Home » Shubhanshu Shukla : फायटर पायलट शुभांशू शुक्ला घेणार अवकाशात झेप

Shubhanshu Shukla : फायटर पायलट शुभांशू शुक्ला घेणार अवकाशात झेप

by Jyotsna Kulkarni
0 comment
Shubhanshu Shukla
Share

आजवर मोजके काही भारतीय सोडले तर कोणीच अंतराळामध्ये मोहिमेसाठी गेले नाही. राकेश शर्मा, कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांच्यानंतर असे ठळक अंतराळ मोहिमेसाठी कोणत्याही भारतीय व्यक्तीचे नाव चर्चेत आले नव्हते. मात्र आता १४० कोटी भारतीयांची पुन्हा एकदा मान उंचावणारा आणि अभिमानाने उर भरून येणारा दिवस आला आहे. राकेश शर्मा यांच्या नंतर जवळपास चार दशकांनी भारतीय व्यक्ती अवकाशात जाणार आहे. भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे अ‍ॅक्सिओम स्पेसच्या अ‍ॅक्स-४ मोहिमेसाठी अंतराळात जाणार आहेत. शुभांशू शुक्ला आज १० जून रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५:५२ वाजता अंतराळ स्थानकासाठी रवाना होणार आहेत. ते ११ जून २०२५ रोजी ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहचतील. (Shubhanshu Shukla)

शुभांशू शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पोहोचणारे भारताचे दुसरे लढाऊ पायलट ठरणार आहेत. शुभांशू यांच्याआधी १९८४ मध्ये राकेश शर्मा यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. शुभांशु शुक्ला अमेरिकेच्या Axiom Space या कंपनीच्या Ax-4 या मिशनचा भाग आहेत. हे मिशन १० जून रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५:५२ वाजता फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून झेप घेणार आहे. २८ तासांच्या प्रवासानंतर ११ जून रोजी त्यांचे यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी जोडले जाणार आहे. (Marathi News)

Axiom Space ने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये शुभांशु हात जोडून सर्वांना अभिवादन करताना म्हणाले, “नमस्ते, मी ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आहे…”. १५ वर्षांहून अधिक काळ भारतीय वायुदलात कॉम्बॅट पायलट म्हणून सेवा दिल्यानंतर आता ते अंतराळात झेप घेणारे पहिले भारतीय लढाऊ पायलट ठरणार आहेत. शुभांशुसोबत अमेरिका, पोलंड आणि हंगेरीचे अंतराळवीर देखील असतील. (Top Stories)

Shubhanshu Shukla

१४ दिवसांच्या मिशनसाठी जाणार आहेत. Axiom-4 ही भारतासाठी एक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, कारण पहिल्यांदाच यामध्ये भारताचा अवकाशवीर खासगी मोहिमेद्वारे ISS वर जाणार आहे. ही मोहीम अमेरिकेच्या नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथील LC-39A या प्रक्षेपण स्थळावरून SpaceX च्या ड्रॅगन यानाद्वारे संपन्न होणार आहे. यामध्ये भारत, पोलंड आणि हंगरीचे अंतराळवीर सहभागी आहेत, आणि प्रत्येक देशासाठी ही त्यांची पहिलीच ISS मोहिम आहे. (Marathi Latest News)

Axiom-4 मोहिमेअंतर्गत एकूण ६० वैज्ञानिक प्रयोग केले जाणार असून, यापैकी सात प्रयोगांची आखणी ISRO ने केली आहे. शुभांशु शुक्ला हे NASA च्या Human Research Program अंतर्गत पाच प्रयोगांमध्ये भाग घेणार असून, त्याशिवाय आणखी पाच सहकार्यात्मक अभ्यासप्रकल्पांमध्येही सहभागी होणार आहेत. या मिशनमुळं भारत, पोलंड आणि हंगेरी ४० वर्षांनंतर पुन्हा अंतराळात मानव पाठवत आहेत. (Top Marathi Headline)

एका माहितीनुसार भारताने या मोहिमेवर जवळपास ५४८ कोटी रुपये खर्च केले आहेत. यामध्ये शुभांशू शुक्ला आणि त्यांचे बॅकअप ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर या दोघांचे प्रक्षेपण आणि प्रशिक्षण याचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचल्यानंतर शुभांशू शुक्ला वनस्पतींच्या बियाण्यांवर आणि मानवी शरीरावर सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा काय परिणाम होतो याबाबत प्रयोग करणार आहेत. (Marathi Trending News)

Shubhanshu Shukla

शुभांशु अंतराळात भारतीय लोकप्रिय पदार्थ घेऊन जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्यासोबत मूगदाल हलवा, गाजर हलवा, आमरस आणि भात असे भारतीय पदार्थ जाणार आहेत. सुरुवातीला मसालेदार पदार्थांना परवानगी नव्हती, परंतु नंतर काही खास पदार्थांना अंतराळात नेण्याची परवानगी मिळाली आहे. ते फिटनेसप्रेमी आहेत आणि योगाचा विशेष छंद आहे, त्यामुळे ते अंतराळात आहार आणि फिटनेसचा समतोल राखणार आहेत. (Social News)

ॲक्सिओम ४ चे अंतराळवीर कोणते?
पेगी व्हिटसन (अमेरिका): मिशन कमांडर, अनुभवी अंतराळवीर, ISS वर दोनदा कमांडर होत्या.

शुभांशू शुक्ला (भारत): मिशन पायलट, भारतीय हवाई दलाचे अधिकारी, गगनयान मोहिमेसाठी निवडलेले अंतराळवीर.

स्लावोश उझनांस्की-विश्निव्हस्की (पोलंड) : वैज्ञानिक आणि अभियंता, मिशन विशेषज्ञ.

टिबोर कापू (हंगेरी): यांत्रिक अभियंता, मिशन विशेषज्ञ.

कोण आहेत शुभांशु शुक्ला?
शुभांशु यांचा जन्म १० ऑक्टोबर १९८४ रोजी उत्तरप्रदेशमधील लखनऊ येथे झाला. शुभांशु यांचे वडील निवृत्त सरकारी अधिकारी तर त्यांची आई गृहिणी असून, शुभांशु यांना दोन मोठ्या बहिणी आहेत. त्यांची पत्नी काम्या या डेंटिस्ट असून त्यांना सहा वर्षाचा कियांश नावाचा एक मुलगा देखील आहे. शुभांशु यांचे शालेय शिक्षण सिटी मॉन्टेसरी स्कूलमध्ये झाले. शुभांशु १४ वर्षांचे असताना कारगिल युद्ध झाले. तेव्हाच सैन्यात दाखल होण्याचा त्यांनी मनाशी निश्चय केला. पुढे दोन वर्षांनी घरच्यांना न सांगता शुभांशु यांनी पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) प्रवेश परीक्षेचा अर्ज भरला. परीक्षा देऊन ते एनडीएसाठी निवडले गेले. एनडीएच्या अभ्यासक्रमासोबत त्यांनी कम्प्युटर सायन्स या विषयात बीएस्सी पदवी मिळवली. (Top Trending News)

शुभांशु यांनी इंडियन एअर फोर्स ॲकॅडमीमधून पुढील शिक्षण पूर्ण केले आणि ते २००६ साली भारतीय हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर म्हणून रुजू झाले. लढाऊ विमानांचे टेस्ट पायलट म्हणून त्यांना दोन हजारपेक्षा अधिक तासांचा दीर्घ अनुभव आहे. शुभांशु यांनी सुखोई ३०, मिग २१, मिग २९, जॅग्वार, हॉक, डॉर्नियर २२८ आणि एएन ३२ आदी विमानांचे उड्डाण केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१८ च्या स्वतंत्रदिनाच्या भाषणात भारताच्या ‘गगनयान’ या मानवी अवकाश मोहिमेची घोषणा केली होती. (Top Marathi NEws)

Shubhanshu Shukla

त्यानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) आणि हवाई दलाच्या संयुक्त विद्यमाने देशातील हवाई दलाच्या वैमानिकांकडून या मोहिमेत सहभागी होण्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. आलेल्या शेकडो अर्जांमधून सुरुवातीला दहा आणि दुसऱ्या टप्प्यात चार वैमानिकांची भारताचे संभाव्य अंतराळवीर म्हणून निवड करण्यात आली. या चार जणांमध्ये शुभांशु आणि ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर यांच्यासह ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप यांचाही निवड करण्यात आली होती. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी पंतप्रधानांनी त्यांची नावे अधिकृतपणे जाहीर केली. (Todays Top Headline)

मुख्य म्हणजे शुभांशु यांनी गगनयान मोहिमेसाठी अर्ज केल्याचे त्यांच्या कुटुंबीयांना सांगितले नव्हते. २०१९मध्ये त्यांची या मोहिमेसाठी निवड झाल्यानंतरच त्यांनी याबाबत आई, वडील, बहिणी आणि त्यांच्या पत्नी कामना यांना सांगितले. फेब्रुवारी २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत रशियाच्या युरी गागारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये शुभांशु आणि इतर चार वैमानिकांचे अवकाश प्रवासासाठीचे प्रशिक्षण पूर्ण झाले. याच केंद्रामध्ये भारताचे पहिले अवकाशवीर विंग कमांडर राकेश शर्मा यांनीही प्रशिक्षण घेतले होते. भारतात परतल्यावर त्यांना बेंगळुरू येथे गगनयान मोहिमेसाठी आवश्यक प्रगत प्रशिक्षण देण्यात आले. या कालावधीत शुभांशु यांनी बेंगळुरूच्या आयआयएस्सी येथून अवकाश तंत्रज्ञान विषयात एमटेकचे शिक्षणही पूर्ण केले. (Social Updates and News)

==========  

हे देखील वाचा : Jatinga Village : या रहस्यमयी जागेवर हजारो पक्षी आत्महत्या करतात!

==========

शुभांशू यांचे प्रेरणास्थान भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा आहेत. १९८४ मध्ये राकेश शर्मा यांनी रशियन सोयुझ अंतराळयानातून अंतराळ प्रवास केला होता. शुभांशू त्यांना गुरू मानतात आणि त्यांच्यासाठी एक खास भेट अंतराळात नेणार आहेत, जी ते परतल्यानंतर सर्वांना सांगणार आहे. शिवाय शुभांशु यांना ISS वर योगासन करण्याची देखील इच्छा आहे. शुभांशु सध्या क्वारंटाईनमध्ये असून ते दररोज कुटुंबासोबत व्हिडिओ कॉलवर संवाद साधतात. त्यांची पत्नी डॉ. कामना शुक्ला आणि त्यांचा पाच वर्षांचा मुलगा सध्या फ्लोरिडामध्येच आहेत. सध्या शुभांशु यांचे संपूर्ण कुटुंब लखनऊ येथे एकत्र असून, ते शुभांशु यांच्या यशासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत. (Marathi Top Stories)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.