Home » डिप्रेशनमध्ये येऊन ‘या’ कलाकारांनी संपवले आपले आयुष्य

डिप्रेशनमध्ये येऊन ‘या’ कलाकारांनी संपवले आपले आयुष्य

नुकत्याच प्रसिद्ध आर्ट डायरेक्टर नितिन देसाई यांनी आत्महत्या केली. त्यांच्या अशा टोकाच्या पावलामुळे सर्वांना धक्का बसला होता. असे सांगितले जात आहे की, ते डिप्रेशनखाली होते.

by Team Gajawaja
0 comment
Indian celebrities
Share

डिप्रेशन आजकाल हा सामान्य शब्द वाटत असला तरीही ही स्थिती फार भयंकर आहे. ही स्थिती अधिक वाढली गेली तर लोक आपला जीव देण्यासारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. टेंन्शन आणि चिंतेने घरलेला व्यक्ती याचा शिकार होतो. नुकत्याच प्रसिद्ध आर्ट डायरेक्टर नितिन देसाई यांनी आत्महत्या केली. त्यांच्या अशा टोकाच्या पावलामुळे सर्वांना धक्का बसलाय. असे सांगितले जात आहे की, ते डिप्रेशनखाली होते. नितिन देसाई असे ऐकटे सेलिब्रेटी नाहीत ज्यांनी अशा प्रकारचे टोकाचे पाऊल उचलले आहे. यापूर्वी सुद्धा काही बड्या कलाकारांनी डिप्रेशनमध्ये येऊन आत्महत्या केली. (Indian celebrities)

सुशांत सिंह राजपूत
बॉलिवूड मधील शानदार अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून २०२० रोजी वांद्रेतील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याजवळ कोणतीही सुसाइड नोट मिळाली नाही. मात्र त्याच्या आत्महत्येमागील कारण असे मानले जात होते की, तो डिप्रेशनमध्ये होता. मुंबई पोलिसांच्या मते त्याच्या घरी काही मेडिकल कागद आणि अंन्टीडिप्रेसेंटच्या गोळ्या सुद्धा मिळाल्या होत्या.

दिशा सलियान
८ जूनला बातमी आली की, सुशांत सिंह राजपूत याची एक्स मॅनेजर दिशा सलियान हिने मालाड मधील आपल्या नवऱ्याच्या घरातून कथित रुपात १४ व्या मजल्यावरुन उडी मारत किंवा चुकून पडल्याने मृत्यू झाला. सलियन हिच्या मृत्यूनंतर पाच दिवसांनी सुशांत सिंह राजपूत याचा मृत्यू झाला होता.

कुशाल पंजाबी
कुशाल पंजाबी याचा जन्म १९७७ मध्ये झाला होता आणि त्याने काही रिअॅलिटी शो, टीव्ही शोमध्ये काम केले होते. त्याला काही पुरस्कार सुद्धा मिळाले होते. २६ डिसेंबर २०१९ रोजी त्याने मुंबईतील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. केवळ ४२ व्या वर्षात अभिनेत्याने असे टोकाचे पाऊल उचलले. कुशाल पंजाबी सुद्धा डिप्रेशनचा शिकार होता.

जिया खान
जिया खान हिचे खरे नाव नफीसा रिजवी खान असे होते. तिचा जन्म १९८८ मध्ये झाला होता. ती एक ब्रिटिश अमेरिकन अभिनेत्री आणि सिंगर होती. ३ जून २०१३ रोजी तिने आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली होती. मृत्यूच्या काही दिवसानंतर जियाच्या घरातून सहा पानांची एक सुसाइड नोट मिळाली होती. त्यामध्ये तिचा बॉयफ्रेंन्ड सूरज पांचोली याचे नाव होते. असे मानले जाते की, जिया सुद्धा खुप काळ डिप्रेशन मध्ये होती.

प्रत्यूषा बॅनर्जी
लहान पडद्यावरील अभिनेत्री आणि बालिका वधू मध्ये आनंदीची भुमिका साकारलेल्या प्रत्युषा बॅनर्जीने सुद्धा १ एप्रिल २०१६ मध्ये आपल्या मुंबईतील अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळली होती. ती बिग बॉस सीजन ७ मध्ये सुद्धा दिसून आली होती. प्रत्युषा बद्दल असे सांगितले जाते की, ती डिप्रेशनमध्ये होती आणि दीर्घकाळापासून त्रस्त सुद्धा होती. (Indian celebrities)

हेही वाचा- हाॅलिवूड मधील ‘या’ कलाकारांचे झालेत सर्वाधिक भयंकर अपघात

तुनिषा शर्मा
टेलिव्हिजनवरील अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने सुद्धा आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येने सर्वांना धक्का बसला होता. अभिनेत्रीने टीव्ही सीरियलच्या सेटवरच गळफास लावून घेत आपले आयुष्य संपवले होते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.