Home » भारतीय संघातील खेळाडू फ्लूएंट इंग्रजी कसे बोलतात? हे आहे सिक्रेट

भारतीय संघातील खेळाडू फ्लूएंट इंग्रजी कसे बोलतात? हे आहे सिक्रेट

by Team Gajawaja
0 comment
Indian Cricketers
Share

गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय संघात असे काही खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे जे लहान शहर किंवा तालुक्यातील आहेत. देशाअंतर्गत क्रिकेटच्या मैदानात उत्तम खेळी करत या खेळाडूंनी भारतीय संघात आपले स्थान मिळवले.अशातच आपण खुप वेळा पाहिले असेल की, प्रेस कॉन्फ्रेंन्स मध्ये भारतीय खेळाडूंना इंग्रजीतच प्रश्न विचारले जातात. त्याचे उत्तर ही ते इंग्रजीत देतात. ऐवढेच नव्हे तर इंग्रजी कमेंटटर्स ही जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा ते अगदी सहज इंग्रजीतून बोलतात. परंतु भारतीय संघात प्रवेश मिळाल्यानंतर ते फ्लूएंट इंग्रजी बोलू लागतात. त्यामुळे कधीकधी असा प्रश्न उपस्थितीत राहतो की, भारतीय संघात आल्यानंतर इंग्रजी भाषा येणे खरंच गरजेचे असते का? (Indian Cricketers)

खरंतर भारतीय संघात उत्तम खेळी केल्यानंतरच तुम्हाला प्रवेश दिला जातो. याचा इंग्रजी भाषा बोलण्याशी काहीही संबंध नाही. तुम्ही हे जाणून हैराण व्हाल की, महेंद्र सिंह धोनी, वीरेंद्र सहवाग आणि प्रवीण कुमार यांना सुद्धा सुरुवातीला इंग्रजी भाषेत बोलणे जमत नव्हते. परंतु आता हेच खेळाडू उत्तम इंग्रजी बोलतात.

भारतीय खेळाडू कसे शिकतात इंग्रजी
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच BCCI खेळाडूंच्या पर्सनालिटी डेवलपमेंटवर खास लक्ष देते. इंग्रजी भाषा सुद्धा त्यामधीलच एक हिस्सा आहे. बोर्ड हे लक्षात ठेवते की, परदेशी दौऱ्या दरम्यान, खेळाडून सहज इंग्रजी बोलू शकेल. त्यासाठी बीसीसीआय खास व्यवस्था सुद्धा करते. बोर्ड खेळाडूंसाठी पर्सनालिटी डेवलपमेंट आणि इंग्लिश स्पिकिंगचे कोर्स करवून घेतात. जेणेकरुन त्यांना कोणतीही समस्या येऊ नयेत.

भारतीय अंपायर्सला ही शिकवले जाते इंग्रजी
The Economics Times मध्ये २०१५ रोजी याच संदर्भातील एक रिपोर्ट आला होता. इंग्रजी वृत्तपत्रात त्या रिपोर्टनुसार, भारतीय अंपायर्सचे संभाषणाचे कौशल्य वाढवण्यासाठी भारतीय क्रिकेट बोर्डने अंपायर डेवलपमेंट प्रोग्राम अंतर्गत इंग्रजी भाषा शिकवण्यासाठी ब्रिटिश काउंसिलसोबत करार केला आहे. बीसीसीआयचे असे मानणे आहे की, खेळाडूंप्रमाणे भारतीय अंपायर्सला ही इंग्रजी शिकणे गरजेचे आहे. (Indian Cricketers)

हे देखील वाचा- महिला टी२० विश्वचषकात पहिल्यांदाच भारतीय संघाने कोरले नाव, शेफाली ब्रिडेगने असा रचला इतिहास

हे खेळाडू बोलू लागले फ्लूएंट इंग्रजी
भारतीय संघातील बहुतांश खेळाडू जसे मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज किंवा कुलदीप यादव अशा सर्व खेळाडूंचे इंग्रजी सुरुवातीला उत्तम नव्हते. मात्र आज जेव्हा आपण त्यांना मीडियासमोर बोलताना पाहतो तेव्हा ते उत्तम इंग्रजी बोलताना दिसून येतात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.