Home » भारतातील Bad Boy Billionaires माहितेयत का?

भारतातील Bad Boy Billionaires माहितेयत का?

by Team Gajawaja
0 comment
Indian Bad Boy Billionaires
Share

Indian Bad Boy Billionaires- असे म्हटले जाते की, वेळ बदल्यानंतर काही गोष्टी सहज घडण्यास अजिबात अधिक काळ जात नाही. अशातच भारतातील असे काही सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती ज्यांची ओळख एक प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये केली जायची. कारण त्यांची अशी एक वेळ होती त्यांच्याकडे सर्वकाही होते. त्यांच्याकडे पैसा, श्रीमंती आणि नाव ही होते. पण आज त्यांची हालत अशी झाली आहे की, त्यांचे नाव ऐकूनच लोकांच्या डोक्यात तिडीक जाते. कारण लोकांना फसवून, देशाचा पैसा लुटणाऱ्यांना लोक आजही खुप शिव्या-श्राप देतात. तर तुम्हाला माहिती आहेत का भारतातील असे काही बॅड बॉय बिलेनियर्स ज्यांनी नक्की कोणते आर्थिक घोटाळे केलेत किंवा त्यांच्याबद्दलची अधिक माहिती? तर जाणून घेऊयात भारतातील बॅड बॉय बिलेनियर्स नक्की कोण आहेत.

-विजय माल्ल्या
किंगफिशर एअरलाइन्सचे माल विजय माल्ल्या यांची ओळख एक भारतीय यशस्वी उद्योगपाती, माजी राज्यसभा खासदार आणि आयपीएलच्या एका फ्रँचाइजीच्या रुपात होती. त्यांनी खेळ ते राजकीय क्षेत्रात आपले नाव कमावले होते. पण १३ जून १०६ रोजी विजय माल्ल्याला मनी लॉन्ड्रिंग अंतर्गत ९ हजार कोटी रुपयांच्या लोन डिफॉल्टचे दोषी आढळले. माल्ल्याने कथित रुपात जगभरातील जवळजवळ ४० कंपन्यांमध्ये आंशिक भागीदारी मिळवण्यासाठी स्थानांतरित केले आहे. ऐवढेच नव्हे तर माल्ल्याने भारतीय बँकांकडून उधारीवर घेतलेले पैसे घेऊन विदेशात पळ काढला. त्याला भारतात फरार आरोपी म्हणून घोषित करण्यात आले. १७ भारतीय बँका या त्याच्याकडून आपला पैसा मिळवण्यासाठी ब्रिटनमधील कोर्टात केस लढतायत.

-मेहुल चोकसी
मेहुल चोकसी याला सुद्धा फरार उद्योगपती मानले जाते. सध्या तो अँन्टिगुआ आणि बारबुडाच्या द्विपवर राहतो. त्याच्यावर विश्वासाचे उल्लंघन आणि मनी लॉन्ड्रिंगचा आरोप लावण्यात आला आहे. चोकसी रिटेल ज्वॅलरी कंपनी गीतांजलि ग्रुपचा मालक होता. भारतात त्याचे ४ हजार स्टोर्स होते. पंजाब नॅशनल बँकेला चुना लावल्याप्रकरणी त्याच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. चोकसी वर कथित रुपात १.८ बिलियन डॉलरचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आहे.

हे देखील वाचा- श्रीलंकेतील आर्थिक अराजकतेची कारणं आणि सद्यस्थिती… 

Indian Bad Boy Billionaires
Indian Bad Boy Billionaires

-नीरव मोदी
प्रसिद्ध हिरे व्यापारी नीरव मोदीला २०१८, ऑगस्टपासून इंटरपोल आणि भारत सरकारद्वार गुन्हाच्या कट, भ्रष्टाचार, मनी लॉन्ड्रिंग, फसवणूकीच्या प्रकरणी दोषी म्हणून अटक करण्यात आली होती. मोदीवर पीएनबीने २८ हजार कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळ्याचा गुन्हा दाखल केला होता. त्याचसोबत कॅलिफोर्नियातील एका बिझनेसमन द्वारे $४.२ मिलियनच्या दोन कस्टम डायमंड अँगेजमेंट रिंगसाठी मोदीवर खटला दाखल केला होता. जो लॅब हिऱ्यांचे काम करत होता. नीरव मोदी सध्या ब्रिटेनमध्ये असल्याचे सांगितले जाते.

-रामलिंग राजू
सत्यम कंप्युटर्स ९० च्या दशकात एक अत्यंत यशस्वी आयटी कंपनी होती. कंपनीचे माजी अध्यक्ष आणि सीईओ, रामलिंग राजू यांच्या कार्यकाळादरम्यान मोठा घोटाळा झाला. सत्यम घोटाळ्यानंतर राजू बोर्डाने राजीनामा दिला. आरोप असा आहे की, त्यांनी ७१४० कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. राजूने याबद्दल स्वत: कबुली दिली होती. सत्यमला एप्रिल २००९ मध्ये टेक महिंद्राने खरेदी केले आणि तेव्हापासून सत्यमचे नाव बदलले गेले.(Indian Bad Boy Billionaires)

-सुब्रत रॉय
देशातील सर्वाधिक मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या सुब्रत रॉय यांच्या सहारामध्ये हजारो-कोटी लोकांनी गुंतवणूक केली होती. परंतु कामकाजात पारदर्शकता नसल्याने आणि आर्थिक अनियमिततेमुळे काही लोकांचा पैसा तेथे फसला. मोठा नफा मिळेल याच्या भरोश्यावर लोकांनी सहारामध्ये हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. परंतु मॅच्युरिटीनंतर पैसे मिळण्याऐवजी त्यांना कंपनीने ठेंगा दाखवला होता. तर सहारा इंडियाची सुरुवात १९७८ मध्ये झाली होती. सहाराचा घोटाळा मुख्य रुपात सहारा ग्रुपच्या दोन कंपन्या सहारा इंडिया आणि रियल एस्टेट कॉर्पोरेशन लिमिटेज आणि सहारा हाउसिंग इन्वेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड संबंधित आहेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.