देशात आज विविध ठिकाणी रामनवमीचा सण साजरा केला गेला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा नागरिकांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. आजच्या दिवशी प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला होता. खरंतर राम हा प्रत्येक कणात आहे. पण तो आपल्या संविधानांच्या पानांवर ही आहे. संविधानावर राम असलेली प्रत आजही संसंदेत सुरक्षितरित्या ठेवण्यात आली आहे.(Indian Constitution)
भारताच्या संविधानाची मुळ प्रतिमध्ये मुलभूत हक्कांसंदर्भातील अध्यायाच्या सुरुवातीला एक स्केच आहे. हे स्केच मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम, माता सीता आणि भाऊ लक्ष्मण याचे आहे. असे सांगितले जाते की, हा फोटो लंकेत रावणावर मिळावलेल्या विजयानंतर अयोध्येत येत असल्याचा आहे. श्रीराम भारताच्या सांस्कृतिक, नैतिक आणि राजनैतिक मुल्यांचे आदर्श आहेत. त्याचे व्यक्तीमत्व आणि जीवनाचा प्रवास आपल्या संवैधानिक मुल्यांप्रमाणे आहे. असे सांगितले जात आहे की, जेव्हा देशाचे संविधान लिहण्याचा शेवटचा टप्पा होता तेव्हा याची मुख्य प्रतिलिपी मध्ये कलाकृती संदर्भात चर्चा सुद्धा झाली.
आपल्या देशाच्या संविधानात भगवान श्रीराम यांच्यासह इतिहासात निवडक महात्मा, गुरु, शासक यांच्यासह पौराणिक पात्रांचे चित्र बनवण्यात आले. त्यांना संविधानातील विविध पानांवर जागा दिली गेली. संविधानात दिली गेलेली २२ चित्र ही भारताच्या गौरवशाली वारसाचा संदेश देतो. संविधानात भगवान श्रीराम यांच्या व्यतिरिक्त गीतेचे उपदेश देत श्रीकृष्ण यांच्यासोहत अर्जुन, टीपू सुल्तान, नटराज, भगवान बुद्ध, लक्ष्मीबाई, वीर शिवाजी, मुघल सम्राट अकबर यांच्यासह गंगा नदी आणि या धरतीवर आलेल्या भागीरथला सुद्धा स्थान दिले आहे.(Indian Constitution)
हे देखील वाचा- मनुस्मृती म्हणजे काय? ज्याचा दलितसंबंधित मुद्द्यांशी काय संबंध
संविधान जेव्हा लिहिले गेले तेव्हा त्या मधील काही पाने रिकामी होती. अशातच सर्वसामान्य सहमतीने या ठिकाणी चित्र बनवण्याचा निर्णय घेतला गेला. या चित्रांना बनवण्यासाठी जबाबदारी त्या काळातील प्रसिद्ध चित्रकार आणि शांति निकेतनशी जोडलेले नंदलाल बोस यांना दिली गेली. नंदलाल बोस आणि त्यांच्या शिष्यांनी २२ चित्रांव्यतिरिक्त संविधानातील पानांच्या कडांना सुद्धा डिझाइन केले. संविधान बनवण्यासाठी दोन वर्ष ११ महिने आणि १८ दिवसांचा वेळ लागला. दरम्यान ते लिहण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागला. संविधान सभेत्या २८४ सदस्यांनी २४ जानेवारी १९५० रोजी संविधानावर स्वाक्षरी केली. मुळ संविधानात दहा पानांवर सर्व लोकांची स्वाक्षरी आहे.