका
जर तुम्ही अन्य वेबसाइटच्या माध्यमातून तिकीट बुकिंग करणार असाल तर तसे करून नका. अन्यता तुम्हाला तिकीटासाठी अतिरिक्त 50-60 रुपये मोजावे लागतील. काहीवेळेस आयआरसीटीसी अॅपमधूनही तिकीटासाठी अधिक पैसे घेतले जाऊ शकतात.
अन्य वेबसाइटवरुन तिकीट बुक करताना कूपन वापरा
रेल्वे काउंटवर तिकीट बुकिंग करणार नसाल तर थर्ट पार्टी अॅपची मदत घेणार असल्यास तेथे उपलब्ध असलेल्या कूपन्सचा वापर करा. आजकाल अॅपमध्ये वेबसाइट किंवा अॅप स्पेशल ट्रेनच्या तिकीट बुक करताना ऑफर देतात. (Indian Railway)
आयआरसीटीसी प्लॅटिनम कार्डचा वापर करा
आयआरसीटीसीने एसबीआयसोबत मिळून तिकीट बुकिंगसाठी प्लॅटिनम कार्ड लाँच केले आहे. याच्या माध्यमातून प्रवासावेळी सूट दिली जाते. जर तुम्ही आयआरसीटीसीच्या वेबसाइटच्या माध्यमातून तिकीट बुकिंग करत असल्यास प्लॅटिनम कार्डचा वापर करू शकता. यावेळी रिवॉर्ड पॉइंट म्हणून 10 टक्के तिकीटावर बचत करू शकता.