Home » परदेशातील तुरुंगात कोणत्या गुन्ह्याची शिक्षा भोगतायत ११ हजारांहून अधिक भारतीय नागरिक?

परदेशातील तुरुंगात कोणत्या गुन्ह्याची शिक्षा भोगतायत ११ हजारांहून अधिक भारतीय नागरिक?

by Team Gajawaja
0 comment
Indian Prisoner
Share

आयुष्यात प्रगती होईल अशा अपेक्षेने हजारोंच्या संख्येने भारतीय विदेशाकडे वळतात. तर लाखांच्या संख्येने काही भारतीय असे सुद्धा आहेत जे दिवस-रात्र परदेशात जाण्याचे स्वप्न पाहतात. याच दरम्यान हजारो लोक अशी सुद्धा आहेत जी परदेशात जाण्यास यशस्वी झाली पण तेथे उत्तम आयुष्य जगण्याऐवजी त्यांना तुरुंगात जावे लागले.कारण परदेशातील काही नियम आणि कायदे हे भारतापेक्षा फार वेगळे आणि अधिक कठोर ही आहेत.(Indian Prisoner)

लोकसभेचे खासदार अरविंद धर्मपुरिया यांच्या द्वारे विचारण्यात आलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरात परराष्ट्र राज्यमंत्री वी. मुरलीधरन यांच्याद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्याच्या काळात परदेशातील तुरुंगात जवळजवळ ८२८० भारतीय नागरिक कैदेत आहेत. यामधील अंडरट्रायल कैद्यांच्या रुपात १२९७ भारतीय तुरुंगात कैद आहेत. तसेच ३५८० भारतीयांना तेथील स्थानिक कोर्टाकडून शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Indian Prisoner
Indian Prisoner

परराष्ट्र राज्यमंत्री वी. मुरलीधरन यांनी आपल्या लेखी उत्तरात असे म्हटले की, परदेशातील तुरुंगात बंद असलेले ३४०३ भारतीय असे सुद्धा आहेत ज्यांची स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही की ते दोषी आहेत की अंडरट्रायल कैदी आहेत. परराष्ट्र मंत्रालयानुसार सर्वाधिक १८५८ भारतीय नागरिक हे संयुक्त अमीरातच्या तुरुंगात बंद आहेत. ज्यामध्ये जवळजवळ ४० महिलांचा सुद्धा समावेश आहे.

जवळजवळ ६९ विविध देशांच्या तुरुंगात कैद आहेत ८२८० भारतीय नागरिक
परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसर, ६९ विविध देशांच्या तुरुंगात जवळजवळ ८२८० भारतीय नागरिक कैद आहेत. मोठ्या आकड्यांबद्दल बोलायचे झाल्यास तो सर्वाधिक १८५८ ऐवढे भारतीय हे संयुक्त अमीरातच्या तुरुंगात आहेत. त्यानंतर १३४६ भारतीय सौदी अरबच्या तुरुंगात आहे. यापैकी ४७० भारतीयांच्या विरोधात गुन्हेगारी प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरु आहे आणि ८७६ भारतीय अंडरट्रायल असून आपली शिक्षा पूर्ण करत आहेत.(Indian Prisoner)

हे देखील वाचा- विद्यार्थ्यांसाठी कोटा ठरतोय मृत्यूचा दरवाजा, प्रत्येक वर्षात आत्महत्येच्या संख्येत होतेय वाढ

असे गुन्हे ज्याअंतर्गत तुरुंगात कैद आहेत भारतीय
परदेशातील तुरुंगात भारतीयांच्या गु्न्ह्यांबद्दल बोलायचे झाल्यास बहुतांश अवैध रुपात संबंधित देशाची सीमा पार करणे, अवैध रुपात त्या देशात राहणे, ऐव्हर स्टेन करणे अशा गुन्हाअंतर्गत तुरुंगात बंद आहेत. या व्यतिरिक्त काही भारतीय अंमली पदार्थांची तस्करी, पारिवारिक हिंसा, रस्ते अपघात, चेक बाउंस सारख्या गुन्हांमुळे तुरुंगात आहेत. काही जण तर हत्या, हत्येचा प्रयत्न, मानवी तस्करी, बलात्कार अशा गंभीर गुन्हांअंतर्गत तुरुंगात बंद आहेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.