आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी ना कोणी रोल मॉडेल असतो. प्रत्येकाला कोणीतरी हिरो किंवा हिरॉईन आवडत असते. कोणासारखं तरी बनावं अस सतत वाटत असत. आज आपण अशा रिअल लाईफ हिरो बद्दल बोलणार आहोत. अशी व्यक्ती जिने महाराष्ट्राचे नाव उंचावले. अशी व्यक्ती जिचा प्रत्येक मराठी स्त्री पुरुषाला अभिमान आहे.
‘लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर इंडियन आर्मी’. 15 ऑक्टोबर 1960 रोजी माधुरीजींचा जन्म धारवाड, कर्नाटक येथे झाला. आजी आजोबा डॉक्टर, वडील इंजिनिअर आणि आई प्राध्यापिका अशा सुशिक्षित घरातून आलेल्या माधुरीजी त्यांच्या आजी आजोबांच्या कामावर खूपच प्रभावित होत्या. म्हणून फर्ग्युसन कॉलेज पुणे, येथून मेडिकल कक्षेत त्यांनी 12वी चे शिक्षण घेतले. त्या वेळेला त्यांचा सगळा मित्र वर्ग NDA मध्ये सहभागी झालेला होता, त्यामुळे तेथील शिक्षण, शिस्त, तेथील पद्धती, याबद्दल सतत गप्पा होत असत. या सगळ्या घटना ऐकून माधुरीजी भारावून गेल्या आणि देशसेवेत यायचे, इंडियन आर्मी मध्ये सहभागी व्हायचे स्वप्न निर्माण झाले.

माधुरीजींच्या (Madhuri Kanitkar) अनेक प्रयत्नांनी त्यांना ARMED FORCES मेडिकल COLLEGE मध्ये दाखला मिळाला. 1978 साली बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी या दोन पदव्या मिळवल्या. माधुरीजींच्या MBBS च्या प्रवासात त्यांचा पुणे युनिव्हर्सिटी मधून पहिला नंबर होता आणि यासाठी त्यांना राष्ट्रपतींकडून गोल्ड मेडलने सन्मानित सुद्धा करण्यात आले. शिक्षणाची आवड आणि सतत शिकण्याची जिद्द यामुळे 1990 मध्ये बालरोग विषयक (pediatric) पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतले. हे शिक्षण आणखी प्रभावशाली व्हावे म्हणून माधुरीजींनी न्यू दिल्ली मधील AIIMS मधून पेडियाट्रिक नेफ्रॉलॉजीचा कोर्स केला एवढेच नव्हे तर त्यामध्ये प्राविण्य मिळावे म्हणून नॅशनल सिंगापूर युनिव्हर्सिटी आणि लंडन मधून ट्रेंनिंग सुद्धा घेतले. चाळीस वर्षाच्या या प्रवासात इंडियन आर्मीमधील माधुरीजी या पहिल्या पेडियाट्रिक मेफ्रॉलॉजिस्ट झाल्या.
माधुरीजींच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्या, प्राईम मिनिस्टर सायन्स अँड टेक्नॉलॉजी इनोवशन ऍडवायसरी कमिटीच्या सदस्य आहेत. हेच नव्हे तर 28 जानेवारी 2017 मध्ये Armed Forces Medical कॉलेज मध्ये त्यांची डेप्युटी कमंडन्ट आणि कॉलेज प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. त्यांना AVSM (अति विशिष्ट सेवा मेडल) आणि VSM (विशिष्ट सेवा मेडल) या पुरस्कारांनीसुद्धा सन्मानित करण्यात आले आहे. इंडियन आर्मी मधील तीन स्टार्स (three stars) मिळालेल्या माधुरीजी या तिसऱ्या महिला इंडियन आर्मी जनरल ऑफिसर आहेत. सध्या त्या डेप्युटी चीफ ऑफ इंटग्रल डिफेन्स स्टाफ (DEPUTY CHIEF OF INTEGRAL DEFENCE STAFF MEDICAL) आहेत.

सध्याच्या कोविड-19 महामारीमध्येसुद्धा इंडियन आर्मीची बहुमोलाची साथ आहे. मेडिकल टीम मध्ये कार्यरत असलेल्या माधुरी कानिटकरांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कोविड-19 च्या या लढ्यात या प्रोग्रॅमचे नाव ‘ऑपरेशन “को-जीत”‘ असे ठेवण्यात आले आहे. या मिशन अंतर्गत बऱ्याच सेवा आणि मदत इंडियन आर्मी कडून केली जात आहे
1. माधुरी कानिटकरांवर सोपवण्यात आलेल्या को-जीत (CO-JEET) या मिशन मध्ये आर्मीसाठी ने आण करणारे रेल्वेचे कोच हे सध्या कोविड साठी ऑक्सिजन पुरवठा मिळावा म्हणून कार्यरत आहेत
2. युद्धभूमीवर कार्यरत असणारा मेडिकल स्टाफसुद्धा सध्या डॉक्टरांबरोबर या कोविड लढ्यात सहभागी करण्यात आला आहे.
3.आर्मी मध्ये कार्यरत असणारे दोनशे ट्रक ड्रायव्हर्स या कठीण परिस्थितीत ऑक्सिजन टॅंक सगळ्या देशभरात पोहोचवण्यासाठी कार्य करत आहेत.
4. इंडियन एअरफोर्ससुद्धा यामध्ये आपले योगदान करत आहे. सिंगापूर, दुबई यांसारख्या देशांकडून मिळणाऱ्या ऑक्सिजन टँकर्स आपल्या देशात आणणे आणि देशभरात पोहोचवणे अशी महत्वपूर्ण जबाबदारी इंडियन एअर फोर्स बजावत आहे.
5. लोकांसाठी बेड उपलब्ध करून देणे, ऑक्सिजन पुरवठा करणे अशा कितीतरी जबाबदाऱ्या इंडियन एअरफोर्समुळे पार पाडल्या जात आहेत.

या बाबत लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर म्हणतात कोविड विरुद्ध लढ्यातसुद्धा आपल्याला जिंकायचे आहे म्हणूनच या मिशनचे नाव ‘CO-JEET’ असे देण्यात आले आहे.
इतकी मोठी महत्वाची जबाबदारी पार पडण्यासाठी आपल्या मराठी महिलेला इतके उच स्थान देण्यात येत आहे यासारखी अभिमानास्पद गोष्ट नाही. देशाची सेवा आणि स्वतःचे वैयक्तिक आयुष्य यामध्ये सुद्धा कितीवेळा संघर्ष झाला तरी सुद्धा देशसेवेसाठी त्या सतत कार्यरत आहेत. त्यांचे पतीसुद्धा इंडियन आर्मी मध्ये कार्यरत आहे ‘लेफ्टनंट जनरल राजीव कानिटकर’ यांनी सुद्धा माधुरी कानिटकरांच्या या प्रवासात त्यांना पूर्ण सहकार्य केले.
स्त्री ने ठरवले तर ती कुठलेही शिखर गाठू शकते याचे उदाहरण म्हणून माधुरी कानिटकरांचा खूप अभिमान वाटतो. हा मराठी बाणा आज सगळ्या देशासाठी एक महत्वाची भूमिका बजावत आहे याचे खूप कौतुक आणि आदर आहे. गर्व आहे आम्हाला आम्ही मराठी असल्याचा.
– अमृता आपटे