गेल्या काही काळापासून सिनेमासृष्टीत रिमेक हा शब्द अगदी कॉमन झाला आहे. बॉलिवूड मधील बहुतांश सिनेमे हे साउथ सिनेमांचे रिमेक आहेत. त्यापैकी काही सिनेमे खुप गाजले तर काही फ्लॉप झाले. अशातच आता एका भारतीय सिनेमाचा कोरियात रिमेक होणार आहे. सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलची धुम पहायला मिळत आहे. याच फेस्टिव्हल दरम्यान याची घोषणा केली गेली. या सिनेमाच्या घोषणेमुळे आनंद व्यक्त केला जात आहे. (Indian Film Korean Remake)
ज्या सिनेमाचे कोरियन भाषेत रिमेक होणार आहे तो म्हणजे साउथ सुपरस्टार मोहनलाल याचा प्रसिद्ध मल्याळम फ्रेंचाइजी दृश्यम सिनेमा. या सिनेमाची कथा प्रत्येकाच्या पसंदीस पडली आहे. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली होती. हिंदीत सुद्धा त्याचे रिमेक तयार करण्यात आला आहे. त्यात अजय देवगण हा मुख्य भुमिकेत दिसून आला होता. दृश्यम सिनेमाचा दुसरा पार्ट ही बॉलिवूड मध्ये काढला गेला होता. त्याची कथा सुद्धा सस्पेन थ्रिलरच होती. तर आता कोरियन भाषेत या मल्याळम सिनेमाचा ऑफिशयल रिमेक तयार केला जाणार आहे.
इंडियन प्रोडक्शन हाउस पनोरमा स्टुडिओ आणि साउथ कोरियन प्रोडक्शन कंपनी एंथोलॉजी स्टुडिओन कोरियन दृश्यम रिमेक बनवण्यासाठी पार्टनरशिप केली आहे. दोन्ही कंपन्यांमधील ही पार्टनरशिप सिनेमा जगातील सर्वाधिक मोठा फेस्टिव्हलकान्स मध्ये झाली. हा निर्णय २१ मे रोजी झाला. येणाऱ्या काळात कोरियन प्रेक्षकांसाठी दृश्यम सिनेमाची कथा पहायला मिळणार आहे. खरंतर हा सिनेमा एक क्राइम थ्रिलर आहे.
असे पहिल्यांदाच झाले आहे की, जेव्हा एखादा इंडियन आणि साउथ कोरियन स्टुडिओ एकत्रित आले आहे. या दोन्ही देशांच्या प्रोडक्शन हाउसमधील हे पहिलेच कोलॅब्रेशन आहे. त्याचसोबत असे पहिल्यांदा होत आहे की, जेव्हा एखाद्या इंडियन सिनेमाचा कोरियन भाषेत ऑफिशियल रिमेक तयार केला जाणार आहे.(Indian Film Korean Remake)
हेही वाचा- एकेकाळी जेवणासाठी सुद्धा नव्हते पैसे… आज साउथ इंडस्ट्रीत बोलबाला
खरंतर असे दुसऱ्यांदा होत आहे की, जेव्हा दृश्यमचा इंटरनॅशनल भाषेत रिमेक केला जाणार आहे. यापूर्वी सुद्धा चीनी भाषेत सुद्धा या सिनेमाचा रिमेक तयार करण्यात आलेला आहे. चीनी भाषेत या सिनेमाचा रिमेक शीप विदाउट अ शेफर्ड नावाने बनवण्यात आला होता. आता हे पाहणे फार उत्सुकतेचे असणार आहे की, कोरियन भाषेतील या सिनेमाने नाव काय असणार आहे. तसेच हा सिनेमा कधी प्रदर्शित केला जाईल.