डिजिटल इंडियाच्या जमान्यात युपीआय पेमेंटचे चलन अधिक वाढले गेले आहे. तरीही करकरीत नोटा हातात घेऊन त्या मोजण्याची मजा अजूनही तशीच आहे. काही लोकांना करकरीत नोटा जमा करण्याची आवड असते. त्यांच्याकडे प्रत्येक काळातील नोटा सुद्धा मिळतील. परंतु नोटांवर कोणत्या आणि किती भाषा छापल्या आहेत याचे उत्तर फार कमी लोकांना माहिती असावे. (Indian Currency)
भारतीय नोटांवर किती भाषा असतात?
आरबीआयनुसार भारतीय चलनावर जवळजवळ १७ भाषा लिहिलेल्या असतात. सध्याच्या चलनावर पाहिले असता तर तुम्हाला मध्ये १५ भाषा छापलेल्या दिसतील. खरंतर १७ च भाषा छापलेल्या असतात. पण त्यात हिंदी आणि इंग्रजी भाषेचा समावेश नाही. या दोन्ही भाषा मोठ्या अक्षरात पुढे-मागे लिहिलेल्या असतात. अशाप्रकारे भारतीय नोटांवर एकूण १७ भाषांमध्ये त्याची वॅल्यू प्रिंटेड असते. आता या भाषा कोणत्या आहेत हे पाहू.
नोटांवर इंग्रजीव्यतिरिक्त असमिया, बांग्ला, गुजराती, कन्नड, कश्मीरी, कोंकणी, मल्याळम, मराठी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगु आणि उर्दू भाषेत नोटेची वॅल्यू लिहिलेली असते.
ऐवढ्या भाषांमध्ये का लिहिली जाते किंमत?
खरंतर ही माहिती काही प्रमाणात नोट ही बनावट आहे की खरी हे कळण्यासाठी असते.जर एखाद्या नोटेवर हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त १५ पेक्षा कमी किंवा अधिक भाषा असतील तर याचा अर्थ असा होतो की, ती नोट बनावट आहे. (Indian Currency)
नुकत्याच आरबीआयचा एक रिपोर्ट समोर आला होता. त्यानुसार देशात ५०० च्या बनावट नोटांच्या प्रकरणात फार मोठी वाढ होत आहे. तर २०२२-२३ मध्ये ५०० रुपयांच्या जवळजवळ ९१ हजार ११० बनावट नोटा पकडल्या गेल्या होत्या. ज्या २०२१-२२ च्या तुलनेत १४.६ टक्के अधिक आहेत. २०२०-२१ मध्ये ३९,४५३ बनावट नोटा होत्या.
दरम्यान, सध्या आरबीआयने दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्याची मर्यादा वाढवली आहे. त्यामुळे नागरिकांना त्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी ७ ऑक्टोंबर, २०२३ पर्यंत वेळ दिली आहे. याआधी ३० सप्टेंबर, २०२३ ही अखेरची तारीख होती. आरबीआयच्या मते दोन हजारांच्या नोटा लीगर डेंटर राहणार आहेत.
हेही वाचा- चेकवरील ‘या’ खास क्रमांकावरुन कळते तुमच्या खात्याची संपूर्ण माहिती