रेल्वे स्थानकात काही बोर्ड लावलेले असतात. ज्या ठिकाणचे बोर्ड असते त्याचे फलक पिवळ्या रंगात मोठे लावले जाते. पण तुम्ही या पिवळ्या रंगाच्या बोर्डवर लिहिलेल्या ठिकाणाच्या नावाकडे निरखून पाहिलेय का? (Indian Railway Board)
रेल्वे स्थानकाच्या नावामागे जंक्शन, टर्मिनल आणि रोड असे शब्द लिहिलेले असतात. पण तुम्हाला याबद्दल कधी प्रश्न पडलाय का? खरंतर प्रवाशांना काही खास माहिती देण्यासाठी या शब्दांचा वापर केला जातो. रेल्वे स्थानकाच्या नावामागे रोड शब्द लावण्यामागेही एक खास कारण आहे. हा शब्द प्रवाशांना हे दर्शवितो की, स्टेशन हे शहरात येत नाही. तर शहरापासून काही अंतरावर आहे. हे अंतर दोन ते शंभर किलोमीटर पर्यंत असू शकते.
यामुळे जेव्हा कधी हजारीबाग रोड, रांची रोडसारख्या रेल्वे स्थानकात उतरत असाल तर शहरात जाण्यासाठी तुम्हाला रेल्वे प्लॅटफॉर्मवर उतरून एखाद्या वाहनाने जावे लागेल.

Indian Railway Board
किती अंतर असू शकते?
रोड नाव असलेले रेल्वे स्थानक हे शहरापासून दोन ते तीन किलोमीटर असू शकतात. अथवा शंभर किलोमीटरचे अंतरही असू शकते. जसे की, वसई रोड रेल्वे स्थानक वसईपासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. अशाप्रकारे हजारीबाग रेल्वे स्थानक हे हजारीबाग शहरापासून 66 किलोमीटर दूर आहे. पण बहुतांश रेल्वे स्थानकांच्या आजूबाजूला लोकसंख्या वाढू लागली आहे. मात्र ज्यावेळी ही रेल्वे स्थानक तयार करण्यात आली तेव्हा कोणीही त्याच्या आजूबाजूला राहायचे नाहीत. (Indian Railway Board)
शहरात का बनवत नाहीत रेल्वे स्थानक?
काही शहरांमध्ये रेल्वे मार्ग तयार करण्यास अडथळे येतात यामुळे ते शहरांपासून दूरवर बांधले जातात. जसे की, माउंट आबू डोंगरावर रेल्वे मार्ग सुरू करणे अत्यंत खर्चिक होते. तर आबूपासून 27 किमी दूरवर डोंगराच्या खाली रेल्वे स्थानक तयार करण्यात आले.
हेही वाचा: फ्लाइट रद्द झाल्यानंतर रिफंड मिळलेच पण ‘या’ गोष्टींसाठीही आहात हकदार