Home » ८ ऑक्टोंबरला का साजरा केला जातो वायुसेना दिवस? जाणून घ्या इतिहास

८ ऑक्टोंबरला का साजरा केला जातो वायुसेना दिवस? जाणून घ्या इतिहास

by Team Gajawaja
0 comment
Indian Air Force Day
Share

आज वायुसेना दिवस साजरा केला जात आहे. तर प्रत्येक वर्षी ८ ऑक्टोंबरला हा दिवस साजरा करण्यात येतो. मात्र आज ९० वे वर्ष आहे. या दिवशी वायुसेनेच्या कामगिरीला सलाम केला जातो. त्यासाठी काही विविध कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन होते. यामध्ये एअर शो ते परेडचा समावेश असतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का की, ८ ऑक्टोंबरलाच वायुसेना दिवस का साजरा केला जातो? (Indian Air Force Day)

भारतीय वायुसेना
भारतीय वायुसेना ही जगातील शक्तिशाली वायुसेन्यांपैकी एक आहे. जमिनीवर लढणाऱ्या सैन्याच्या मदतीसाठी याची स्थापना करण्यात आली. स्वातंत्र्यापूर्वी वायुसेना ही सैन्यासोबतच काम करायची. मात्र त्यांना वेगळे ओळख देण्याचे काम सर थॉमस डब्लू एल्महर्स्ट यांनी केले. स्वातंत्र्यानंतर त्यांनाच भारतीय वायुसेनेचे पहिले चीफ बनवण्यात आले होते. भारतीय वायुसेना जगातील चौथी मोठी वायुसेना आहे. आयएफ (IAF) भारतीय आर्म्ड फोर्सला आकाशात मदत करते. यांचे मुख्य काम भारतीय हवाई क्षेत्राचे संरक्षण करणे आणि सशस्र संघर्षादरम्यान हवाई युद्ध करणे आहे.

Indian Air Force Day
Indian Air Force Day

८ ऑक्टोंबरला का साजरा केला जातो भारतीय वायुसेना दिवस?
भारतीय वायुसेना दिवस अशा कारणास्तव ८ ऑक्टोंबरला साजरा केला जातो कारण याच दिवशी १९३२ मध्ये त्याची स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत वायुसेनेत काही क्षेपणस्रांचा समावेश करत काही मिशन जिंकले. दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी आयएफने ऐवढे उत्तम प्रदर्शन केले की, त्याच्या नावासग रॉयल जोडून त्याला रॉयल इंडियन एअर फोर्स असे नाव दिले गेले. मात्र जेव्हा १९५० मध्ये भारत एक प्रजासत्ताक बनवला तेव्हा रॉयल हे नाव हटवून त्याला भारतीय वायुसेना असे नाव दिले गेले. भारताचे राष्ट्रपतींजवळ वायुसेनेचे सर्वोच्च कमांडरचे पद असते. (Indian Air Force Day)

हे देखील वाचा- ‘वंदे भारत एक्स’मुळे भारताच्या इतिहासाला आला वेग… 

यंदा चंदीगढ मध्ये होतोय आयएएफचा कार्यक्रम
यंदा इंडियन एअरफोर्स डे चा खास कार्यक्रम चंदीगढ येथे होत आहे. बहुतांशकरुन असे कार्यक्रम दिल्ली-एनसीआर येथे आयोजित केले जातात. मात्र यंदा वायुसेना दिवस फ्लाई पास्ट जवळ ८० सैन्य विमान आणि हेलीकॉप्टर सहभागी होणार आहेत.

तर आयएएफचा उद्देश हा ”नभ: स्पृशं दीप्तम्” असा असून त्याचा अर्थ आकाशात आपल्या गर्वाने उड्डाण करणे. त्याचसोबत ऑपरेशन विजय आणि ऑपरेशन मेघदूत सारखे मोठे ऑपरेशनला मिळालेले यश हे भारतीय वायुसेनेच्या मदतीशिवाय अपुरे आहे. त्याचसोबत आयएएफ युनाइटेड नेशंससह पीसकिमिंग मिशंस मध्ये उत्तम कामगिरी करते. भारतीय वायुसेनेकडे जवळजवळ १४०० एअरक्राफ्ट आणि १.७ लाख कर्मचारी-विभाग आहेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.