GDP च्या पहिल्या तिमाहीची आकडेवारी आली आहे. जीडीपी विकास दर हा आरबीआय आणि काही संस्थांच्या अनुमानापेक्षा कमी आला आहे. अशातच प्रश्न उपस्थितीत राहत आहे की, खरंच यंदाच्या वर्षात भारत ७.२ टक्के विकास दर गाठू शकतो का? येत्या काळात भारतात व्याज दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर जाणून घेऊयात या संदर्भातील काही गोष्टींबद्दल अधिक. (Indian Economy)
भारताची स्थिती कोणत्या क्षेत्रात उत्तम?
पहिल्या तिमाहीतील आकडेवारीवर अर्थशास्री डॉ. वृंदा जागीरदार यांनी आकलन केले आहे की, सध्याचे आकडेवारी निराशाजनक आहे. पुढील तिमाहित कॉन्टेक्ट इटेंसिव सर्विस अधिक उत्तम असणार आहे. अशातच ७.२ टक्के आकडेवारी पर्यंत पोहचणे थोडे कठीण आहे.
सध्याच्या काळात काही जागतिक आव्हान आहेत. परंतु भारताची स्थिती जगातील मजबूत अर्थव्यवस्थांपेक्षा उत्तम आहे. सध्याच्या वेळी जो फॅक्टर भारतात काम करत आहे त्यांच्याबद्दल सांगत डॉ. वृंदा जागीरदार यांनी असे म्हटले की, कॉर्पोरेट बॅलेंन्स शट उत्तम झाली आहे. काही वर्षानंतर बँकांची बॅलेंस शीट उत्तम आहे. फॅक्टर यांची Capacity Utilisation ७५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. अशातच कंपन्यांना आपल्या फॅक्टरला विस्तार देत आहे.
या व्यतिरिक्त Consumption मध्ये ग्रोथ दिसून येत आहे. आता आपण प्री कोविड स्तरावर पोहचलो आहोत. अशातच मागणी आणि गुंतवणूकीचे चक्र सुरु झाल्यास विकास दर वाढू शकतो. तिसरा म्हणजे, कॅपिटल गुड्स सेक्टर, यामध्ये वर्षानंतर २० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. अशातच येणाऱ्या तिमाहित याचा फायदा मिळणार आहे.
चौथा म्हणजे कॉन्टेक्ट इटेंसिव सेक्टरवर कोविडचा सर्वाधिक फटका बसला. या सेक्टरमध्ये तिमाही दर सुधारल्याचे दिसून आले आहे. येणाऱ्या काळात तो अधिक उत्तम होण्याची शक्यता आहे.
कुठे आहेत आव्हान?
भारतासमोर आव्हाने कमी नाहीत. अर्थशास्री डॉ. वृंदा जागीरदार यांनी असे म्हटले की, मॅन्युफॅक्चरिंग आणि खाणकाम क्षेत्रातील प्रगती तितकीशी उत्तम नाही आहे. हे क्षेत्र काही प्रकारच्या उद्योगांसाठी कच्चा माल आणि उत्पादन तयार करतात.ते अर्थव्यवस्थेत मल्टिप्लायर इफेक्ट निर्माण करण्यासह मोठ्या संख्येने रोजगार सुद्धा उपलब्ध करतो. त्यामुळेच यावर तातडीने लक्ष दिले पाहिजे.
व्याजदार वाढणार का?
संपूर्ण जगात महागाई वाढू शकते. विकसित देशांमध्ये अधिक प्रभाव पडू शकतो. अमेरिकेच्या सेंट्रल बँक आणि अन्य प्रमुख केंद्रीय बँकांनी त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्याजदर वाढवले आहेत. भारतात सुद्धा आरबीआयने आतापर्यंत व्याज दरात १.४ टक्क्यांची वाढ केली आहे. अशातच जर पुढे सुद्धा व्याज दर वाढल्यास तर त्याचा विकास दरावर प्रभाव पडू शकतो.(Indian Economy)
वृंदा जागीरदार यांनी म्हटले की, भारतात महागाईचा दर जगापेक्षा कमी आहे. मात्र आता सुद्धा आरबीआयद्वारे दिलेली ६ टक्क्यांची मर्यादा अधिक आहे. दरम्यान, ही वाढ पश्चिमी देश जसे अग्रेसिव्ह नसेल. परंतु भारतात महागाई आणि विकास दरम्यान संतुलन करावे लागणार आहे.
हे देखील वाचा- इराक मध्ये सुद्धा श्रीलंकेसारखी स्थिती, नक्की काय झाले आहे जाणून घ्या
जगभरात विकास दर थांबल्यास काय परिणाम होऊ शकतो?
IMF ने सांगितले की, या वर्षात जगभरातील जीडीपी दर ३.२ टक्के असेल. दरम्यान, आयएमएफने भारतातील विकास दर ७.४ टक्के असण्याचा अनुमान लावला होता. अशातच विदेशातील मागणी कमी झाल्यास आपल्या निर्यातीला नुकसान पोहचू शकते. अशातच भारतात विकास दरला किती नुकसान होऊ शकते?
डॉ. वृंदा जागीरदार यांनी असे म्हटले की, नक्कीच निर्यातीत भारताला आव्हानांचा सामना करु शकतो. मात्र याच दरम्यान असे दिसून आले की, जगभरातील विकास दर पडण्यासग कमोडिची्या किंमती कमी झाल्याचे दिसून येत आहे. क्रुड ऑइलच्या किंमती कम झाल्यानंतर भारताला दिलासा मिळेल.