Home » रेल्वेत एका तिकिटावर मर्यादेपेक्षा अधिक सामान घेऊन जात असाल तर भरावा लागेल दंड

रेल्वेत एका तिकिटावर मर्यादेपेक्षा अधिक सामान घेऊन जात असाल तर भरावा लागेल दंड

by Team Gajawaja
0 comment
Indian Railway
Share

दिवाळी आणि छट पूजेच्या काळात बहुतांश लोक प्रवास करत आहेत. अशातच तुम्ही जर भारतीय रेल्वेने प्रवास करणार असाल तर ही माहिती तुमच्या कामी येणार आहे. कारण ज्यावेळी तुम्ही प्रवास कराल तेव्हा तुमच्याकडे मर्यादेपेक्षा अधिक सामान आढळल्यास तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. तर हा दंड तुम्ही रेल्वेच्या कोणत्या कोचमधून जात आहात त्यावर अवलंबून असणार आहे. (Indian Railway Rule)

रेल्वेत स्लीपर कोच, टीयर-२ कोच आणि फर्स्ट क्लास कोचमध्ये सामान घेऊन जाण्यासाठी मर्यादा आणि नियम ठरवण्यात आले आहेत. त्यानुसार तुम्ही मर्यादेपेक्षा अधिक सामान आपल्या सोबत घेऊन जाऊ शकत नाहीत. तुमच्या तिकिटाच्या हिशोबाने तुमच्याकडे रेल्वेने प्रवास करताना किती सामान असावे हे ठरवण्यात आले आहे.

रेल्वेच्या नियमांनुसार, स्लीपर कोचमध्ये एका पॅसेंजरला ४० किलोपर्यंतचे सामान नेण्यास परवानगी आहे. जर दोन लोक आहेत तर ८० किलोपर्यंतचे सामान नेऊ शकता. ही मर्यादा प्रति पॅसेंजरनुसार आहे. तसेच टीयर-२ कोटमध्ये एक प्रवासी ५० किलो सामान घेऊन जाऊ शकतो. फर्स्ट क्लासमध्ये ही मर्यादा थोडी अधिक असते. फर्स्ट क्लासमध्ये ७० किलोपर्यंतचे सामान आपल्यासोबत घेऊन जाता येते. (Indian Railway Rule)

हे देखील वाचा- 5G सुविधेचे फायदे-तोटे तुम्हाला माहितेयत का? जाणून घ्या अधिक

दंडासंदर्भात काय आहे नियम?
जर एखाद्या प्रवाशाकडून मर्यादेपेक्षा अधिक सामान रेल्वेतून नेले जात असेल तर त्याला ५००० किलोमीटरच्या प्रवासात ६०० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. तर दंडाची रक्कम ही तुम्ही किती किमीचा प्रवास केला त्यानुसार ठरवली जाणार आहे. अधिकच सामान असेल तर ते तुम्हाला लगेज बोगीमध्ये जमा करावे लागते.

दरम्यान, ज्यावेळी आपण रेल्वेने प्रवास करतो तेव्हा आपल्याला विविध रंगाचे कोच दिसतात. त्याचा सुद्धा अर्थ आहे. त्यानुसार निळ्या रंगाचे कोचला Intergral Coach Factory असे म्हटले जाते. या कोचचा वेग ७० ते १४० किमी प्रति तास असते. याचा वापर बहुतांश करुन मेल एक्सप्रेस किंवा सुपरफास्ट ट्रेनसाठी केला जातो. तर लाल रंगाच्या कोचला Linke Hofmann Bush असे म्हटले जाते. या कोच वर्ष २००० मध्ये जर्मनीवरुन भारतात आणले होते. या कोचला डिस्क ब्रेकसह २०० किमी प्रति तास वेगाने धावतात. त्याचसोबत हिरव्या रंगाचे कोच हे गरीब रथ ट्रेनसाठी वापरले जातात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.