Home » भारतीय नागरिकत्व कसे मिळते?

भारतीय नागरिकत्व कसे मिळते?

बॉलिवूड मधील अभिनेता अक्षय कुमार आता भारतीय नागरिक झाला आहे. त्याला पुन्हा भारतीय नागरिकत्व मिळाले आहे.

by Team Gajawaja
0 comment
Indian citizenship
Share

बॉलिवूड मधील अभिनेता अक्षय कुमार आता भारतीय नागरिक झाला आहे. त्याला पुन्हा भारतीय नागरिकत्व मिळाले आहे. सिनेमांमधील करियरला यश मिळत नसल्याने त्याने १९९० मध्ये भारतीय नागरिकत्व सोडले होते आणि कॅनडात स्थायिक आणि काम करण्यासाठी तेथील नागरिकत्व स्विकारले होते. अशातच जाणून घेऊयात अन्य देशातील लोकांना भारतातील नागरिकत्व कसे मिळते त्याच बद्दल अधिक.(Indian citizenship)

भारताचा नागरिक होण्यासाठी भारतीय नागरिक अधिनियम १९५५ अंतर्गत पात्र असावे. जर एखादा भारतात १२ वर्षांपेक्षा अधिक काळ राहत असेल तर तो भारतीय नागरिकत्व मिळावे म्हणून अर्ज करू शकतो. त्याचसोबत आजी-आजोबा अथवा परिवारातील एखादा सदस्य भारतात राहत असेल आणि परदेशात जाऊन स्थायिक झाला असेल तरी सुद्धा तो व्यक्ती वंशाच्या आधारावर भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज करू शकतो.

काय आहे नियम? 
जाणकरांच्या मते, जर भारतातील एखादा मुलगा अथवा मुलगी अन्य देशातील मुलाशी किंवा मुलीशी लग्न करतो तर त्या दोघांना सुद्धा भारतीय नागरिकत्व मिळू शकते. या व्यतिरिक्त जर एखाद्याचा जन्म देशाबाहेर झाला असेल आणि त्याचे आई-वडिल भारतीय असतील तरीही त्याला भारतीय नागरिकत्व मिळू शकते.

त्याचसोबत इंडियन सिटीजन अॅक्ट १९५५ मध्ये भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी आखणी काय योग्यता असावी हे सुद्धा सांगण्यात आले आहे. स्वातंत्र्यानंतर भारताने आपले संविधान देशात लागू केले आहे. त्यावेळी जेवढे भारतात लोक होती त्या सर्वांना भारतीय नागरिकत्व दिले गेले. भले ही कोणाकडे कागदपत्र नव्हते तरीही नागरिकत्व दिले गेले.

तर २०१९ मध्ये नागरिकता कायद्यात झालेल्या संशोधनानुसार पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानातील अल्पसंख्यांकांना नागरिकता मिळण्याचा कालावधी हा ११ वर्षावरुन ६ वर्ष करण्यात आला होता. या संशोधनानंतर या तीन देशातून आलेले हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारसी आणि ख्रिस्ती धर्माला फॉलो करणाऱ्या अल्पसंख्यांकांना भारतीय नागरिकत्व मिळावे म्हणून त्यांना कमीत कमी ६ वर्ष भारतात रहावे लागणार.(Indian citizenship)

भारतीय नागरिकत्व मिळाल्याने अक्षयला काय फायदा होणार?
-मतदान करता येणार
२०१९ मध्ये लोकसभा निवडणूकीत कॅनाडाचे नागरिकत्व असल्याने अक्षयला मतदान करता आले नव्हते. मात्र २०२४ च्या निवडणूकीत तो मदतान करू शकतो.

-निवडणूक लढवू शकतो
संविधानाअंतर्गत भारतीय नागरिकत्वाच्या आधारावर निवडणूक लढवू शकतो.

-संविधानिक पद मिळू शकते
आता पर्यंत कॅनडाचे नागरिकत्व असल्याने त्याला कोणतेही संविधानिक पद मिळाले नव्हते. मात्र आता भारतीय झाल्यानंतर त्याला ते मिळू शकते.

-शासकीय योजनांचा लाभ
राज्य किंवा केंद्र सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या योजना आणि कार्यक्रमाचा लाभ केवळ भारतीयच घेऊ शकतात. मात्र आता अक्षय कुमारला सुद्धा शासकीय योजनांचा लाभ मिळू शकतो.

हेही वाचा- सोनिया गांधी राजकरणातून एक्झिट घेणार?

-मुलभूत अधिकारांचा फायदा
भारतीय संविधानाअंतर्गत भारतीय नागरिकांना काही मुलभूत अधिकार दिले गेले आहेत. अशातच अक्षय कुमारला मुलभूत अधिकारांचा फायदा मिळू शकतो.

 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.